पाकिस्तान काश्मीर साठी भारताबरोबर 10 युद्धे लढण्यास तयार ! पण एका लढाई नंतर शिल्लक राहिला तर ना ?

पाकिस्तान काश्मीर साठी भारताबरोबर 10 युद्धे लढण्यास तयार असल्याची ललकार पाकिस्तान चे जनरल असिर मुनीर यांनी दिली आहे . पण एका लढाई नंतर पाकिस्तान शिल्लक राहिला तर ! एवढे मात्र नक्की ! पाकिस्तान च्या रावळपिंडीत जनरल असिर मुनीर यांचे तापमान वाढले आहे. कारण काश्मीर चे तापमान या दिवसातच वाढत असते ! पण त्याचा फैलाव रावळपिंडीत बसलेल्या या पाकिस्तानी जनरलला होवुन तो ‘गरम’ झाला आहे हे नक्की. पण काय करणार बिचारा ? बिर्याणी तर सोडा पण दाल ,चावल ,आटा ,सब्बीला पाकिस्तान महाग झाला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानी सैनिक किमान उभे राहण्यासाठी तरी या वस्तुंची गरज पाकिस्तान सरकारला पडणार आहे. सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेशी मात्र पाकिस्तानी लष्कराला कधी सोयरसुतक नव्हते. पाकिस्तानी लष्करातील अधिकार्यांची व्यक्तीगत संपत्ती मात्र करोडो रुपयांची असते. जेणेकरुन पाकिस्तानातुन कोनतीही क्षणी पळुन जावुन अमेरिकेत वास्तव्य करता यावे म्हणुन !