
Contents
Ankhin Ek Bepatta :शिरुर मधुन आणखीन एक बेपत्ता ? कोण व का ? वाचा या बातमीत!
Ankhin Ek Bepatta: 14 एप्रिलपासून बेपत्ता ? कुटुंबीयांची शोधासाठी विनंती !….
Ankhin Ek Bepatta Shirur 17 April 2025:
(Satyashodhak News Report)
Ankhin Ek Bepatta: शिरूर (पुणे) येथुन शिरूर, गुजरमळा येथून 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता आपल्या राहत्या घरातून बाहेर गेलेले गिरीश सुरेश मराठे (वय – 44 वर्ष) हे अद्याप परतलेले नाहीत. त्यांची आई शीला सुरेश मराठे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिस .स्टेशन मा.मि.रजिस्टर नंबर नंबर- 61/2025 अन्वये बेपत्ता म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Read more >>
Ankhin Ek Bepatta:मिसिंगची माहिती —
बेपत्ता व्यक्तीचे नाव गिरीश सुरेश मराठे, वय 44 वर्षे, राहणार गुजरमळा, शिरूर, पुणे.
• शारीरिक वर्णन :
• वर्ण: गोरा
• उंची: 5 फूट 5 इंच
• बांधा: मजबूत
• केस: बारीक
• मिशी: राखलेली
• अंगावरील कपडे: निळ्या रंगाचा कॉलर असलेला हाफ बाह्याचा शर्ट व काळ्या रंगाची पँट
Read more >>
घटना कशी घडली?
14 एप्रिल रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास गिरीश मराठे यांनी आपल्या आईला “मी थोड्या वेळात येतो, तुम्ही जेवण करून घ्या” असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कुठलाही ठावठिकाणा न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Read more >>
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
ही तक्रार पोलीस नोंद क्रमांक 57/2025 अन्वये 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5.52 वाजता नोंदविण्यात आली. प्रकरणाचा तपास पोलिस.हवालदार खेडकर हे करत असून प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
नागरिकांना विनंती :
गिरीश सुरेश मराठे यांच्याविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास खालील मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा अशी विनंती त्यांच्या आईने केली आहे.
शीला सुरेश मराठे (आई) – 9359242195