Breaking News : तब्बल 75 लाख 48 हजार रुपये किंमतीची गोवा दारु व टेंपो त्याच्या चालकासह पकडला !
Breaking News : तब्बल 75 लाख 48 हजार रुपये किंमतीची गोवा दारु व टेंपो त्याच्या चालकासह पकडला गेला आहे. पुणे अहिल्यानगर हायवेवर शिरुर पोलिसांची पुन्हा 'धडाकेबाज कामगिरी' पहायला मिळत आहे. हे विशेष ! अशा कामगिरीसाठी शिरुर पोलिस अलिकडील काळात प्रसिद्धिस आलेले आहेत. त्यामुळे एवढा मोठा बेकायदा दारु माल वाहतूक करताना शिरुर पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला गेला. यात 15 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेंपो चालकासह शिरुर पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
Breaking News : तब्बल 75 लाख 48 हजार रुपये किंमतीची गोवा दारु व टेंपो त्याच्या चालकासह पकडला !
Breaking News : पुणे अहिल्यानगर हायवेवर शिरुर पोलिसांची पुन्हा ‘धडाकेबाज कामगिरी’ !
News Maharashtra 11 March 2025 :
( Satyashodhak News Report )
Breaking News : तब्बल 75 लाख 48 हजार रुपये किंमतीची गोवा दारु व टेंपो त्याच्या चालकासह पकडला गेला आहे. पुणे अहिल्यानगर हायवेवर शिरुर पोलिसांची पुन्हा ‘धडाकेबाज कामगिरी’ पहायला मिळत आहे. हे विशेष ! अशा कामगिरीसाठी शिरुर पोलिस अलिकडील काळात प्रसिद्धिस आलेले आहेत. त्यामुळे एवढा मोठा बेकायदा दारु माल वाहतूक करताना शिरुर पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला गेला. यात 15 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेंपो चालकासह शिरुर पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
Breaking News ठरणारे यश शिरुर पोलिसांना —
तब्बल 60 लाख रुपये किमतीची गोवा दारु ही कोठुन आणली जात होती? कोठे नेली जात होती? त्याचा मालक कोण व कुठला आहे.ही दारु महाराष्ट्रात की महाराष्ट्राच्या बाहेर नेली जात होती? यात कोण कोण गुन्हेगार आहेत? याचा तपास शिरुर पोलिस घेत आहेत.त्यातुन कदाचित ,’बडी मछली’ पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय मोठे नेटवर्क देखील या तपासातुन उघड होऊ शकते. सध्या या टेंपो चा चालक मोहमद इमरान मोहमद सलिम शेख याच्या मुसक्या शिरुर पोलिसांनी आवळल्या आहेत.
कारवाईचा सविस्तर वृत्तांत असा —-
या कारवाईचा सविस्तर वृत्तांत असा आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे अंमलदार अप्पासाहेब कदम व शेखर झाडबुके हे दिनांक 10 मार्च 2025 रोजी वाहतुक नियमन करत होते.तेव्हा त्यांना गुप्त सुत्रांकडुन माहिती मिळाली. ती अशी होती की शिरुरजवळील बोर्हाडे मळा या ठिकाणी पुणे अहिल्यानगर रोडवर भारत पेट्रोल पंपासमोर गोवा बनावटीची दारु वाहतुक करणारा एक टाटा कंपनीचा टेंपो नंबर MH 48 CB 3605 हा उभा आहे.
गोवा दारु चे एक चित्र (साभार: www.pixabay.com)
गोवा दारु म्हणजे काय —
गोवा दारू म्हणजे गोव्यात बनवल्या जाणाऱ्या आणि प्रसिद्ध असलेल्या विविध प्रकारची मद्ये. गोवा हा भारतातील एक प्रमुख मद्यनिर्मिती केंद्र आहे. विशेषतः तिथल्या “फेणी” आणि रम (Rum) दारु साठी गोवा प्रसिद्ध आहे.
• गोव्याच्या प्रसिद्ध दारूंचे प्रकार—
1. फेणी (Feni)
ही गोव्याची पारंपरिक व प्रसिद्ध दारू आहे.
या दारुचे दोन प्रकार आहेत–
1.काजू फेणी –ही दारु काजुपासुन बनवली जाते. 2.नारळ फेणी – ही दारु नारळाच्या रसापासुन बनवली जाते.
फेणी दारु सुगंधी व कडक असते.त्यामुळे ती पर्यटकांना अनोखी वाटते.
• गोवा रम- (Goan Rum)
गोवा चांगल्या प्रकारच्या रम साठी प्रसिद्द आहे.
Old Monk,Cabo Coconut Rum,व “Rhea Rum” हे काही या रमचे प्रसिद्द ब्रँड्स आहेत.
• Cabo विशेषता नारळाच्या स्वादाची असते. • गोवा Visky व आणि Vodka या आंतरराष्टीय दर्जाच्या मानल्या जातात.
• Paul John Whisky हा गोव्यातील खास भारतीय Single Malt Visky ब्रँड जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. • बीयर व वाईन- ही लोकल ब्रन्डसची व आंतरराष्ट्रीय देखील येथे सहज उपलब्ध आहे. King’s Beer हा देखील गोव्यातील प्रसिद्ध स्थानिक ब्रेंड आहे.
• गोवा हे वाईन निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.उदा.Big Banyan Wines.
• गोव्यात दारू स्वस्त का?
गोव्यात दारूवर कर कमी आहे.त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत ती स्वस्त आहे.पर्यटक त्यामुळे दारू खरेदीस गोव्याला प्राधान्य देतात.
(• महत्वाची सूचना–
गोवा हे पर्यटनासाठी सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. पण मद्यपान जबाबदारीने व कायद्याच्या मर्यादेत करावे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास काही ठिकाणी बंदी आहे.दारु पिणे आरोग्याला हानीकारक आहे.इथे फक्त माहिती देण्याचा उद्देश आहे. दारु पिण्यास प्रोत्साहन देण्याचा उद्देश नाही ,याची नोंद घ्यावी. )
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांचा तत्काळ आदेश —
त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळवली. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तत्काळ पोलिस उप निरीक्षक शुभम चव्हाण, महिला पोलिस हवालदार भाग्यश्री जाधव,पोलिस अंमलदार अप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके,निरज पिसाळ यांना कारवाई करण्याच्या योग्य त्या सुचना दिल्या.त्यानंतर या टिमने बोर्हाडे मळा परिसरात सापळा रचला. टेंपो चालकाला ‘कानोकान’ खबर व अंदाज येणार नाही. अशा चपळाईने चारी बाजुंनी टेंपो घेरला.चालकाला याचा काही अंदाज येवु दिला नाही. त्याला पळुन जाण्यास क्षणभर देखील वेळ मिळु दिला नाही. अर्थात चालक हा चालक असतो.मालक नसतो.मालक स्वतः एवढा मोठ्या किमतीचा मुद्देमाल वाहतुक करणार नाही. गरीब वर्गातील मजबुर चालकाकडेच असली धोक्याची कामे सोपवणार ! आणि चालकाला 60 लाख 48 हजार रुपये किमतीच्या गोवा दारु सह शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
टेंपो चालक घाटकोपर वेस्ट मुंबईचा रहिवाशी —
शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टेंपोच्या चालकाचे नाव व ठिकाण मोहमद इमरान मोहमद सलिम शेख, वय- 37 वर्ष, राहणार -रुम नंबर- 5/7, आझाद नगर झोपडपट्टी, जैनक स्टोअर समोर ,जी एस टेलर ,घाटकोपर वेस्ट मुंबई असे आहे.
तब्बल 60 लाख रुपये किंमतीची गोवा दारु जप्त —
Breaking News: गोवा दारुसह शिरुर पोलिसांनी पकडलेला टेंपो.
मुद्देमाल 60 लाख 48 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू व 15 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेंपो नंबर MH 48 CB 3605 .असा एकुण 75 लाख 48 हजार रुपये किमतीचा शिरुर पोलिसांनी जप्त केला आहे.
वरिष्ट पोलिस अधिकारी व शिरुर पोलिस पथकाने पार पाडली कारवाई —
शिरुर पोलिस स्टेशनमधे याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत. अर्थातच वरिष्ट पोलिस अधिकारी यांच्याशी कारवाई दरम्याण संपर्क करुन मार्गदर्शन घेण्यात येत होते. पुणे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, अंमलदार अप्पासाहेब कदम , शेखर झाडबुके,पोलिस उप निरीक्षक शुभम चव्हाण, महिला पोलिस हवालदार भाग्यश्री जाधव,पोलिस अंमलदार अप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके निरज पिसाळ,सचिन भोई,अजय पाटील,नितेश थोरात,रविंद्र आव्हाड या पोलिस पथकाने पार पाडली आहे.
एकंदित शिरुर पोलिसांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. समयसुचकता अप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दाखवली.अन्यथा हा टेंपो पुढे निघुन गेला असता ! कदाचित पुढेही कोठे पोलिसांच्या नजरेत आला नसता. आणि त्याचा सुत्रधार अशा बेकायदा कामात यशस्वी झाला असता !
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com