
Contents
- 1 Nirop Samarambh :आदरणीय राजू कांबळे सरांना सस्नेह व सन्मानपूर्वक निरोप; ३३ वर्षांच्या निष्ठावान सेवेस सलाम
Nirop Samarambh :आदरणीय राजू कांबळे सरांना सस्नेह व सन्मानपूर्वक निरोप; ३३ वर्षांच्या निष्ठावान सेवेस सलाम
Nirop Samarambh Raju Kambale Sir
दिनांक 30 जुन|📍इस्लामपूर | प्रतिनिधी |
राजू कांबळे सर यांच्या ३३ वर्षांच्या निष्ठावान सेवेस सन्मानपूर्वक निरोप. इस्लामपूरच्या सुधाताई सदाशिव पाटील कन्या प्रशालेत भावपूर्ण सोहळा, मान्यवरांची उपस्थिती व सहकाऱ्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव.
Nirop Samarambh: वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या सुधाताई सदाशिव पाटील कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, इस्लामपूर (सुधाई संकुल, लाल चौक) येथे ३३ वर्षे लॅब अटेंडंट पदावर निःस्वार्थ, निष्ठावान व शिस्तबद्ध सेवा देणारे आपल्या सर्वांचे लाडके सहकारी आ. राजू कांबळे सर यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी एक भावविवश पण प्रेरणादायी निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. सौ. अरुणादेवी पाटील (माजी प्राचार्या) होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. (ॲड.) डॉ. अर्जुन पन्हाळे (जीवशास्त्र प्रमुख, क्रांतीसिंह नानासाहेब पाटील सिनिअर महाविद्यालय) उपस्थित होते.
कार्यक्रमास ॲड. बी. एस. पाटील (अण्णा) – मानद सचिव, वाळवा शिक्षण संस्था; ॲड. धैर्यशील पाटील (बाबा) – अधिसभा सदस्य, शिवाजी विद्यापीठ व सहसचिव; तसेच संस्थेचे पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. शहा, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. पाटील, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔬 प्रयोगशाळेचे ‘हृदय’—–
राजू सरांनी प्रयोगशाळेतील शिस्त व कार्यक्षमतेचा उच्च दर्जा राखला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशीलतेची मानसिकता निर्माण करत, त्यांनी केवळ उपकरणेच नाही तर विचारांची मशालही पेटवली. त्यांच्या हसतमुख, विनोदी स्वभावामुळे शाळेतील ताणतणाव क्षणात हलका होत असे.
🗣️ अध्यक्षीय गौरवोद्गार—–

सौ. अरुणादेवी पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गौरवोद्गार व्यक्त करत म्हटले,
“राजू कांबळे सर हे केवळ कर्मचारी नव्हते, तर प्रयोगशाळेचे हृदय होते. त्यांच्या काटेकोरपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण झाली. त्यांच्या सेवा संस्थेच्या गुणवत्ता जपणुकीचा मूळ आधार आहे.”
🎉 भावुक निरोप व सत्कार सोहळा—-

राजू सर व त्यांच्या पत्नी सौ. भारती कांबळे यांचा शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सहकाऱ्यांनी निरोपगीत व सदिच्छा संदेशांच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशात त्याची सहचरिणीचा वाटा मोठा असतो……

स्वतः राजू सर भावूक होत म्हणाले..
“संस्थेचे प्रेम व सहकार्य यामुळेच माझा प्रवास आनंददायी झाला. या आठवणी आयुष्यभर मनात जपेन.”
💐 शुभेच्छांचा वर्षाव—–
समारंभाच्या अखेरीस सर्व मान्यवर व उपस्थितांनी राजू सरांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व आनंदी निवृत्त जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांचा सेवाभाव, नम्रता, विनोदबुद्धी व कर्तव्यपरायणता ही प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
शिक्षक सेवानिवृत्ती सन्मानाचे महत्त्व – Maharashtra.gov.in
ज्ञानेश्वरीतील प्रेरणादायक ओव्या – marathibhajan.com
वाळवा तालुका शिक्षण संस्था माहिती – Wikipedia
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून ••••
शिरूरमध्ये ‘Shahu Maharaj Jayanti’ निमित्त महिलांचे सक्षमीकरण आणि प्रेरणादायी गौरव सोहळा!