
Shirur Crime News : गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी दोन प्रकरणे दाखल, एक महिला आरोपी!
Shirur Crime News Gavathi Daru
दिनांक 17 जुन 2025| प्रतिनिधी |
” Shirur Crime News: शिरूर तालुक्यात न्हावरे गावात गावठी हातभट्टी दारू विक्री प्रकरणात पोलिसांची कारवाई, दोन आरोपींवर गुन्हे दाखल. वाचा सविस्तर बातमी.”
शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारू विक्रीवर कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एक पुरुष व एक महिलेला अटक केली आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटना क्र. १—-
आरोपी: अंकुश दुर्योधन चौगुले (वय ५८), रा. कारखाना रोड, न्हावरे
गुन्हा नं: 418/2025
तपास अधिकारी: पो. अं. राजाराम शेटीबा गायकवाड
15 जून 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5:15 वाजता, कन्यादान मंगल कार्यालयाजवळील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना आरोपी अंकुश चौगुले यास पोलिसांनी पकडले. आरोपीकडून अंदाजे ₹900 किमतीच्या एक लिटरच्या 9 बाटल्या, एकूण 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
घटना क्र. २—-
आरोपी: नंदा लहु चौगुले (वय ४८), रा. कारखाना रोड, न्हावरे
गुन्हा नं: 419/2025
तपास अधिकारी: पो. अं. ईश्वर रावसाहेब चव्हाण
15 जून रोजी दुपारी 4:30 च्या सुमारास, न्हावरे गावातील कन्यादान मंगल कार्यालयाजवळील घराच्या मागील बाजूस, आरोपी नंदा लहु चौगुले हिच्याकडे बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. तिच्याकडून अंदाजे ₹800 किमतीच्या गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
कायदेशीर कारवाई—

या दोन्ही घटनांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) नुसार गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. आरोपींवर कायदेशीर कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलीसांचे आवाहन—
शिरूर पोलीस ठाण्याचे नागरिकांना आवाहन आहे की, आपल्या परिसरात अशा बेकायदेशीर दारू विक्रीबाबत माहिती मिळाल्यास पोलीसांना तत्काळ कळवावे. समाजातील अशा विघातक प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना —
✅
महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
दारूबंदी कायदा माहिती (Gov.in)
सत्यशोधक न्यूज | शिरूर तालुक्यातील बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
satyashodhak.bloghttps://satyashodhak.blog
1 thought on “Shirur Crime News : गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी दोन प्रकरणे दाखल, एक महिला आरोपी!”