
Contents
- 1 Shantinagar Zopadpatti ;
शांतीनगर झोपडपटटी विनयभंगातील आरोपी फरार !
- 1.1 Shantinagar Zopadpatti : शांतीनगर झोपडपटटी त बेकायदेश दारु विक्री,मटका अडा आणि जुगार अड्डा देखील चालतो !
Shantinagar Zopadpatti ;
शांतीनगर झोपडपटटी विनयभंगातील आरोपी फरार !
Shantinagar Zopadpatti :
शांतीनगर झोपडपटटी त बेकायदेश दारु विक्री,मटका अडा आणि जुगार अड्डा देखील चालतो !
Shirur Crime News 16 March 2025:
(Satyashodhak News Report)
Shantinagar Zopadpatti विनयभंग प्रकरण समोर येत असताना ताजी अपडेट
शांतीनगर झोपडपटटी विनयभंगातील आरोपी फरार झाला आहे. अशी आहे.मात्र सत्यशोधक न्युज कडे येथील स्थानिक सुत्रांकडुन आणखीन माहिती सत्यशोधक न्युज ला प्राप्त होत आहे. त्यानुसार शांतीनगर झोपडपटटीत
शांतीनगर झोपडपटटीत बेकायदेश हातभट्टी दारु विक्री,अडा आणि जुगार अड्डा देखील चालतो ! शिवाय एक ग्रहस्थ याठिकाणी बेकायदेशीर गांजा देखील विकत असतो अशी माहिती प्राप्त झाली आहे.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
Shantinagar Zip aparri एका तरुणीचा विनयभंग—-
शिरुर पोलिस स्टेशन मधे काल या झोपडपटटीतील एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला होता. त्याबाबतची तक्रार संबंधित तरुणीने (नाव गुप्तता ) शिरुर पोलिस स्टेशन मधे केली होती.आरोपी सुरेश पोपट लोंढे याच्यावर भारतीय न्याय संहिता कायदा कलम कलम३३३,७४,३५२, ३५१(२),३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस हवालदार श्री. खोळदकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र आरोपी सुरेश पोपट लोंढे याने तेथुन पळ काढला आहे. तो फरार झाला आहे. शिरुर पोलिस त्याचा तपास करत आहेत. ‘लवकरच आरोपीला पोलीस बेड्या ठोकतील’ असे श्री.कोथळकर यांनी सत्यशोधक न्युज #satyashodhaknews ला सांगितले आहे.
Read more>>
शांतीनगर झोपडपटटीत लिंगपिसाटाचा कारनामा ?
मात्र या बातमीनंतर शांतीनगर झोपडपटटी परिसरातील नागरिकांकडुन सत्यशोधक न्युज कडे आणखीन माहिती दिली आहे. तसेच शांतीनगर झोपडपटटी हा अनेक बेकायदेशीर धंद्यांचे केंद्र बनले आहे. असे सांगितले जात आहे.
बेकायदेशीर हातभट्टी दारु विक्रीचे धंदे—

शांतीनगर झोपडपटटीत तीन बेकायदेशीर हातभट्टी दारु विक्रीचे धंदे रासरोज चालतात.एक मटका अड्डा देखील चालतो.जुगारीचे दोन अड्डे देखील चालतात.अशी माहिती मिळत आहे. एक ,’सज्जन ‘ (?) ग्रहस्त बेकायदेशीर व गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जाणारा गांजा या अमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करतो.हा त्याच्या राहत्या घरी, बस स्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करतो.त्याचे ठरलेले ग्राहक त्याच्याकडुन बेकायदेशीर गांजा विकत घेतात.असा हा नित्यक्रम रासरोजपणे चालतो.हा त्याच्या घरी बेकायदेशीर हातभट्टी दारु देखील अल्पवयीन मुला मुलींना ती विक्री करण्याकरता बसवत असतो.छोटी वस्ती पण कारनामे मोठे असा हा प्रकार आहे.अशी माहिती मिळाली आहे.

येणार्या जाणार्या मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार–
मात्र या सर्व धंद्यांचा त्रास याच वस्तीतील सभ्य कुटुंबांना होतो.अशी येथील काही कुटुंबांची तक्रार आहे.या झोपडपटटीला लागुन रेव्हेन्यू कालनी, तहसिलदार सरकारी निवास,पोलिस अधिकारी सरकारी निवास, बसस्थानक,काॅलेज, शाळांना जाणार्या मुला मुलींचा रस्ता अशा सर्व बाबींमुळे सभ्य कुटुंबांना त्रास होतो.कोपर्यावरील चौकात रोड रोमिओ, इतर बेरोजगार तरुणापैकी काही येणार्या जाणार्या मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार घडतात.रात्री उशीरा बसस्थानकातील प्रवाशांच्या वस्तु चोरणे,बांधकाम वस्तु चोरणे,उचलणे,बस स्थानकाच्या शौचालयात दादागीरी करणे,फोनवर तासभर बोलणे,वर तेथील शौचालय चालकाला दम देवुन निघुन जाणे,पेसे न देणे,शौचालयाच्या विविध वस्तु चोरणे असे एक ना अनेक प्रकार इथे घडत असतात.
Read more >>
त्यामुळे शिरुर पोलिसांनी या भागातील असामाजिक तत्वांचा बिमोड वेळीच केला पाहिजे असे नागरिक सांगतात.अन्यथा पुढे जावुन हा भाग गुन्हेगारीचे केंद्र व ,’रेड लाईट‘ एरियामधे परिवर्तीत होणे आता फार लांबची गोष्ट राहिली नाही.