Shirur Crime; सी टी बोरा कालेज समोरुन महिलेचे 1 लाख 28 हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र चोरट्यांनी खेचुन नेले.

Shirur Crime: शिरूर शहरातील सी. टी. बोरा कॉलेजसमोर एका महिलेच्या गळ्यातील 1 लाख 28 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी खेचून नेले. या धक्कादायक घटनेमुळे संबंधित महिला भीती व मानसिक तणावाने आजारी पडली. अखेर, त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.