
Contents
- 1 भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली ‘: आम आदमी पार्टी
- 1.1 भाजप च्या राज्यात ‘सुबह शाम सब जगह जाम ही जाम’ अर्थात पुणेकर वाहतूक कोंडीत , आप चे आंदोलन !
- 1.1.1 शिरुर, दिनांक 16 जानेवारी : (सत्यशोधक न्यूज रिपोर्ट )
- 1.1.2 भाजप सत्तेत असताना पुणे वाहतुक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर !
- 1.1.3 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, स्मार्ठ सिटी’ चे काय? ..
- 1.1.4 हिंजवडी मधील साफ्टवेअर कंपन्या निघून गेल्या?
- 1.1.5 भाजप चेच आमदार व महापालिकेवर सत्ता !
- 1.1.6 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही ‘टिपण्णी'(?)
- 1.1.7 भाजप च्या विरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन !
- 1.1.8 About The Author
- 1.1 भाजप च्या राज्यात ‘सुबह शाम सब जगह जाम ही जाम’ अर्थात पुणेकर वाहतूक कोंडीत , आप चे आंदोलन !
भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली ‘: आम आदमी पार्टी
भाजप च्या राज्यात ‘सुबह शाम सब जगह जाम ही जाम’ अर्थात पुणेकर वाहतूक कोंडीत , आप चे आंदोलन !
शिरुर, दिनांक 16 जानेवारी : (सत्यशोधक न्यूज रिपोर्ट )

भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली. राज्य असा हल्लाबोल आम आदमी पार्टी ,पुणे ने राज्य सरकार वर केला आहे. भाजप’ च्या राज्यात ‘सुबह शाम सब जगह जाम ही जाम’ अर्थात पुणेकर वाहतूककोंडीने त्रस्त असल्याने , आप चे हे आंदोलन पुणे येथे करण्मात आले.अशी माहिती मुकुंद किर्दत, प्रवक्ते ,महाराष्ट्र राज्य सत्यशोधक न्युज ला दिली आहे.
भाजप सत्तेत असताना पुणे वाहतुक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर !
चार दिवसांपूर्वी टॉमटॉम या संस्थेने जगातील ५०० शहरांचा सर्व्हे करून वाहतूककोंडी होणाऱ्या शहरांची यादी (Tomtom traffic index ) प्रसिद्ध केली. त्यात जगामध्ये पुण्याचा चौथा नंबर असल्याचे जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर आज ‘आम आदमी पार्टी’ ने पुण्यात साखर संकुल चौक, नतावाडी येथे आंदोलन केले. ‘ भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली ‘ असे म्हणत उपरोधिक अभिनंदनाचे आंदोलन या वेळी आम आदमी पक्षाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी केले आहे.’भाजप‘
‘आप’ चा इशारा, ” रस्ते उकरल्यास त्याचा खर्च अधिकाऱ्यांच्या खिशातून घ्यावा !”
‘आप’ कडुन घरकाम करून मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या ‘आयां’ चा तर्फे सत्कार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, स्मार्ठ सिटी’ चे काय? ..

पुणे (Pune) हे स्मार्टसिटी प्रकल्पा अंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले.नंतर पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतूकसेवा याविषयी सूचना सादर केल्या होत्या. परंतु आज जवळपास आठ नऊ वर्षानंतर सुद्धा पुण्यामधील परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकाधिक बिघडत चाललेली आहे. पुणेकरांचे वर्षाला सरासरी 110 तास वाहतूक कोंडी मध्ये वाया जात आहेत. हे सत्य या निमित्ताने बाहेर आले आहे. पूर्वी हिंजवडी रोड, सेनापती बापट रोड अशा काही ठराविक रोडवर वाहतूक कोंडी होत होती. परंतु आता शहरातील सर्व भागात होऊ वाहतूक कोडी होवु लागली आहे.
हिंजवडी मधील साफ्टवेअर कंपन्या निघून गेल्या?
या वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी मधील सोफ्टवेअर कंपन्या इतर शहरांमध्ये निघून गेल्या आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना सायकल चालवताना सतत अपघात होण्याची भीती मनात असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे शाळकरी मुलींनाही असुरक्षित वाटते. वायू प्रदुषणाचा त्रास आता सर्वांनाच होतो आहे.
भाजप चेच आमदार व महापालिकेवर सत्ता !
पुणे शहरांमध्ये ‘भाजप’ चे आमदार असताना यापूर्वी ‘भाजप’ महानगरपालिकेत सत्तेत असताना आणि आता प्रशासनामार्फत ट्रिपल इंजिन सरकार चालू असताना पुण्यातले उड्डाणपूलांचे, खड्ड्यांचे , अतिक्रमणांचे, बेशिस्त वाहतुकीचे, मेट्रोप्रवाशांच्या शेवटच्या कनेक्टिव्हिटी चे प्रश्न आहेत. तशी परिस्थिती असून अजूनही विद्यापीठ चौकातील सिंहगड रोडवरील हडपसर मधील महत्त्वाचे ओव्हर ब्रिज पूर्ण झालेले नाहीत. तर दुसरीकडे मेट्रोमुळे, नव्या डीसी रूल प्रमाणे अधिकचा एफएसआय वापरून अधिक लोकघनतेच्या बिल्डिंग उभ्या राहणार आहेत. त्यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी अजूनच वाढणार आहे. पालिकेने तब्बल १०० कोटीची स्वयंचलित सिग्नल ATMS प्रणाली बसवूनही काही फायदा झालेला नाही.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही ‘टिपण्णी'(?)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या टिपण्णी नंतरही पुण्यातील प्रशासन, सत्ताधारी भाजप आमदार आणि सरकार यांच्या या अनास्तेमुळेच दोन वर्षात जगभरात वाहतूक कोंडीमध्ये पुण्याचा नंबर सातव्या नंबर वरून चौथ्या नंबर वर गेला आहे. आणि या सर्वांच्यामुळे ‘ भाजपने करुन दाखवले, सुबह शाम सब जगह जाम ही जाम ‘ अशा घोषणा देत आम आदमी पार्टी ने अभिनंदनाचे उपरोधिक आंदोलन केले.
भाजप च्या विरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन !

आजच्या आंदोलनात आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, शंकर थोरात, सुरेखा भोसले, अक्षय शिंदे, प्रशांत कांबळे, मिलिंद ओव्हाळ, सुभाष कारंडे, शेखर ढगे, कुमार घोंगडे, संजय कटारनवरे, सैद अली, संतोष काळे, सुनील सौदी, फबीयन सॅमसन, अभिजीत मोरे, अमित म्हस्के ,विकास चव्हाण, शिवाजी डोलारे, कविता गायकवाड, मनोज शेट्टी, प्रीतम कोंढाळकर, शितल कांडलकर, श्रद्धा शेट्टी, सेन्थिल अय्यर, निलेश वांजळे, अभिजीत वाघमारे, अविनाश भाकरे, सत्यवान शेवाळे, किरण कांबळे, ऋषिकेश मारणे, नौशाद अन्सारी, उमेश बागडे, शंकर पोटघन, ऋषिकेश कुंभिरकर, अजिंक्य जगदाळे, अभिजित बागडे, आप्पा वाडेकर, अजय मुनोत, अंजना वांजळे, अभिजित गायकवाड, आदी सहभागी झाले होते.