
Contents
- 1 रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी केला ‘करेक्ट गेम’! ‘डिझेल चोरां’ च्या टोळीचा केला पर्दाफाश !(पहा व्हिडिओसह)
- 1.1 रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी 6 गुन्हे व 95,000/- रुपयांची डिजेल चोरी आणली उघडकीस !
- 1.1.1 शिरुर,दिनांक -15 जानेवारी : (डॉ.नितीन पवार )
- 1.1.2 रांजणगाव एम आय डी सी पोलिस पथक होते कार्यरत !
- 1.1.3 रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल!
- 1.1.4 गोपनीय माहिती मिळाली….
- 1.1.5 75000 रुपये व 2000 रुपये किमतीची बॅटरी जप्त. ..
- 1.1.6 वरिष्ट पोलिस अधिकार्यांचा सहभाग. …
- 1.1.7 About The Author
- 1.1 रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी 6 गुन्हे व 95,000/- रुपयांची डिजेल चोरी आणली उघडकीस !
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी केला ‘करेक्ट गेम’! ‘डिझेल चोरां’ च्या टोळीचा केला पर्दाफाश !(पहा व्हिडिओसह)
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी 6 गुन्हे व 95,000/- रुपयांची डिजेल चोरी आणली उघडकीस !
शिरुर,दिनांक -15 जानेवारी : (डॉ.नितीन पवार )
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी ‘करेक्ट गेम’ केला आहे. ‘डिझेल चोरां’च्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तर रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी त्याचबरोबर 6 गुन्हे व 95,000/- रुपयांची डिजेल चोरी उघडकीस आणली आहे. या
अवजड वाहनांच्या डिझेल चोरी करणाऱ्या आरोपींना रांजणगाव एमआयडीसी
पोलिसांनी पर्दाफाश करत सहा गुन्हेही उघडकीस आणले आहेत.वरिष्ट पोलिस अधिकार्यांसह रांजणगाव पोलिसांनी हे यश मिळवल्याची बातमी आहे.पुढील तपास रांजणगाव एम आय डी सी पोलिस करत आहेत.
रांजणगाव एम आय डी सी येथील पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहनांची आवक जावळ चालू असते. कंपनीमध्ये माल घेऊन आलेले आलेली वाहने रात्रीच्या वेळी एम आय डी सी मधील पार्किंग तसेच रोड लगत लावून चालक झोपी जात असतात. अशावेळी त्याच्या वाहनांमधील डिझेल चोरीच्या तक्रारी आल्या होत्या.
Read more >>
रात्रीस खेळ चाले…..’ या बातमीनंतर येत आहे आणखीन माहिती उघडकीस ? ( पहा व्हिडीओ सह)
हातभट्टीची दारु बनवत होते ! शिरुर पोलिसांची पडली धाड !
रांजणगाव एम आय डी सी पोलिस पथक होते कार्यरत !

पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे रांजणगाव एम आय डी सी पोलिसांच्या तपास पथकाला सदर प्रकरणांच्या बाबत तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून डिझेल चोरीचा पाठपुरावा करण्याचे काम सुरू केले होते.या ‘डिझेल चोरी’ प्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध खालील प्रमाणे वेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तपास पथक गुन्ह्यातील आरोपींच्या मार्गावर होतेच.
रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल!
दिनांक 2024 रोजी फिर्यादी सागर अरुण टेमगिरे,राहणार- पारोडी,तालुका- -शिरूर, जिल्हा -पुणे यांच्या (मातोश्री ट्रान्सपोर्ट) च्या दोन कंटेनर मधून 7200 रुपये किमतीच्या डिझेल चोरी गेले प्रकरणी रजिस्टर नंबर 479 / 2024 तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303 ,324 (2 ) अन्वये दिनांक 9/ 8 /2024 रोजी गुन्हा दाखल केला आहे.
गेम बदलला, माऊली आबांचा बळी जाणार ?आणि अजित दादांना विजय मिळणार?
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या ‘संशयास्पद मृत्यू” चा शिरूर मध्ये तीव्र निषेध !
तसेच फिर्यादी विकास अनिल मलगुंडे, राहणार- ढोक सांगवी ,तालुका- -शिरूर, जिल्हा- पुणे, संदीप श्यामराव राऊत, बापूराव ज्ञानाभाऊ कावळे, साहिल सुनील गावडे यांच्या फिर्यादीवरून वेगवेगळे पाच डिझेल चोरीचे गुन्हे इतर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
गोपनीय माहिती मिळाली….
वरील प्रमाणे दाखल डिझेल चोरी प्रकरणी गुन्ह्यातील आरोपींचा तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पिठले, संतोष आवटी यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींच्या बाबत गोपनीय माहिती काढली.तिच्या आधारे आरोपी –
1. रोहन अनिल अभंग, वय -27 वर्ष,
2. निखिल पांडुरंग रोकडे, वय- 21 वर्ष,
दोन्ही राहणार,संगमनेर, तालुका- संगमनेर, जिल्हा-अहमदनगर यांना सदर गुन्ह्यांच्या बाबतीत दिनांक 7/1/ 2025 रोजी अटक केली आहे. सदरचे गुन्हे त्यांचे साथीदार
3. वैभव सुरवडे, राहणार- जामखेड, जिल्हा- अहमदनगर,
4. समाधान देविदास राठोड ,राहणार- कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर,
5.सचिन देविदास दाने, राहणार- येवला, जिल्हा- नाशिक यांनी सदर गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. इतर आरोपींचा शोध चालू आहे.
75000 रुपये व 2000 रुपये किमतीची बॅटरी जप्त. ..
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 75000/- रुपये किमतीचे 800 लिटर डिझेल व 2000 रुपये किमतीची बॅटरी जप्त करण्यात आलेली आहे. सदरचे आरोपी हे औद्योगिक परिसरातील पार्किंगमध्ये तसेच रोड लगत लावण्यात आलेल्या अवजड वाहनांच्या डिझेल टॅंक चे लॉक तोडून डिझेल टॅंक मध्ये पाईप टाकून त्यास मोटर लावून डिझेल बँड मध्ये भरून घेऊन डिझेल चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपींकडून रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील एकूण पाच गुन्हे तसेच शिरुर पोलीस स्टेशनकडे एक गुन्हा असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत. अटक आरोपीचांकडून एकूण 95, 000 रुपये किमतीचे 800 लिटर डिझेल व एक बॅटरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरिष्ट पोलिस अधिकार्यांचा सहभाग. …
सदरचे कामगिरी माननीय पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे, माननीय रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे,श्री. प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे,सहाय्यक पोलीस दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ ,पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पिठले, पोलीस हवालदार आवटी ,पोलीस हवालदार विलास आंबेकर यांनी केला आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गुलाब येळे, पोलीस हवालदार विजय सरजने ,पोलीस हवालदार ढगे ,पोलीस हवालदार तेजस रासकर, रांजणगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत.