
Contents
- 1 Dinanath Mangeshkar Case Update:दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या फॉर्म मधे ‘डिपॉझिट’ चा रकानाच नाही? तरी रुग्णांकडुन डिपॉझिट का मागता?
- 1.1 Dinanath Mangeshkar Case Update:दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सल्लागार घैसास यांचा ‘तणावामुळे’ राजीनामा?
- 1.2 राहू केतू हे बुद्धिभ्रष्ट करतात—-
- 1.3 अनेक बाबींचा उलगडा—
- 1.4 डॉक्टर घैसास यांचा तणावामुळे राजीनामा—
- 1.5 गर्भवतीचा मृत्यू झाला होता—–
- 1.6 तोंडी मागणी करण्या ऐवजी बेसावध क्षणी लेखी मागणी—
- 1.7 रक्कम पेन्सिलने लिहिली जाते—
- 1.8 आयुक्त व आरोग्य विभाग या सर्वांची जबाबदारी—-
- 1.9 डिपॉझिट ची माहिती असते—-
Dinanath Mangeshkar Case Update:दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या फॉर्म मधे ‘डिपॉझिट’ चा रकानाच नाही? तरी रुग्णांकडुन डिपॉझिट का मागता?
Dinanath Mangeshkar Case Update:दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सल्लागार घैसास यांचा ‘तणावामुळे’ राजीनामा?
Dinanath Mangeshkar Case Update 8 April 2025: (Satyashodhak News Report)
Dinanath Mangeshkar Case Update:दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या फॉर्म मधे ‘डिपॉझिट‘ चा रकानाच नाही? तरी रुग्णांकडुन डिपॉझिट का मागता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.त्यातच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सल्लागार घैसास यांनी ‘तणावामुळे’ राजीनामा दिला आहे, असे सुत्रांकडुन समजते.एकुणच भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणीप्रित्यर्थ स्थापित केलेले हे कर्करोग हास्पिटल त्यांच्या नंतर कुप्रसिद्ध होत आहे !
राहू केतू हे बुद्धिभ्रष्ट करतात—-
असं म्हणतात की राहू केतू हे बुद्धिभ्रष्ट करतात आणि माणूस चुकीच्या मार्गाने जातो. म्हणजे तो बेसावध असताना तो चुकीचे कर्म करतो का?असा प्रश्न आम आदमी पार्टी चे मुकुंद किर्दत यांनी विचारला आहे.आपचे अमोल मोरे, अभिजीत मोरे, निलेश वांजळे, सुरेखा भोसले, आरती करंजवणे सुहास पवार, शंतनू पांडे, प्रदीप उदागे आदि कार्यकर्त्यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांची काल दिनांक 6 एप्रिल रोजी भेट घेतली होती.
अनेक बाबींचा उलगडा—
त्यावेळेस अनेक बाबींचा उलगडा झाला. तब्बल तासभर सुशांत आपलं काळीज पिळवटून टाकणारे दुःख आणि घटना सांगत होते. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील पाच तासा दरम्यान काय काय झाले याची तपशीलवार माहिती त्यातून मिळाली असल्याचे मुकुुंद किर्दत यांनी सांगितले आहे.
Read more >>
सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड !
डॉक्टर घैसास यांचा तणावामुळे राजीनामा—
दरम्यान काही अहवाल आले असून आता आज(7 एप्रिल रोजी) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सल्लागार डॉक्टर घैसास यांनी तणावामुळे राजीनामा दिला आहे.
गर्भवतीचा मृत्यू झाला होता—–
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिट अभावी प्रवेश मिळू न शकलेल्या गर्भवतीचा मृत्यू झाल्या प्रकरणी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डिन धनंजय टिळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली . डिपॉझिट मागणे ही चूक आहे असे स्पष्टपणे मान्य न करता हॉस्पिटलच्या फॉर्म वरती डिपॉझिट हा रकानाच नाही .तरीसुद्धा चौकोनात हा रकमेचा आकडा लिहिला गेला आहे असे सांगितले.
तोंडी मागणी करण्या ऐवजी बेसावध क्षणी लेखी मागणी—
त्यामुळे हे राहू केतूमुळे म्हणजेच बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे लिहिले गेले असे डॉक्टर केळकर म्हणत आहेत. तोंडी मागणी करण्या ऐवजी बेसावध क्षणी लेखी मागणी केली गेली असाही याचा अर्थ होतो.असे मुकुुंद किर्दत व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सांगतात.
रक्कम पेन्सिलने लिहिली जाते—
प्रत्यक्षामध्ये बऱ्याच हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट हे मागितले जाते. आणि त्याची रक्कम पेन्सिलने लिहिली जाते. इमर्जन्सी असल्याने रुग्ण व त्याचे नातेवाईक अडचणीत असतात आणि ते काही करून पैसे जमा करतात. जीव वाचवण्यासाठी, मदत करण्यासाठी डॉक्टरांना आग्रह करतात हा नेहमीचा अनुभव आहे.
आयुक्त व आरोग्य विभाग या सर्वांची जबाबदारी—-

आम आदमी पार्टीचा विरोध या बेकायदेशीर कृत्यालाच आहे. लिखित स्वरूपात असो अथवा तोंडी स्वरूपात असो डिपॉझिट मागणे हे इमर्जन्सी पेशंटच्या बाबतीत होता कामा नये. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हीच जबाबदारी धर्मादाय हॉस्पिटल प्रशासन तसेच धर्मादाय आयुक्त आणि आरोग्य व्यवस्था सांभाळणारे आयुक्त व आरोग्य विभाग या सर्वांची आहे.
डिपॉझिट ची माहिती असते—-
आंदोलना दरम्यान आम आदमी पार्टी हीच मागणी लावून धरत होती.यामध्ये आरोग्य विभाग हा तितकाच जबाबदार आहे .कारण त्यातील प्रत्येक अधिकाऱ्याला या मागितल्या जाणार्या अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट ची माहिती असते. असे असतानाही ते त्यांची जबाबदारी पाळत नाहीत. यातूनच ते स्वतःसाठी एक पळवाट निर्माण करून ठेवतात. म्हणून आम आदमी पार्टी प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरावे अशी मागणी करीत आहे.
आम आदमी पार्टी ची लढाई आरोग्य व्यवस्था परिवर्तांनासाठी आहे .त्यामुळे पुढील काळात या विषया संबंधित काम पक्ष कार्यकर्ते हातात घेतील. असे मुकुंद किर्दत , आम आदमी पार्टी यांनी शेवटी म्हटले आहे.