
शिरुर पोलिस स्टेशन
Contents
- 1 Shirur Accident News : न्हावर्याजवळ भीषण अपघात; 3 जण ठार !
Shirur Accident News : न्हावर्याजवळ भीषण अपघात; 3 जण ठार !
Shirur Accident News:चालक अज्ञात,शिरुर तालुका हादरला!
Shirur Accident News 24 March 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Accident News : न्हावर्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जण ठार झाले आहेत. तर 1 महिला जखमी झाली आहे.चालक अज्ञात आहे.शिरुर पुढील तपास करत आहेत. मात्र या भीषण अपघाताने
चालक शिरुर तालुका हादरला आहे.
Read more >>
Shirur Taluka Crime: नवर्याने रागात घरसामान पेटवले म्हणुन बायकोने नवर्याला पोलिस स्टेशन मधे नेले !
सविस्तर हकीकत अशी आहे—
सविस्तर हकीकत अशी आहे. दिनाक 23 मार्च 2025 रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास न्हावरे ,तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे या गावच्या हद्दीत फिर्यादी रविंद्र महादेव सोनवणे, वय -38 वर्षे ,व्यवसाय- शेती, राहणार – कुटेवस्ती, न्हावरे, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे त्यांच्या
आत्याचा मुलगा कैलास कृष्णाजी गायकवाड हा त्याच्या ताब्यातील पांढर्या रंगाची स्वीप्ट कार गाडी नंबर- एम.एच.16 सी. व्ही. 4176 मध्ये त्याची पत्नी दुर्गा कैलास गायकवाड ,मुलगी गौरी कैलास गायकवाड व चुलत मेव्हणे गणेश महादेव नेर्लेकर यांना बसवून ते वाघोली -पुणे येथून न्हावरे येथे येत होते.
Read more >>
कंटेनरची स्वीफ्ट कारला जोरात धडक–
त्यावेळी ते तळेगाव ढमढेरे ते न्हावरे रोडने संदिप महादेव सरके यांच्या घराशेजारी रोडवर आले.तेव्हा समोरून न्हावरे बाजुकडून तळेगाव कडे जाणारा कटेनर ट्रक नंबर एन. एल. 05 जी 2396 वरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील कटेनर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जोरात चालवलेला होता.यात समोरून येणार्या स्वीफ्ट कारला जोरात धडक दिली.कारचा अपघात होऊन अपघातात कार चालक आत्याचा मुलगा 1) कैलास कृष्णाजी गायकवाड, वय -49 वर्षे. 2) गौरी कैलास गायकवाड ,वय -20 वर्षे, राहणार – निंबाळकर वस्ती, न्हावरे, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे 3) गणेश महादेव नेर्लेकर, वय- 23 वर्षे ,राहणार- कोकणगाव, तालुका- श्रीगोंदा, जिल्हा – अहिल्यानगर यांना लहान मोठ्या जखमा झाल्या.
Read more >>
त्यांच्या मृत्यु झाला. तर दुर्गा कैलास गायकवाड, वय- 45 वर्षे ,निबाळकर वस्ती, न्हावरे हे गंभीर जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनाचे नुकसान झाले.या अपघाताला कंटेनर ट्रक नंबर एन एल 05 जी. 2396 वरील अज्ञात चालक (नाव गाव माहीत नाही ) कारणीभूत झाला आहे.
मृत्युमुखी व्यक्तींची नावे-
1) कैलास कृष्णाजी गायकवाड, वय- 49 वर्षे.
2) गौरी कैलास गायकवाड, वय- 20 वर्षे, राहणार, निंबाळकर वस्ती, न्हावरे,तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे .
3) गणेश महादेव नेर्लेकर, वय- 23 वर्षे, राहणार-कोकणगाव, तालुका-श्रीगोंदा, जिल्हा- अहिल्यानगर
अपघाताची खबर न देता हा चालक पळून गेला आहे. म्हणून फिर्यादी रविंद्र महादेव सोनवणे, वय -38 वर्षे ,व्यवसाय- शेती ,राहणार – कुटेवस्ती, न्हावरे, तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे यांनी
कंटेनर ट्रक नंबर-एन एल 05 जी. 2396 वरील अज्ञात चालकाविरुध्द कायदेशीर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे केली आहे .
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
पुढील तपास शिरुर पोलीसांकडुन सुरु—
शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर 203/2025 असा आहे.आरोपी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 106 (1) (2),125 (अ), 125 (ब) 324 (4), 281 सह मोटर वाहन कायदा कलम 184,134/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार पवार हे आहेत.तर पुढील तपास पोलिस हवालदार भोते हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.