
Contents
- 1 Nokariche Amish 24 lakhanchi Fasavanuk:सरकारी नोकरीचे अमिष दाखवून २४ लाखांचा गंडा महिलेकडुन !
Nokariche Amish 24 lakhanchi Fasavanuk:सरकारी नोकरीचे अमिष दाखवून २४ लाखांचा गंडा महिलेकडुन !
Nokariche Amish 24 lakhanchi Fasavanuk:इंदापूर येथील महिला शिरुर पोलिसांच्या ताब्यात!
शिरुर,(पुणे) 7 मे 2025 : (कल्पना पुंडे यांच्याकडुन)
Nokariche Amish 24 lakhanchi Fasavanuk:सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल २४ लाख रुपये उकळल्याप्रकरणी इंदापूर येथील एक महिलेला शिरुर पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने ऑगस्ट २०२३ ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत नागरिकांकडून रक्कम उकळली होती.
“मी सरकारी नोकरी लावण्याचे काम करते. तुमचा मुलगा असेल तर सांगा”—
फिर्यादी विकास भिमराव नागरगोजे (रा. जोशीवाडी, शिरुर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिला निशा लक्ष्मण शिंदे (रा. इंदापूर) हिने “मी सरकारी नोकरी लावण्याचे काम करते. तुमचा मुलगा असेल तर सांगा” असा दावा करत त्यांच्याशी संपर्क साधला. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नागरगोजे यांनी त्यांच्या पत्नीच्या एचडीएफसी बँक, शिरुर शाखेतील खात्यावरून आरोपीच्या खात्यावर २३,४६,००० रुपये बँकेतून व १,००,००० रुपये रोख दिले.
कोणतीही नोकरी लागली नाही—-
परंतु, अनेक दिवस होऊनही कोणतीही नोकरी न लागल्यामुळे नागरगोजे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिस हवालदार शिवाजी बनकर यांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महिला इंदापूर येथे असल्याचे शोधून काढले.
पोलीस अंमलदार स्नेहल होळकर, महिला पोलिस आणि शिवाजी बनकर यांनी महिलेला इंदापुर येथुन ताब्यात घेतले —-
पोलीस अंमलदार स्नेहल होळकर, महिला पोलिस आणि शिवाजी बनकर यांनी तातडीने कारवाई करत निशा शिंदे हिला इंदापूर येथून ताब्यात घेतले. तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तिला ८ मे २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या देखरेखीखाली—–
ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकारी अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, विजय शिंदे, महिला पोलिस अंमलदार स्नेहल होळकर आणि पोलीस हवालदार शिवाजी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही बातमीही वाचण्यासारखी आहे—
हापिज सईदचे सिक्रेट ठिकाण कुठे आहे? एक चर्चा.
—
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…
1 thought on “Nokariche Amish 24 lakhanchi Fasavanuk:सरकारी नोकरीचे अमिष दाखवून २४ लाखांचा गंडा महिलेकडुन !”