
Contents
- 1 Raigad Rain News: रायगड पावसाची बातमी ; उरण तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान, दोन जण जखमी!
- 1.0.1 Raigad Rain News:बेलीवाडी या आदिवासी वाडीत नुकसान —-
- 1.0.2 कोणतीही जीवितहानी नाही, परंतु परिस्थिती गंभीर—
- 1.0.3 कळंबसुरेतील परिस्थिती चिंताजनक—-
- 1.0.4 आपत्ती व्यवस्थापन सक्रिय—
- 1.0.5 Raigad Rain News : नागरिकांनी सतर्क राहावे—
- 1.0.6 अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा—-
- 1.0.7 सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
- 1.0.8 About The Author
Raigad Rain News: रायगड पावसाची बातमी ; उरण तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान, दोन जण जखमी!
Raigad Rain News:आदिवासी भागाला फटका!
अलिबाग | (अमुलकुमार जैन यांच्याकडुन)
Raigad Rain News: गेल्या २४ तासांपासून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उरण तालुक्यातील बेलीवाडी आदिवासी वाडी आणि कळंबसुरे या भागात मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कळंबसुरे येथे दोन जण जखमी झाले असून स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतीचे काम सुरू केले आहे.
Raigad Rain News:बेलीवाडी या आदिवासी वाडीत नुकसान —-
बेलीवाडी ही आदिवासी वाडी असून ती उरण तालुक्यातील सारडे विभागात येते. ही वाडी सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांब असून येथे कोणतेही वाहन पोहचत नसल्याने येथे पोहोचण्यासाठी पायी जावे लागते. या ठिकाणी सुमारे १५ ते १८ कुटुंब राहत असून त्यातील सात ते आठ घरे ही घरकुल योजनेतील आहेत. वस्तीतील बहुतेक घरे ही मातीच्या भिंतींची कच्ची घरे आहेत. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोणतीही जीवितहानी नाही, परंतु परिस्थिती गंभीर—
सुदैवाने बेलीवाडीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांचे नुकसान झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. येथील एका महिलेला गर्भवती असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या सूचनेनुसार मंडळ अधिकारी केशव मोहिते यांनी त्यांच्या पथकासह आदिवासी वस्तीला भेट दिली. त्यांनी स्थानिकांना नाश्ता व पाणी पुरवले आणि रायगड जिल्हा परिषद शाळेत हलविण्याची व्यवस्था सुरू केली आहे.
कळंबसुरेतील परिस्थिती चिंताजनक—-
दुसरीकडे, जुई तलाठी सजाच्या अंतर्गत येणाऱ्या कळंबसुरे गावातही पावसामुळे सुमारे १०० ते १२५ घरांचे कौले, पत्रे आणि अन्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अभिषेक अनंता जाधव (२४ वर्षे) आणि एक महिला जखमी झाल्या आहेत. या दोघांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. येथेही पंचनामा करण्याचे काम तहसील कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून नुकसानीचा अंतिम अंदाज लवकरच जाहीर केला जाणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन सक्रिय—
संपूर्ण परिस्थितीवर उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम, मंडळ अधिकारी केशव मोहिते, तलाठी सुभाष पवार, जय हिंद कोळी, कोतवाल, आपत्ती मित्र व पोलिस पाटील लक्ष ठेवून आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून संभाव्य धोका लक्षात घेता खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
Raigad Rain News : नागरिकांनी सतर्क राहावे—
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, पावसाळ्यात शक्यतो घरातच राहावे, झाडांच्या किंवा जुनाट भिंतीच्या जवळ न जावं आणि आपत्कालीन स्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा—-
भारत सरकारचा हवामान विभाग – अधिकृत वेबसाइट
रायगड जिल्हा प्रशासन – आपत्ती व्यवस्थापन
आपत्ती व्यवस्थापन – महाराष्ट्र शासन
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
Breaking News Ranjangaon Lady Murder: रांजणगावमध्ये महिला आणि दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या!
1 thought on “Raigad Rain News: रायगड पावसाची बातमी ; उरण तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान, दोन जण जखमी!”