
Contents
- 1 Ranjangaon Sandas News : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथेही फिर्याद प्रति फिर्याद: जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल!
Ranjangaon Sandas News : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथेही फिर्याद प्रति फिर्याद: जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल!
Ranjangaon Sandas News 20 April 2025 :
(Satyashodhak News Report )

रांजणगाव सांडस येथे 18 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता झालेल्या एका गंभीर हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 262/2025 अन्वये विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोडण्याचा कोयता, लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण—
फिर्यादी दशरथ गुलाबराव शितोळे ,वय -69 वर्षे, व्यवसाय – शेती, राहणार- रांजणगाव सांडस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, टोकरवाट रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादात सात आरोपींनी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. या आरोपींनी उस तोडण्याचा कोयता, लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे.
Read more >>
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे—
1. सुरेश चंदर रणदिवे
2. मधुकर लक्ष्मण रणदिवे
3. निखिल मधुकर रणदिवे
4. अक्षय मधुकर रणदिवे
5. प्रशांत सुरेश रणदिवे
6. अनिल ऊर्फ बाबु सुरेश रणदिवे
7. साधना प्रमोदकुमार बोथरा (रा. इगतपुरी, नाशिक)
या सर्वांनी फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय – संभाजी, शशिकला, बाळासाहेब, स्वामिनाथ, तानाजी, नंदकुमार, शोभा शितोळे यांच्यावर गंभीर हल्ला केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
Read more >>
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —
या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 126(2), 118(1), 189(2), 191(2)(3), 190, 352, 351(2), 125(A), 324(4) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25, 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
• गुन्हा दाखल तारीख व वेळ: 20 एप्रिल 2025 रोजी पहाटे 12:38 वाजता.
• स्टेशन डायरी नंबर: 04/25
• दाखल अंमलदार: पोलिस हवालदार श्री. राउत
• तपास अधिकारी: सफौ श्री.बनकर
• प्रभारी अधिकारी: श्री.संदेश केंजळे,पोलिस निरीक्षक.
Read more >>
Shirur Shanti Nagar News: शिरूरममधील शांतीनगर मधे हळदीच्या कार्यक्रमात वाद, महिलेसह मुलाला मारहाण !
पोलीस तपास सुरू असून, पुढील कारवाईसाठी संबंधित आरोपींविरुद्ध कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३१ मध्ये काय वाचाल ..👇
• भारताच्या शासन संस्थेचे सर्वंकष आरिष्ट व त्याची क्रांतीकारक सोडवणुक…..
• शूर्पनखेच्या जनस्थानाचा काम्रेड शरद पाटील पुरस्कृत शोध…
• एक सांस्कृतिक युगप्रवर्तरक शाहिर गव्हाणकर….
मावळाई प्रकाशन ची पुस्तकें. …