
Contents
- 1 Osho Thoughts:ओशो विचार: जगण्याचे तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक ‘बुद्धत्वा’चा मार्ग !
- 1.1 Osho Thought:ओशों रजनीश; परम विद्रोही !
- 1.2 प्रस्तावना:
- 1.3 1. ओशों रजनीश यांचे जीवन कार्य कोनते?
- 1.4 ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट–
- 1.5 ध्यान हा मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग—
- 1.6 २. ओशो रजनीश यांचे विचार व तत्त्वज्ञान कोनते?
- 1.7 ३. ओशों रजनीश यांच्या तत्त्वज्ञानाचा आधुनिक जगावर प्रभाव-
- 1.8 तीन सर्वोत्तम ओशो विचार (Quotes) मराठीत:
- 1.9 Read more >>
- 1.10 Hinduism : हिंदुत्ववाद म्हणजे काय?
- 1.11 5. समारोप–
Osho Thoughts:ओशो विचार: जगण्याचे तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक ‘बुद्धत्वा’चा मार्ग !
Osho Thought:ओशों रजनीश; परम विद्रोही !
प्रस्तावना:
Osho Thoughts: ओशो खरे नाव रजनीश चंद्र मोहन जैन असे होते.ओशो हे २० व्या शतकातील एक जगप्रसिद्ध भारतीय आध्यात्मिक गुरु व विचारवंत होते.ओशोंनी विद्रोह केला.परम विद्रोह केला. त्यांनी पारंपरिक धार्मिकता,मुल्यव्यवस्था , समाजव्यवस्था व रूढी-परंपरांना नकार दिला.स्वतःचे स्वतंत्र तत्त्वज्ञान जगाला दिले.ओशोंच्या विचारांमध्ये ध्यान, प्रेम, आनंद,उत्सव व आत्ममुक्तीला महत्त्व आहे. ओशोंच्या तत्त्वज्ञानाने लाखो,करोडो लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे.पण भारताने त्यांची जेवढी दखल घ्यायला पाहिजे होती.तेवढी घेतली नाही. उलटपक्षी ते समजण्याइतके प्रगल्भ भारतीय लोक अजुनही झालेले नाहीत ! ओशोंनी हजार वर्षे पुढचा विचार मांडला.
1. ओशों रजनीश यांचे जीवन कार्य कोनते?
ओशों रजनीश यांचा जन्म 11 डिसेंबर 1921 रोजी मध्य प्रदेश, कुचवाडा येथे एका छोट्या गावात झाला. बालपणापासूनच त्यांना गूढ आणि अध्यात्मिक विषयांबद्दल विशेष कुतुहल होते. त्यांनी जबलपूर विद्यापीठातून तत्त्वज्ञानात पदवी प्राप्त केली.एक तर ते परिक्षा देण्यासाठी जात नव्हते.पण एका प्राध्यापकाच्या आग्रहाखातर गेले.त्यांची उत्तर पत्रिका तपासणारे तत्वज्ञानाचे प्राध्यापक त्यांची उत्तरे वाचुन आवाक झाले! त्यांनी त्यांना एम ए तत्वज्ञान विषयात 95℅ गुण दिले.मिळालेले गोल्ड मेडल त्यांनी एका विहिरीत टाकुन दिले ! ‘ सोने,जड जवाहिर आम्हा मृतीकेसमान’ असा तो अर्थ होता.
Read more >>
Sex to Superconciousness संभोगातुन समाधीकडे जाता येते का ? एक चिंतन !
ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट–

नंतर ओशोंनी अध्यात्मिक प्रवचने सुरू केली.1970 च्या दशकात त्यांनी पुण्यात एक आश्रम,कम्युन स्थापन केला, जो आजही ‘ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट’ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.
ध्यान हा मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग—
ओशोंचे विचार मुलभुतरित्या पारंपरिक धर्मगुरूं/पुरोहितांपेक्षा वेगळे होते. त्यांनी लोकांना स्वतःच्या अनुभूतींवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला
. ध्यान हा मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सारांशाने म्हणता येईल,हा त्यांचा विचार होता. त्यांच्या प्रवचनांमध्ये जीवन, प्रेम, संभोग, ध्यान, मृत्यू व मुक्ती यासंबंधी सखोल चर्चा आहे.तशी धर्म चिकित्सा आधी कोणी केली नाही.
२. ओशो रजनीश यांचे विचार व तत्त्वज्ञान कोनते?
(1) ध्यान व आत्ममुक्ती अर्थात बुद्धत्व,Enlightenment-
ओशोंच्या मते ध्यानात (Meditation) जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर दडलले आहे. त्यांनी अनेक(108) ध्यानपद्धती विकसित केल्या.उदाहरणार्थ डायनॅमिक मेडिटेशन ! यात श्वासोच्छ्वास, हालचाल, मुक्त अभिव्यक्ती व शांतता असते. त्यांच्या मतानुसार ध्यानाने मन शुद्ध होते. व्यक्ती सबकांशसपासुन मुक्त होतो.Subconcious ,अंतर्मन हा मनाचा मोठा भाग व्यापुन असतो.तो व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देतो.
(2) प्रेम व संभोग-
ओशो ‘प्रेमा’ला स्वच्छंद व मुक्त ऊर्जेप्रमाणे पाहतात. त्यांच्या मतानुसार, प्रेम हे बंधन बनुन जावु नये . तर ते स्वातंत्र्य व आनंददाकडे नेणारे असावे. ते म्हणतात की, “प्रेम म्हणजे दोन आत्म्यांचा संवाद असतो परंतु त्यात मालकी नसते.”
(3) प्रचलित धार्मिकता व पारंपरिक विचारपद्धतीवर टीका—
ओशों रजशीश यांनी पारंपरिक धर्म व त्यांच्या कर्मकांडांवर कठोर टीका केली. उदाहरणार्थ ‘खरा धर्म हा अंतःकरणातून उमटतो , तो कोणत्याही बाह्य नियमांनी नियंत्रित केला जाऊ शकत नाही.’ त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धत्व ,Enlightenment ला महत्त्व दिले.
(4) जीवन हे उत्सव बनावे !
ओशों रजनीश यांच्या तत्त्वज्ञानानुसार, जीवन एक गंभीर गोष्ट नही , ते सहजपणे आनंदाने जगण्याची एक संधी आहे. त्यांनी असेही सांगितले की, “जीवन हे एक खेळ आहे आणि त्याचा आनंद घेण्यातच खरी बुद्धिमत्ता आहे.”आनंद भोगल्याशिवाय त्याची आसक्ती संपत नाही. त्यापलीकडे बुद्धत्वाकडे जाता येत नाही. दमन करण्याने आसक्ती विकृत स्वरूपात बाहेर येतेच !
(5) ओशोंच्या मते मृत्यू व पुनर्जन्म-
ओशोंच्या मते मृत्यू शेवट नाही.तर आत्म्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात असते. त्यांनी लोकांना मृत्यूला स्वीकारण्यास शकवले – ‘मैं मृत्यु सिखाता हुं’ व त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहयला शिकवले !
Read more >>
३. ओशों रजनीश यांच्या तत्त्वज्ञानाचा आधुनिक जगावर प्रभाव-

आजही जगभर ओशोंच्या विचारांचा प्रभाव जगभर आहे. अनेक लोक त्यांच्या ध्यानसाधनेचा अवलंब करतात. त्यांच्या पुस्तकांमधून प्रेरणा घेतात. पुण्यातील ओशो आश्रम हा जागतिक ध्यानकेंद्र आहे आणि तेथे विविध देशांतील लोक आत्मशोधासाठी येतात.
तीन सर्वोत्तम ओशो विचार (Quotes) मराठीत:
1. “प्रेम आणि भीती हे परस्परविरोधी आहेत. जेथे प्रेम आहे तेथे भीती नाही, आणि जेथे भीती आहे तेथे प्रेम असू शकत नाही.”
2. “तुमच्या आत दडलेली प्रतिभा ओळखा आणि जगाच्या भीतीशिवाय ती व्यक्त करा. कारण खरी क्रांती ही अंतर्गत असते.”
3. “ध्यान ही केवळ एक साधना नाही, ती जीवनशैली आहे. जेव्हा तुम्ही संपूर्णपणे जागृत होता, तेव्हाच खरे जगणे सुरू होते.”
Read more >>
Hinduism : हिंदुत्ववाद म्हणजे काय?
5. समारोप–
ओशों रजनीश यांचे विचार हे पारंपराआगत धार्मिक तत्त्वज्ञानाच्या पलीकडे जातात. जीवनाचे नवे दर्शन देतात. त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्य, प्रेम, आनंद, ध्यान व मुक्ती यासंबंधी मौल्यवान शिकवणी दिल्या आहेत. ओशोंच्या विचारसरणीचा प्रभाव आजही कायम आहे. त्यांच्या पुस्तकांमधून, प्रवचनांमधून आणि ध्यानतंत्रांमधून लाखो लोक रोज प्रेरित होत असतात.
1 thought on “Osho Thoughts:ओशो विचार: जगण्याचे तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक ‘बुद्धत्वा’चा मार्ग !”