
शिरुर पोलीस स्टेशन
शिरूर: तांबे वस्ती येथील घरफोडी प्रकरण, 2.80 लाख रुपयांचा ऐवज चोरीला
शिरूर (जि. पुणे) दिनांक 13 May 2025–
न्हावरे येथील तांबे येथे दिनांक 9 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 ते 7:00 च्या दरम्यान घरफोडीची गंभीर घटना घडली. संकेत बाजीराव साठे (वय 30) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या बंद घरात दोन अज्ञात आरोपींनी मागील खिडकीतून प्रवेश करत 2,80,000/- रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
फिर्यादीनुसार आरोपींची नावे:
1. अर्जुन बबन राठोड (रा. देऊळगाव कुंडपाळ, ता. लोणार, जि. बुलढाणा)
2. करण विनोद चव्हाण (रा. उंबरखेडा, ता. कन्नड, जि. संभाजीनगर)
चोरी गेलेल्या मालमत्तेचा तपशील:
• ₹1,50,000 रोख रक्कम: 500 रुपये दराच्या 300 नोटा
• ₹1,20,000 सोन्याचे दागिने: एक तोळ्याची सोन्याची चेन व अर्धा तोळ्याची गणपती मूर्ती
• ₹10,000: लहान मुलांचा पैसे साठवण्याचा डब्बा
• शून्य किंमत: आईच्या FD संबंधित कागदपत्रे
• एकूण मालमत्ता किंमत: ₹2,80,000/- रुपये.
ही घटना दिनांक 13/05/2025 रोजी दुपारी 1:34 वाजता शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. 321/2025, भा.दं.वि. कलम 305, 3(5) अन्वये नोंदविण्यात आली.
या प्रकरणाचे तपास अधिकारी:
• दाखल अंमलदार: सहाय्यक फौजदार रमेश कदम
-• तपासी अंमलदार: पो.ह. दीपक पवार
शिरूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.