
Contents
- 1 Shirur Bus Stand Sting Operation; प्रिया बिरादार यांनी स्टिंग आपरेशन करत शिरुर बस स्थानक प्रमुखांची बोलती केली बंद ?(पहाटे व्हिडिओसह)
- 1.1 Shirur Bus Stand Sting Operation; शिरुर बस स्थानकात शौचालयात बेकायदेशीर पैसे घेताना कर्मचार्यास रंगेहात पकडले !
- 1.1.0.1 ” शिरुरचे बस स्थानक हा माजी आमदार अशोक पवार यांचा एक महात्वाकांक्षी प्रकल्प होता.सिन्नर,नाशिक शहरात असेच एक भव्य व सुंदर बस स्थानक आहे.त्या धरतीवर शिरुरचे बस स्थानक व्हावे,असा एक अभिमानास्पद असा हा विचार होता.यात शंकाच नाही.हा प्रकल्प नंतर आर्थिक व राजकीय आरोप प्रत्यारोपाचा विषय झाला.
- 1.1.0.2 मात्र सिन्नर पेक्षा भव्य व सुंदर असे शिरुर बस स्थानक शिरुरकरांना अभिमान वाटावा असे निर्माण झाले.मी स्वतः सिन्नरचे बस स्थानक पाहिले आहे.त्याच्या पेक्षा सरस शिरुरचे बस स्थानक झाले.म्हणजे दिसत आहे.मात्र ‘आतुन’ काही वेगळेच घडत होते.तो वेगळा विषय आहे.
- 1.1.0.3 पण आपल्याला चांगल्या पण सार्वजनिक वस्तु ,ठिकाणे यांची नासाडी कशी करायची हेच जास्त समजते.सर्वांना ! पुढे तिथे अस्वच्छता, घाणेरडा राहणारे बेवारसी लोक,भुरटे चोर,सर्वच महाग वस्तु,गाळे ठराविक लोकांना दिले जाणे वगैरे घडत आहे.
- 1.1.0.4 एवढ्या रक्कमेचे, भव्य आणि सुंदर असे बस स्थानक हे महाराष्ट्रतील एकमेव बस स्थानक आहे.शिरुरची ‘शान ‘आहे.ती सर्वांनी राखली पाहीजे,असे सत्यशोधक न्युज चे सर्वांना आवाहन आहे !”
- 1.1.0.5 —- संपादक
- 1.2 शिरुर बस स्थानक परिसर शिरुर शहरात चर्चेत राहिला आहे—
- 1.3 महिला अध्यक्षा प्रिया बिरादार—
- 1.4 अनेक बाबी उघडकीस आल्या—–
- 1.5 आणखीन दोन पोलिस कांस्टेबल नेमावेत ,अशी मागणी—-
- 1.1 Shirur Bus Stand Sting Operation; शिरुर बस स्थानकात शौचालयात बेकायदेशीर पैसे घेताना कर्मचार्यास रंगेहात पकडले !
Shirur Bus Stand Sting Operation; प्रिया बिरादार यांनी स्टिंग आपरेशन करत शिरुर बस स्थानक प्रमुखांची बोलती केली बंद ?(पहाटे व्हिडिओसह)
Shirur Bus Stand Sting Operation; शिरुर बस स्थानकात शौचालयात बेकायदेशीर पैसे घेताना कर्मचार्यास रंगेहात पकडले !
Shirur Bus Stand Sting Operation Mews 8 April 2025; (Satyashodhak News Report)
Shirur Bus Stand Sting Operation; प्रिया बिरादार यांनी स्टिंग आपरेशन करत शिरुर बस स्थानक प्रमुखांची बोलती केली बंद केली आहे. शिरुर बस स्थानकात शौचालयासाठी एका तरुणीकडुन बेकायदेशीर पैसे घेताना कर्मचार्यास रंगेहात पकडले गेले आहे. प्रिया बिरादर व त्यांच्या सहकारी महिला व पुरुष कार्यकर्त्यांंनी आज ही कारवाई करत शिरुर बस स्थानकातील अनेक प्रश्नांबाबत शिरुर बस स्थानक प्रमुख यांना निवेदन देवुन प्रवाशांच्या गैरसोई दुर करण्याची मागणी करणारे निवेदन शिरुर बस स्थानक प्रमुख यांना दिले आहे.प्रिया बिरादार या भारतीय जनता पक्ष शिरुर शहर महिला आघाडी अध्यक्षा आहेत.
” शिरुरचे बस स्थानक हा माजी आमदार अशोक पवार यांचा एक महात्वाकांक्षी प्रकल्प होता.सिन्नर,नाशिक शहरात असेच एक भव्य व सुंदर बस स्थानक आहे.त्या धरतीवर शिरुरचे बस स्थानक व्हावे,असा एक अभिमानास्पद असा हा विचार होता.यात शंकाच नाही.हा प्रकल्प नंतर आर्थिक व राजकीय आरोप प्रत्यारोपाचा विषय झाला.
मात्र सिन्नर पेक्षा भव्य व सुंदर असे शिरुर बस स्थानक शिरुरकरांना अभिमान वाटावा असे निर्माण झाले.मी स्वतः सिन्नरचे बस स्थानक पाहिले आहे.त्याच्या पेक्षा सरस शिरुरचे बस स्थानक झाले.म्हणजे दिसत आहे.मात्र ‘आतुन’ काही वेगळेच घडत होते.तो वेगळा विषय आहे.
पण आपल्याला चांगल्या पण सार्वजनिक वस्तु ,ठिकाणे यांची नासाडी कशी करायची हेच जास्त समजते.सर्वांना ! पुढे तिथे अस्वच्छता, घाणेरडा राहणारे बेवारसी लोक,भुरटे चोर,सर्वच महाग वस्तु,गाळे ठराविक लोकांना दिले जाणे वगैरे घडत आहे.
एवढ्या रक्कमेचे, भव्य आणि सुंदर असे बस स्थानक हे महाराष्ट्रतील एकमेव बस स्थानक आहे.शिरुरची ‘शान ‘आहे.ती सर्वांनी राखली पाहीजे,असे सत्यशोधक न्युज चे सर्वांना आवाहन आहे !”
—- संपादक
शिरुर बस स्थानक परिसर शिरुर शहरात चर्चेत राहिला आहे—
शिरुर बस स्थानक व परिसर गेल्या अनेक दिवसांपासुन चर्चेत राहिले आहे. त्याबाबत सत्यशोधक न्युज ने अनेक बातम्या दिल्या आहेत. शिरुरच्या बस स्थानकात अनेक चोर्या,दरोडा,महिला व मुलींची छेडछाड,काॅलेज तरुणांमधे हाणामारी,अस्वच्छता, बेवारस इसम तेथे राहणे,बेकायदेशीर वेश्या व्यवसायासाठी तरुणी तेथे वावरणे,दलाल वावरणे,फसवणुक होणे,बाजुच्या झोपडपटटीत बेकायदेशीर गांजा विकला जाणे,मटका क्लब ,जुगार अड्डा,वेश्यावृत्तीच्या काही स्रीया राहणे (सर्व नाही) सर्व प्रकारांनी हा परिसर शिरुर शहरात चर्चेत राहिला आहे.अर्धात सर्व झोपडफट्टी वासी अशा प्रकरचे नाहीत. पण काहींमूळे परिसराचे नाव खराब होते.
महिला अध्यक्षा प्रिया बिरादार—
भारतीय जनता पक्षाच्या शिरुर शहर महिला अध्यक्षा प्रिया बिरादार व त्यांच्या सहकार्यांनी याबाबत आज स्टिंग आपरेशन केले.एक महिला कार्यकर्ती स्वच्छताग्रहातुन बाहेर येते. दोन्ही बाजुंनी व्हिडिओ शुटींग केले जात होते.एक दुसरी तरुणी शौचालयात जावुन आली.शौचालय कामगाराने बेकायदेशीरपणे तिच्याकडुन पैसे घेतले.महिला कार्यकर्त्यीकडुन देखील पैशाची मागणी केली.त्याच वेळेस प्रिया बिरादर व त्यांची टिम यांनी या कर्मचार्यास जाग्यावर जाब विचारला. महिलांना शौचालयासाठी मोफत सुविधा असताना असे पैसे घेतले जात होते.हा सर्व प्रसंग व्हिडिओत बंद करण्यात आला.
अनेक बाबी उघडकीस आल्या—–
नंतर सत्यशोधक न्युज ला याबाबत कळवण्यात आले.सत्यशोधक न्युज ने त्या ठिकाणी पाहणी केली. त्यात अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत.शिरुर बस स्थानकात 15 रुपये किंमतीची पाण्याची बोटल 20 रुपयांना विकली जाते.बस गाड्या सर्व जुन्या आहेत.व्यवस्थापन कशाचेच नीट नाही. योग्य फलाट क्रमांकावर योग्य ती बस उभी रहात नाही.बस काही वेळा एक दोन तास उशिराने निघते.किंवा अचानक रद्द केली जाते. त्यामुळे विशेषता शिरुर, श्रिगोंदा व पारनेर तालुक्यांमधे जाणार्या प्रवाशांची तारांबळ उडते.पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई नेमकी महिला स्वच्छतागृहाजवळ आहे.त्यामुळे तेथे महिलांना व पुरुषांना देखील पाणी पिताना वगैरे वेळी लज्जाभाव निर्माण होतो.तसेच बर्याच वेळा या पाणपोईवर पाणी उपलब्ध नसते.पंखे चालु नसतात.
आणखीन दोन पोलिस कांस्टेबल नेमावेत ,अशी मागणी—-

बस स्थानकात येणार्या व जाणार्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.बस स्थानकात सध्या एक होमगार्ड महिला कार्यरत आहेत. पण आणखीन दोन पोलिस कांस्टेबल नेमावेत ,अशी मागणी करण्यात आली आहे.शिरुर शहर भारतीय जनता पक्ष महिला आघाडी अध्यक्षा प्रिया बिरादर यांनी बस आगार व्यवस्थापक सौ.मनिषा गायकवाड यांना या विविध समस्या सोडवण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे.
या मागण्या पूर्ण न झाल्यास भारतीय जनता पक्ष महिला आघाडी शिरुर याबाबत कायदेशिरपणे आंदोलन करतील,असा इशारा देखील दिला आहे.