
Contents
- 1 Shirur Crime Mangalsutra Chori News:शिरुर येथे महिलेचे मंगळसुत्र लुटणाऱ्या टोळीचा झाला पर्दाफाश;शिरुर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या !(पहा व्हिडिओसह)
- 1.1 Shirur Crime Mangalsutra Chori:इतरही 5 पैकी चार मंगळसुत्र चोरीची कबुली ? एक अद्याप फरार !
- 1.2 सविस्तर बातमी अशी आहे-
- 1.3 सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास —
- 1.4 गणेश सुनिल गायकवाड,वय 21 -वर्षे, सार नगर,शांतीनगर, सोलापुर रोड,अहिल्यानगर, नरसी वाघेला,वय- 24 वर्षे,संजयनगर,काटवन ,खंडोबा नगर ,अहिल्यानगर यांच्यासह साजीद सलिम पठाण आरोपी—
- 1.5 दोघांनी पाच गुन्ह्यांपैकी चार गुन्ह्यांची कबुली दिली—
- 1.6 कारवाईत वरिष्ट पोलीस अधिकार्यांचा सहभाग—
Shirur Crime Mangalsutra Chori News:शिरुर येथे महिलेचे मंगळसुत्र लुटणाऱ्या टोळीचा झाला पर्दाफाश;शिरुर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या !(पहा व्हिडिओसह)
Shirur Crime Mangalsutra Chori:इतरही 5 पैकी चार मंगळसुत्र चोरीची कबुली ? एक अद्याप फरार !
Shirur Crime Mangalsutra Chori News 6 April 2025:
( Satyashodhak News Report)
Shirur Crime Mangalsutra Chori News:शिरुर येथे महिलेचे मंगळसुत्र लुटणाऱ्या टोळीचा झाला पर्दाफाश झाला आहे.शिरुर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत ! इतरही 5 पैकी चार मंगळसुत्र चोरीची कबुली आरोपींनी दिली आहे. मात्र एक आरोपी अद्याप फरार आहे.
सविस्तर बातमी अशी आहे-
शिरुर | दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जुन्या हनुमान मंदिर ते दुध डेअरी समोरून जात असलेल्या एका महिलेचे मंगळसुत्र जबरीने चोरण्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 167/2025 अन्वये, भारतीय न्याय संहिता कायदा कलम 304(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7.930 ग्राम वजनाचे, अंदाजे 27,840 रुपये किमतीचे मंगळसूत्र—-

या घटनेत दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 7.930 ग्राम वजनाचे, अंदाजे 27,840 रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले होते. या गंभीर प्रकरणाची जबाबदारी पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. शुभम चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास —
पुढील तपासात पोलिस अंमलदार नितेश थोरात आणि विजय शिंदे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना संशयित आरोपी अहिल्यानगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली नीरज शिंदे, नितेश थोरात व विजय शिंदे यांच्या पथकाला अहमदनगरकडे रवाना करण्यात आले.
गणेश सुनिल गायकवाड,वय 21 -वर्षे, सार नगर,शांतीनगर, सोलापुर रोड,अहिल्यानगर, नरसी वाघेला,वय- 24 वर्षे,संजयनगर,काटवन ,खंडोबा नगर ,अहिल्यानगर यांच्यासह साजीद सलिम पठाण आरोपी—
या कारवाईदरम्यान, गणेश सुनिल गायकवाड आणि करण नरसी वाघेला यांच्यासह साजीद सलिम पठाण याची नावे समोर आली. विशेष म्हणजे, साजीद पठाण याने अहमदनगर येथील एका सोनाराकडे “वडील आजारी आहेत” असे सांगून दागिने विकले होते. सदर दागिने जप्त करण्यात आले आहेत.
दोघांनी पाच गुन्ह्यांपैकी चार गुन्ह्यांची कबुली दिली—
या आरोपींनी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अशा पाच गुन्ह्यांपैकी चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मात्र, साजीद सलिम पठाण सध्या फरार असून, त्याच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

कारवाईत वरिष्ट पोलीस अधिकार्यांचा सहभाग—
तपासात वरिष्ठ पोलीस अधिकारी व शिरुर पोलीस स्टेशनचे पथक सक्रिय सहभागी होते. पंकज देशमुख ,पुणे ,पोलिस अधिक्षक , अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलिस अधिकारी ,शिरुर उपविभाग प्रशांत ढोले, पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे,ठाणे पोलिस अन्वेषण विभागाचे पोलिस सब इन्स्पेक्टर श्री. शुभम चव्हाण ,नाथसाहेब जगताप, नीतेश थोरात, विजय शिंदे,सचिन भोई ,निरज पिसाळ ,विजय,निखील रावडे,रविंद्र आव्हाड,अजय पाटील या पोलिस पथकाने ही महत्वाची कारवाई पार पाडली.
नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.