
Contents
- 1 शिरुर तालुक्यात 2,66,200 रुपये किमतीचा मुरुम गेला चोरीला !
- 1.1 शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील दोघांवर गुन्हा दाखल !
- 1.1.1 शिरुर, दिनांक 29 जानेवारी 2025 ; ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 शिरुर मुरूम चोरी प्रकरणात फिर्यादी महिला अधिकारी !
- 1.1.3 शिरुर मुरुम चोरी ची घटना शिरसगाव काटा येथील !
- 1.1.4 मुरुम चोरी घटनेतील चोरी 2,66,200 रुपये किमतीची !
- 1.1.5 मुरुम चोरी प्रकरणात गुन्हा खालील कायद्याप्रमाणे –
- 1.1.6 About The Author
- 1.1 शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील दोघांवर गुन्हा दाखल !
शिरुर तालुक्यात 2,66,200 रुपये किमतीचा मुरुम गेला चोरीला !
शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील दोघांवर गुन्हा दाखल !
शिरुर, दिनांक 29 जानेवारी 2025 ; ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
शिरुर तालुक्यात 2,66,200 रुपये किमतीचा मुरुम चोरीला गेला आहे. हा प्रकार शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथेे घडला आहे.येथील दोघांवर याप्रकरणी गुन्हा शिरुर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत.’शिरुर‘
Read more >>
शिरुर तालुक्यात अपघातात 43 वर्षीय इसम मृत्युमुखी तर दुसर्या घटनेत एस की बसचे 130 लिटर डिझेल चोरीला !
शिरुर तालुक्यात अपघातात 43 वर्षीय इसम मृत्युमुखी तर दुसर्या घटनेत एस की बसचे 130 लिटर डिझेल चोरीला !
शिरुर मुरूम चोरी प्रकरणात फिर्यादी महिला अधिकारी !
या प्रकरणी फिर्यादी सौ. प्रमिला नागेश वानखेडे ,वय- ४२ वर्षे ,व्यवसाय- नोकरी (प्राममहसुल अधिकारी) आहेत. त्या राहणार तक्षशिला सोसायटी, बिल्डींग ए, फ्लॅट नं. ४०४, पठारे दुबे नगर जवळ, खराडी बायपास पुणे येथे राहतात. त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सिरसगाव काटा येथील मुरूम अज्ञात इसमाने स्वतःचे आर्थिक फायदयासाठी चोरुन नेला आहे. शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशिरपणे त्याने तो मुरुम चोरी करून चोरून नेले आहे.
Read more >>
रात्रीस खेळ चाले…..’ या बातमीनंतर येत आहे आणखीन माहिती उघडकीस ? ( पहा व्हिडीओ सह)
शिरुर मुरुम चोरी ची घटना शिरसगाव काटा येथील !

फिर्यादी अधिकारी असल्याने त्यांनी सदर बाबत माहिती घेतली. त्यात सदरचे उत्खनण हे शिरसगाव काटा ,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे येथील सोनबा कोळपे व धनंजय काळे यांनी केले असल्याचे त्यांना समजले आहे.
मुरुम चोरी घटनेतील चोरी 2,66,200 रुपये किमतीची !
तरी दिनांक 25/01/2025 रोजी 16/10 वाजण्याच्या . पुर्वी शिरसगाव काटा ,तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे येथील जमिन गट नं. 650 यामधील 2,66,200 रु किमतीचा 200 ब्रास मुरूम
(1) सोनबा कोळपे
2) धनंजय काळे
दोघे राहणार – शिरसगाव काटा ,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरी करून चोरून नेले आहे. शी फिर्याद करत वरील दोघाच्या विरूध्द भारतीय न्याय, संहीता कायदा कलम 303(2), 3(5) सह
Read more >>
मुरुम चोरी प्रकरणात गुन्हा खालील कायद्याप्रमाणे –

1. खान व खनिज विकास व विनीयमन अधिनीयम 1957 चे कलम 4 (अ),
2. पर्यावरण संरक्षण अधिनीयम कलम 9,15,
3. सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनीयम 1984 चे कलम 3,4
प्रमाणे सरकारतर्फे रितसर तक्रार शिरुर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. दाखल अमंलदार पोलीस हवालदार श्री. खेडकर हे आहेत.तर पुढील तपास अमंलदार पोलीस हवालदार श्री. शिंदे हे आहेत.
प्रभारी आधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे ,शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
1 thought on “शिरुर तालुक्यात 2,66,200 रुपये किमतीचा मुरुम गेला चोरीला !”