
Contents
- 1 रांजणगाव एम आय डी सी पोलीसांचा नेमका ‘गेम’ (?) पहा व्हिडीओ सह !
- 1.1 रांजणगाव एम आय डी सी परिसरात एकाला रात्रीच्या अंधारात लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या !
- 1.1.1 शिरुर, दिनांक 22जानेवारी : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट)
- 1.1.2 रांजणगाव एम आय डी सी मधील कामगार !
- 1.1.3 रात्रीची वेळ साधली गुन्हेगारांनी !
- 1.1.4 रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
- 1.1.5 रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचे पथक झाले सक्रिय !
- 1.1.6 आरोप केला कबुल ?
- 1.1.7 ‘रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनसह वरिष्ट पोलिस अधिकारी सक्रिय!
- 1.1.8 About The Author
- 1.1 रांजणगाव एम आय डी सी परिसरात एकाला रात्रीच्या अंधारात लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या !
रांजणगाव एम आय डी सी पोलीसांचा नेमका ‘गेम’ (?) पहा व्हिडीओ सह !
रांजणगाव एम आय डी सी परिसरात एकाला रात्रीच्या अंधारात लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या !
शिरुर, दिनांक 22जानेवारी : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट)
रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी नेमका ‘गेम’ (?) साधला असल्याची ताजी खबर सत्यशोधक न्युज ला मिळाली आहे. त्यानुसार रांजणगाव एम आय डी सी परिसरात एकाला रात्रीच्या अंधारात लुटणाऱ्यांना दोघा आरोपींना बेड्या ठोकण्यात रांजणगाव एम आय डी सी पोलीसांना यश मिळाले आहे. एक कामगार रात्री उशीरा कामावरुन घरी जात होता.तेव्हा दोन दुचाकीस्वारांनी त्या अडवुन मारहाण करून मोबाईल फोन जबरदस्तीने चोरुन नेला होता.रांजणगाव एम आय डी सी पोलीस त्या दोघांचा शोध घेत होते.अखेर ते सापडले आहेत.
Read more >>
रांजणगाव एम आय डी सी मधील कामगार !
कंपनी कामगाराला मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या दोन कामगार आरोपींना रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी अटक केली .’रांजणगाव एम आय डी सी’

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहती मध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातील व पर जिल्ह्यातील कामगार कामानिमित्ताने राहतात . बहुतेक कंपन्यांमध्ये तीन शिफ्ट मध्ये ते कामे करत असतात.
रात्रीची वेळ साधली गुन्हेगारांनी !

रात्रीच्या वेळी देखील कामगारांची ए जा चालू असते. त्याचाच फायदा घेऊन दिनांक 18.1.2025 रोजी रात्री 11 वाजण्याचा सुमार होता. एका कंपनीतील कामगार कंपनीतून सुटल्यानंतर त्या पायी चालत घरी रोखसांगवी पाचंगे वस्ती कडे जात होता. एका हिरो होंडा मोटरसायकल वरून दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन पायी जाणाऱ्या या कामगाराला ,’कोठे राहतोस ‘वगैरे विचारपूस करत लिफ्ट दिली. लिफ्टच्या बहाण्याने अंधारामध्ये घेऊन गेले. त्याला हाताने मारहाण केली. त्याचा मोबाईल त्यावरून फोन काढुन घेतला. वर एक हजार रुपये घेतले . फिर्यादी याच्या कानातील एअर बर्ड्स जबरदस्तीने काढून घेतले.नंतर ते निघून गेले होते .
Read more >>
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !

सदर प्रकरणी कामगाराचे नाव मोहम्मद आदिल अन्सारी ,सध्या राहणार -लोकसांगवी ,पाचंगे वस्ती, तालुका -शिरूर ,जिल्हा -पुणे ,मूळ राहणार- भारत गंज ,प्रयागराज ,उत्तर प्रदेश यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमां विरुद्ध गुन्हा रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन मधे दाखल केला होता. रजिस्टर नंबर 22/ 2025 असा आहे. भारतीय न्याय संहिता कायदा कलम 2023 च्या कलम 399 (4) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
रांजणगाव पोलिस यांच्याकडुन कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 10 मुद्यांवर मिटिंग: कोनत्या ते वाचा….
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचे पथक झाले सक्रिय !

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ ,योगेश गुंड यांना सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार रांजणगाव पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधाराने सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींचे नाव प्रथम निष्पन्न केले.
1) आकाश नीलकंठ ,वय- 22 वर्ष ,मूळ राहणार- देवठाणा ,तालुका- पूर्णा ,जिल्हा- परभणी,
2) नवनाथ भाऊ कोल्हे कोल्हे ,वय- 28 वर्षे, मूळ राहणार -कारला, तालुका जिल्हा- जालना यांना ताब्यात घघेतले.
आरोप केला कबुल ?
दिनांक 20.1.2025 रोजी संध्याकाळी 6: 22 वाजता अटक करण्यात आलेली आहे .सदर गुन्ह्याची अटक अटक आरोपीकडे सखोल तपास केल्यानंतर अटक आरोपी एका कंपनीत कामगार असल्याने व ते कामावरून घरी जात असताना फिर्यादीस मोटरसायकलवर लिफ्ट देण्याच्या अंधारामध्ये घेऊन जाऊन सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीतांकडून चोरीस गेलेली रोख रक्कम , एयर बर्ड्स असे १९०० रुपये चा मुद्देमाल व 40 हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH 22 BD 24 08 असा आहे. असा एकूण 41 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
‘रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनसह वरिष्ट पोलिस अधिकारी सक्रिय!
सदरची कामगिरी पंकज देशमुख ,पोलीस अधीक्षक पुणे ,श्री. रमेश चोपडे ,अपर पोलीस अधीक्षक ,पुणे ,प्रशांत ढोले ,उपविभागीय पोलीस अधिकारी ,शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे ,सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, पोलीस हवालदार तेजस रासकर, पोलीस हवालदार विलास आंबेकर ,पोलीस हवालदार संतोष आवटी, पोलीस हवालदार रामेश्वर आव्हाड यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार तेजस रासकर ,रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हे करत आहेत.
(Thanks to pixabay.com for images in this content?
1 thought on “रांजणगाव एम आय डी सी पोलीसांचा नेमका ‘गेम’ (?) पहा व्हिडीओ सह !”