Mother's Day 2025: मदर्स डे 2025 या वर्षी 11 मे रोजी साजरा होत आहे. या दिवशी आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास संकल्पना, इतिहास, साजरीकरणाचे मार्ग जाणून या लेखात जाणून घ्या.अगदी यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा समजुन घ्या. एक प्रेमळ लेख आईसाठी!
Mother’s Day 2025: महान लोकांच्या आई विषयक भावना व विचार !
Mother’s Day 2025; प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सर्वात मोठी आणि शाश्वत साथ असते “आई” ची !…. तिच्या मायेची, त्यागाची नि निस्वार्थ प्रेमाची तुलना कुठल्याच नात्याशी अथवा अनुभुतिशी होऊ शकत नाही. म्हणून दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो तो ‘ मदर्स डे’ (Mother’s Day) अर्थात आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर क्षण असतो. दिवस असतो. मदर्स डे 2025 या वर्षी 11 मे 2025 रोजी हा दिवस साजरा होणार आहे.
मदर्स डे (Mother’s Day 2025) चा इतिहास काय आहे—-
‘मदर्स डे’ साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेत अॅना जार्विस या महिलने केली. तिच्या आईच्या आठवणीसाठी तिने 1908 मध्ये प्रथम हा दिवस साजरा केला होता. पुढे 1914 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अधिकृतपणे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ‘Mother’s Day’ घोषित केला होता.
आईचं महत्त्व का साजरं करावं?—-
महान लोकांच्या आई विषयी भावना व विचार.
आई असते पहिली गुरु, पहिली मैत्रिण, पहिली शिक्षिका—-
आई जन्म देतेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे जीवन जणगे शिकवते.
तिचं असतं निस्वार्थ प्रेम, रात्रंदिवसाचं कष्ट व आपल्यासाठी केलेल्या हजारो तडजोडी – या सर्वांची कबुली देण्याचा हा दिवस असतो.
1.आईला मनापासून धन्यवाद द्या.वाटल्यास एक छोटं पत्र किंवा हस्तलिखित कार्ड लिहुन कृतज्ञता व्मक्त करणारे ते असु द्या. आईला हे भावून जाईल. 2. एक दिवस आईसाठी : घरकामातून तिला विश्रांती द्या. तिच्या आवडीनुसार हा दिवस तिच्यासोबत घालवा. 3. आश्चर्य भेटवस्तू: Surprise Gift म्हणुन तिला उपयोगी किंवा भावनिक भेटवस्तू द्या . फुलं, आठवणींचे अल्बम, किंवा ज्वेलरी घेवुन द्या. 4. एकत्र जेवण करा: आईच्या हातचं जेवण आपण नेहमी खातो, पण या दिवशी आपण तिच्यासाठी काहीतरी बनवा. 5. तिचे आभार सोशल मिडियावर शेअर करा: तिच्यासाठी खास पोस्ट लिहा !तिच्यासोबतचा खास फोटो किंवा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करा.
आईचे आपल्या मुलावर असलेले हे अतिशय प्रेम आश्चर्यकारक आहे.याच्या मागचा क्रियाकारणभाव देखील समजुन घ्या. हे केवळ भावनिकच नाते,कौटुंबिक नाते ,रक्ताचे नाते नसून त्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. आम्ही खाली याचे शास्त्रीय स्पष्टीकरणही देतो आहे.
आईच्या प्रेमामागील वैज्ञानिक कारणे कोनती असतात? —
Mother’s Day 2025:आईच्या प्रेमामागील वैज्ञानिक कारणे कोनती असतात?
१. ऑक्सिटॉसिन हार्मोनचा असणारा प्रभाव (Oxytocin – Love Hormone)—
मुल जन्माला येताच आईच्या शरीरात ऑक्सिटॉसिन नावाचे हार्मोन मोठ्या प्रमाणात स्रवत असते. यालाच “लव्ह हार्मोन” देखील म्हटले जाते. हे हार्मोन आई आणि बाळामध्ये भावनिक बंध तयार करण्यास करते. बाळाला स्तनपान करताना, त्याला बिलगून झोपताना हे हार्मोन अधिक सक्रिय होत असते हे लक्षात ठेवा .
२. मेंदूतील भावनिक जोडणी :
कोनत्याही आईच्या मेंदूत बाळाच्या रडण्याचा किंवा हसण्याचा आवाज ऐकला की, भावना व सहवेदना यांच्याशी संबंधित मेंदूचे भाग (amygdala, hypothalamus, nucleus accumbens) हे अतिशय वेगाने सक्रिय होतात. त्याचमुळे आईला लगेच बाळाकडे धावावे वाटते.
३. उत्क्रांतीवादी दृष्टिकोन (Evolutionary perspective):
मानव प्रजाती जगण्याच्या दृष्टीने, आईचं बाळावर प्रेम असणं व त्याचं रक्षण करणं अत्यंत गरजेचे आहे. नैसर्गिक निवडीनुसार ज्या मातांमध्ये त्यांच्या बाळासाठी प्रेम व त्याच्या सुरक्षेची तीव्र भावना असणे निसर्गप्राप्त आहे.त्यामुळे त्यांची संतती जास्त काळ टिकते . पुढच्या पिढ्या निर्माण होत राहतात.
४. जनुकांची भावना (Genetic Bond):
आई व बाळामध्ये ५०% डीएनए समान असतात . त्यामुळे आईचा मेंदु बाळाला परकं न समजता “स्वतःचं अंश” नैसर्गिकरित्याच समजतो. हाच नैसर्गिक बंध सजीवांमध्ये माता व तिची संतान काळजी आणि प्रेम निर्माण करतो.
५. शारीरिक बदल व मनोवृत्ती:
गर्भावस्थेपासूनच आईच्या शरीरात अनेक हार्मोनल व न्यूरोकेमिकल बदल होत असतात. हे बदल आइची बाळाप्रती जाणीव, जबाबदारी व त्याच्याशी जोडलेपण अधिक दृढ करत असते.
निष्कर्ष काय निघतो?
आईचं तिच्या संततीप्रती प्रेम हे केवळ सामाजिक किंवा भावनिक रचना नाही. त्यामागे मेंदूचे, हार्मोन्सचे, गुणसुत्रे व उत्क्रांतीचे खोलवर शास्त्रीय वैज्ञानिक आधार आहेत. म्हणूनच आईचं प्रेम निरपेक्ष, गाढ,गुढही ,खोल अमर असतं.
——
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com