
Contents
- 1 Shirur Crime News: शिरुरजवळ पुन्हा मंगळसुत्र चोरी ! प्रवासी महिला व तिचा चुलतभाऊ थकल्याने गाडीत झोपलेले होते?
Shirur Crime News: शिरुरजवळ पुन्हा मंगळसुत्र चोरी ! प्रवासी महिला व तिचा चुलतभाऊ थकल्याने गाडीत झोपलेले होते?
Shirur Crime News:दागिन्यांची किंमत 91000 रुपये !
Shirur Crime News 4 April 2025 (Satyashodhak News Report)
Shirur Crime News: शिरुरजवळ पुन्हा मंगळसुत्र चोरी व इतर सोन्याचे दागीने चोरटयांनी चाकुचा धाक दाखवुन लुबाडल्याची घटना घडली आहे.ही महिला प्रवासी व तिचा चुलतभाऊ प्रवासात थकल्याने गाडीत झोपलेले होते.त्यांना उठवुन धमकावुन चोरट्या ंनी हे सोन्याचे दागीने लुटले आहेत.शिरुर पोलिस अधिक तपास करत आहेत. या दागिन्यांची एकुण किंमत 91000 रुपये इतकी आहे.
सविस्तर बातमी अशी आहे-
दिनांक 3 मार्च 2025 रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास शिरूर ग्रामीण ,तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे जवळील बोराडे मळा येथील कल्याणी हॉटेल समोर अहिल्यानगर पुणे रोडच्या पुणे या बाजूला सुलोचना दुधाराम राठोड, वय- 40 वर्षे ,व्यवसाय- मजुरी ,राहणार- उत्तरवाडोना , तालुका- नेर,जिल्हा- यवतमाळ यांचा चुलत भाऊ याला झोप लागली.ते त्यांची चार चाकी गाडी (क एम एच ३७ ए डी ८९०७ असा नंबर) असलेल्या या गाडीत झोपलेले होते.
अज्ञात इसमांनी आवाज दिला—
तेव्हा अज्ञात इसमांनी त्यांना आवाज दिला. गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यापैकी एकाने फिर्यादीं महिलेला चाकुचा धाक दाखवत खालील वर्णनाचे व ९१०००/-रुपये किमतीचे त्याच्या गळ्यामधील सोन्याचे मनी ,मंगळसूत्र व कंठण जबरदस्तीने हिसकावून नेले आहेत.त्यांनी भीतीने त्यांच्याकानातील रिंगा चोरांना काढून दिल्या.
शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद दाखल—
म्हणून फिर्यादी यांनी अनोळखी इसमाविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
चोरीला गेलेल्या सोन्याच्या मालाचे वर्णन —-
1) 35000/- रुपये किमतीचे एक पाच ग्राम वजनाचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र खालील बाजूस दोन 35000/-रुपये किंमतीचे एक पाच ग्राम वजनाचे गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र ,खालील बाजूस दोन वाट्या असलेल्या त्यामध्ये काळे मणी.
2) 35000/-रुपये किंमतीचे एक पाच ग्राम वजनाचे गळ्यामधील सोन्याचा गंठण ; त्याला खालील बाजूस पदक असलेली; त्यामध्ये काळे मणी.
३) 21000/-रुपये किंमतीचे ग्रॅम वजनाच्या दोन्ही कानामधील दोन सोन्याच्या गोलाकार रिंगा.
——————
अशी 91000/-रुपये एकूण किंमत.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २९ मध्ये काय वाचाल ..👇
✅ रक्ताचे अर्ध्य…..
✅ अन्वेषण पद्धती….
✅ शरद पाटील यांची ग्रंथ संपदा. …
✅,शिवाजी,महाभारत….👇
अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल–
शिरुर पोलिस स्टेशन मधे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद नंबर 223/2025 असा आहे.तर अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास अंमलदार पोलिस सब इन्स्पेक्टर श्री. नकाते हे करत आहेत. दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री. मोरे हे आहेत.
प्रभारी अधिकारी संदेश केंजळे,शिरूर पोलीस स्टेशन,
पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
1 thought on “Shirur Crime News: शिरुरजवळ पुन्हा मंगळसुत्र चोरी ! प्रवासी महिला व तिचा चुलतभाऊ थकल्याने गाडीत झोपलेले होते?”