
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर
Contents
शिरुर बस स्थानकातीलट महिलेचे दिवसाढवळ्या 2 लाख 12 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला !
शिरुर बस स्थानक बनले चोरट्यांचे ‘सोफ्ट टार्गेट’ !
शिरुर,दिनांक 11 सप्टेंबर : ( डॉ.नितीन पवार,संपादक यांच्याकडून )
शिरुर बस स्थानकातीलट महिलेचे दिवसाढवळ्या 2 लाख 12 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेले आहेत. ही महिला मुंबई येथील आहे.अलिकडच्या काळात शिरुर बस स्थानक हे चोरट्यांचे ‘सोफ्ट टार्गेट’बनले आहे.काय आहे याचे कारण? हे शोधणे शिरुर पोलिसांपुढे आव्हान आहे.
शिरूर बस स्थानकवर चोरी : महिला मुंबईतलि !
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानुसार हकीकत अशी की दिनांक १०/०९/२०२४ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास शिरूर ,तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत शिरूर बस स्थानक येथे शिरूर ते पुणे जाणार्या एका बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी प्रतिभा अमोल नांदवडेकर, वय- ३१ वर्षे, धंदा-घरकाम ,राहणार- रूम नंबर- ३०२ ,महालक्ष्मी अपार्टमेंट, विनायक नगर, मोरेगाव नालासेपारा, मुंबई यांचे २,१२०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून गेले आहेत. म्हणुन त्या अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटा अज्ञात….
अज्ञात चोरट्यांविरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता -303(2)नुसार शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार श्री.टेंगले हे आहेत.तर तपास अधिकारी श्री. उबाळे हे आहेत.हा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.