
Contents
- 1 Sex to Superconciousness संभोगातुन समाधीकडे जाता येते का ? एक चिंतन !
- 1.1 Sex to Superconcious संभोगातुन समाधीकडे जाणारा ओशो रजनीश यांचा मार्ग : एक चिंतन !
- 1.1.1 शिरुर,दिनांक 5 फेब्रुवारी 2025 : ( विशेष संपादकीय, सत्यशोधक न्युज )
- 1.1.2 Sex to Superconciousness : मी कोण ?
- 1.1.3 Sex to Superconciousness : धर्मांचा उदय !
- 1.1.4 Sex to Superconciousness : पवित्र ग्रंथ !
- 1.1.5 Sex to Superconciousness : विज्ञानाचा उदय !
- 1.1.6 Sex to Superconciousness : Sex आणि समाधी !
- 1.1.7 Sex to Superconciousness : संभोग निंदनिय मानला !
- 1.1.8 Sex to Superconciousness : ओशो रजनीश –
- 1.1.9 Sex to Superconciousness : संभोग एक ध्यानच ! Meditation!
- 1.1.10 Superconcious समाधी —
- 1.1.11 Sex to Superconciousness : अत: दिप भव —
- 1.1.12 About The Author
- 1.1 Sex to Superconcious संभोगातुन समाधीकडे जाणारा ओशो रजनीश यांचा मार्ग : एक चिंतन !
Sex to Superconciousness संभोगातुन समाधीकडे जाता येते का ? एक चिंतन !
Sex to Superconcious संभोगातुन समाधीकडे जाणारा ओशो रजनीश यांचा मार्ग : एक चिंतन !
शिरुर,दिनांक 5 फेब्रुवारी 2025 : ( विशेष संपादकीय, सत्यशोधक न्युज )
(Thanks for Images in this content to pixabay.com )

Sex to Superconciousness अर्थात संभोगातुन समाधीकडे जाता येते का ? यावर चिंतन या लेखात करत आहोत. हा मार्ग अर्थात अध्यात्मिक Spiritual मार्ग Sex to Superconcious संभोगातुन समाधीकडे जाणारा जगात प्रथम ओशो रजनीश यांनी मांडला होता. त्याआधी तत्वज्ञानात असे चिंतन झालेले नव्हते असे नाही.पण जितक्या प्रभावी आणि तार्किक पद्धतीने Osho Rajnish ओशो रजनीश यांनी जगापुढे मांडला.तितका त्याधी कुणी मांडलेला नव्हता.आणी जगाच्या कानाकोपर्यात हा विषय ओशो रजनीश यांनी नेला होता. तो 70 /80 च्या दशकात ! यावर आज या विषयाची थोडी चर्चा व माहिती आमच्या वाचकांना करुन द्यावी, हा आमचा लेखनामागील उद्देश आहे.
Sex to Superconciousness : मी कोण ?

मानवी समाजाच्या इतिहासात मानवाने अनेक अगणित संकल्पनांचा विचार केला.त्या निर्माण केल्या.अनेक अंगांनी सत्य शोधण्यासाठी प्रयत्न केले. पण सर्वात मोठा प्रश्न ‘मी कोण?’ हा मानवाला अद्याप सोडवता आला नाही. वरवर आपण समजतो की मी अमुक अमुक नावाचा ,गावचा,देशाचा,धर्मीचा व्यक्ती आहे.पण हा तो ‘मी’ नाही ! तर जो हे पहात आहे की हा प्रश्न अमुक नावाच्या शरिरातील मन किंवा बुद्धी हा प्रश्न विचारत आहे.शोधत आहे.’तो’ कोण आहे. तो हे शरीर नाही .तर त्या पेक्षा अधिक वेगळा आहे. तो कोण आहे? असा हा प्रश्न आहे.
Read more >>
Sex to Superconciousness : धर्मांचा उदय !

या प्रश्नातुन तत्वज्ञान जन्माला आले.माणुस उत्कांत झाला.हे आपण मान्य करु.किंवा तो कोनत्यातरी शक्तीने तो निर्माण केला.असेही आपण मान्य करु. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तंतोतंत सपुरावा अजुन मिळालेले नाही. सर्व धर्मांचा उदय देखील या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातुनच झाला.वेगवेगळ्या कालखंडात मानवाकडे असणारी त्याची इंद्रियें आणि त्याने निर्माण केली साधने कमी अधिक विकसित अशी होती.आजचा मानव सर्वात विकसित मानव आहे.
Sex to Superconciousness : पवित्र ग्रंथ !

या प्रश्नाचे उत्तर परमात्म्याने मानवामधेच निर्माण करुन ठेवलेले आहे. पण ते शोधण्यासाठी याला प्रयत्न करावे लागतील.असे पुर्वेकडील तत्वज्ञानी पुरुषांनी प्रामुख्याने सांगितले आहे.तर पश्चिमेकडील तत्वज्ञानी पुरुषांनी ईश्वर,किंवा त्या पुत्र किंवा त्याचे संदेष्टे यांना या प्रश्नाचे उत्तर सांगितले. त्यांना मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी पाठवले.त्यांनी ‘पवित्र’ ग्रंथांतुन ते सांगितले आहे, असे सांगितले गेले.
Read more >>
Sex to Superconciousness : विज्ञानाचा उदय !

पण विज्ञान आल्यानंतर जेव्हा अशा ग्रंथांमधील काही बाबी चुकीच्या आहेत.हे सप्रमाण सिद्ध केले गेले.तेव्हा या ग्रंथांतील माहिती प्रमाण मानण्याबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले.सर्व बाबी नव्याने तपासण्याची पद्धत व गरज इथेच निर्माण झाली. विज्ञान असे या नव्या पद्धतीला म्हटले गेले.पण विज्ञान अंतिम सत्य काय आहे हे शोधण्याच्या प्रयत्नात अजुनही आहे.
Sex to Superconciousness : Sex आणि समाधी !

इथे संभोग अर्थात Sex आणि समाधी Superconciousness या या दोन बाबींचा अंतीम सत्याशी काही संबंध आहे का ? हा आपण विचार करत आहोत.Sex संभोग म्हणजे मानवासहीत सर्व सजिव जगात पुरुष Male आणि स्री Female यांच्यात लैंगिक समागम होते.तो भाग मानला जातो.तो प्रत्येक सजिव जगात अपरिहार्यच आहे.ते सजिवांचे अस्तित्व प्रजननाद्वारे कायम ठेवणे यासाठी म्हणजे जीव हे मर्य असल्याने नवीन जीव निर्माण करण्यासाठी एक सर्वात मुलभुत प्रवृत्ती आहे. असणे आवश्यक ही आहे.कारण सजिव मर्त्य आहेत म्हणुन ! या संभोग क्रियेत सजिवांना उती उत्कट,रोमांचक,तीव्र असा आनंद होत असतो.तितका तीव्र आनंद इतर कोनत्याही क्रियेत होत नाही. हा सर्वात उच्च पातळीचा ! आणि तो तसा का? इथेच अंतिम सत्य काय आहे? याच्या उत्तराची हिंट मानवाला अंतिम सत्य शोधण्याच्या प्रयत्नात देण्यात आली आहे. असे ओशो रजनीश यांनी सांगितले.
संबोध क्रियेतील परमोच्च आनंदाचा जो बिंदु आहे.पिक पाइंट आहे.तो दिशादर्शक आहे.असे ओशो रजनीश यांनी सांगितले.
Read more >>
प्रजनन क्षमता स्रियांच्या शिक्षणामुळे कमी होते ; कारण.. अ,ब,क,ड ?
Sex to Superconciousness : संभोग निंदनिय मानला !
समाधी Superconciousness ही एक अंतिम अवस्था आहे. ती अवस्था अंतिम सत्य ज्या अवस्थेत अनादी अनंत Eternal असते.त्या अवस्थेत असते.असे ओशो रजनीश यांनी प्रतिपादित केले आहे. म्हणुन संभोग अध्यात्मिक आहे.पण मानवाने संभोगाला निंदनिय मानले ही सर्वात मोठी चुक झाली .अर्थात विकृत संभोग निर्माण झाला. आणि अध्यात्मिक संबोध मानवाला सांगण्यात पुर्वीचे तत्वज्ञ कमी पडले.म्हणुन मानव विकृत अवस्थेत आहे.
Sex to Superconciousness : ओशो रजनीश –
मानवाने समाधी अवस्थेकडे जाण्यासाठी कर्म,योग,भक्ती,ध्यान,कर्मकांड असे अनेक मार्ग व ईश्वरासह ‘अहं ब्रम्हास्मी’ पर्यंत मार्ग सांगितले गेले.आजही ते आचरणाचा प्रयत्न केला जातो.
ओशो रजनीश यांनी स्वतः ध्यानाच्या 108 पद्धती सांगितल्या. त्यात त्यांनी संभोग हा ही एक मार्ग सांगिण्याचे धाडस केले.त्याचे तर्कशुध्द विश्लेषण केले.त्यावर भाष्य केले. त्यावर त्या आश्रमांमधे प्रयोगही केले.
Read more >>
शिरुर मधील ख्रिश्चन धर्मियासाठी कुठेही सांस्कृतिक भवन नाही ! दफनभूमीत उभे राहता येईना…..
Sex to Superconciousness : संभोग एक ध्यानच ! Meditation!
मात्र लोक संभोग शब्दावरुन या विषयाकडे आकर्षित झाले.कारण आजपर्यंत सांगितल्या गेलेल्या,उपदेशित केल्या गेलेल्या ,निषेध केला गेल्या,तुच्छ मानल्या गेलेल्या ,बदनाम केल्या गेलेल्या संभोग या क्रियेला,शब्दाला पाहुन !
पण ओशो रजनीश यांनी संभोग हे ध्यानच आहे असते असे सांगितले. मार्ग असतो.असे सांगितले. साध्य समाधी हेच आहे.असे सांगितले. संभोगातुन संभोगाच्या पलिकडे जाणे आवश्यक असते असे सांगितले. ज्या ज्या कामना ,वासना यांमुळे माणुस त्यातच अडकुन पडलेला आहे. त्यांच्या त्याग करुन,त्यापासुन पळुन जावुन,त्या निषिध्द ठरवुन ,पाप ठरवुन,दमन करुन त्या मानसाचा पिच्छा सोडत नाहीत.तर जितक्या जास्त दडपल्या जातात.तितक्या जास्त खोलवर रूतून राहतात. आणि विकृत स्वरूपात बाहेर येतात.आणि मानवी वर्तनावर विकृत परिणाम करतात. म्हणुनच माणुस सत्य,शांती,सुख,आनंद,समाधान यांस मुकलेला आहे.असे एकुण ओशो रजनीश यांनी जगाला सांगितले.त्याचा जगात प्रचंड प्रभाव पडला.त्यांचे विचार टाळता येत नाहीत.एक तर मान्य करावे लागतात.किंवा विरोध करावा लागतो.पण तो विचार टाळुन पुढे जाता येत नाही.
Superconcious समाधी —
एक दुसरे महत्वाचे हे आहे की Superconciousness ज्याला समाधी म्हणतात.ती अंतीम अवस्था आहे, असे सांगितले गेले आहे.या अवस्थेचे वर्णन करण्यासाठी कोनता शब्द नाही.कारण ती पुर्ण तेची अवस्था असते.शब्द मधी आणला तर ती शब्दात समाविष्टीत होवु शकत नाही. ती अखंड आहे.अनादी आहे.अनंत आहे.म्हणुन ती फक्त अनुभवण्याची अवस्था आहे. वर्णन करण्याची किंवा सांगण्याची अवस्था नाही.म्हणुन त्या मार्गावर व्यक्तीला स्वतःच चालावे लागते.
Read more >>
Sex to Superconciousness : अत: दिप भव —
अंत: दिप भव असा तो मार्ग आहे.त्यालाच Enlightenment साक्षात्कार किंवा बुद्ध अवस्था, साक्षीभावात स्थिर होण्याची अवस्था असे ओशो रजनीश यांनी सांगितले आहे.ती अवस्थाच ,’मी’ अवस्था असते. केवळ असणे असते.साक्षी असणे हे असते.Superconciousness असणे हे असते.आता इथे एवढेच !
1 thought on “Sex to Superconciousness संभोगातुन समाधीकडे जाता येते का ? एक चिंतन !”