Modi Looses PoK? या प्रश्नावर आधारित सखोल विश्लेषण. ट्रम्पचा इशारा, चीन-पाकिस्तानची युती, भारताचं सार्वभौमत्व आणि ऐतिहासिक दृष्टिकोन यावर आधारित मराठी लेख.
Modi Looses PoK? – मोदींनी PoK गमावलं का?असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात ‘पाकव्याप्त काश्मीर’ (PoK) हा कायमच एक संवेदनशील मुद्दा राहिलेला आहे. परंतु अलीकडे आता मोदी सरकारने सिजफायर करुन पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे – “मोदी PoK हरले का?” हा प्रश्न राजकीय चर्चा, माध्यमं आणि सोशल मीडियावर गाजत आहे. चला, आपण या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊयात.
ट्रम्प यांचा इशारा: अमेरिकेची भूमिका बदलली का?
Modi Looses PoK? Donald Trump, USA President.
माजी अमेरिकन अध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत दावा केला होता की, “भारताला PoK बाबत अधिक आक्रमक होण्याची गरज आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल.” ट्रम्प यांच्या त्यावेळच्या वक्तव्यामुळे व आजच्या भारताच्या ट्रंफ यांच्या इशार्यानंतर मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे.
अमेरिका भारताचा महत्त्वाचा व्यापार व संरक्षण भागीदार आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे हे वक्तव्य राजकीयदृष्ट्या गंभीर मानले गेले. भारताला सतत PoK च्या मुद्यावर जागतिक पाठिंबा हवा असताना, ट्रम्प सारख्या नेत्याचा असा इशारा देत मोदी सरकार वर दबाव वाढवणारा ठरला आहे.
चीनची पाकिस्तानला मदत: घातक युतीचा धोका?
Modi Looses PoK?:क्षि जिनपिंग,चीन
चीन व पाकिस्तान यांच्यातील मैत्री नवीन नाही. चीनने PoK भागात ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (CPEC) सुरू केला.हा भारताच्या सार्वभौमत्वावर आघात होता. हा प्रकल्प PoK मधून जात होता. म्हणुन भारताने नेहमीच तीव्र आक्षेप घेतले होते.चीनच्या या हस्तक्षेपामुळे भारताला PoK बाबत अधिक सावध किंवा आक्रमक भूमिका घ्यावी लागत असते. त्यामुळे मोदी सरकारच्या सीजफायर भुमिकेवर प्रश्न उपस्थित होतो –चीनला रोखण्यासाठी पुरेशी कूटनीतिक तयारी मोदी सरकारची झाली नव्हती का?
भारतीय सार्वभौमत्वावरच प्रश्नचिन्ह?
आधी मोदी सरकार’ने 370 कलम रद्द केेलै. जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा संपवला.हा निर्णय ऐतिहासिक होता. मात्र, त्यानंतरही PoK भारताचा भाग आहे हे वारंवार सांगितले जात असले तरी आज तो हातात येण्यासारखी परिस्थिती असताना मोदी सरकारने ती प्रत्यक्ष कृती का केली नाही?
जर चीन आणि पाकिस्तान PoK वर नियंत्रण वाढवत होते , तर भारताचे “संपूर्ण काश्मीर भारताचा आहे” हे विधान वारंवार केले होते. ते कितपत प्रभावी राहते? देशाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी केवळ विधाने पुरेशी नसतात, तर प्रत्यक्ष कृतीची गरज असते.भारतीय सैन्य #PoK ताब्यात घेण्याच्या दिशेने जात असताना केवळ ट्रम्प मधे पिचकले.चीन ने एक घोषणा केली. म्हणुन सिजफायर चा ‘ट्रम्प हुकुम’ पाळुन ईमानदार कुत्र्याने भुंकणे ,धावणे थांबवावे,तसे सिजफायर स्विकारलेच कसे?लाल बहादुर शास्त्री व इंदिरा गांधी यांच्या वेळेस तर अमेरिका सरळ सरळ भारताच्या विरोधात व पाकिस्तानच्या बाजुने उभा होता!
भारत-पाकिस्तान व्यापार व अमेरिका: दबाव कुणावर?
भारत व अमेरिका यांच्यात 2024 मध्ये $200 अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्यापार झाला होता . भारत अमेरिकेच्या मोठ्या आयातदारांपैकी एक देश आहे. दुसरीकडे पाकिस्तान कंगाल अवस्थेत आहे.अमेरिकेवाचुन पाकिस्तान चे अडणार होते.पण भारताचे असे किती अडणार होते?इतर मित्रराष्ट्र भारताला नाहित का?
अमेरिकेच्या दृष्टीने भारत ट्रेडसाठी महत्त्वाचा आहे. पण पाकिस्तानच्या लष्करी व अन्वस्र भुमिकेमुळे त्याला थेट विरोध करणे अमेरिकेस कठीण वाटत होते का?की पाकिस्तान चीनच्या छावणीत पुर्णपणे ओढला जाईल अशी भिती ट्रम्प यांना वाटत होती का? त्यामुळे भारतावर PoK संदर्भात दबाव आणला गेला असण्याची शक्यता वाढते.विशेषतः जेव्हा चीन सारखी ताकदवर देश पाकिस्तानला मदत करण्याची भुमिका जाहिरपणे घेत असतो.
इंदिरा गांधी, लालबहादुर शास्त्री यांची भूमिका: आता असं काय बदललं?
Modi Looses PoK?इंदिरा गांधी अमेरिकसमोर नमल्या नव्हत्या !
१९७१ साली इंदिरा गांधींनी पाकिस्तानविरोधात निर्णायक युद्ध जिंकले व बांगलादेश निर्माण केला. यामध्ये ९०,००० पाकिस्तानी सैनिकांना बंदी बनवण्यात आले होते.त्यांनी भारतासमोर शरणागती पत्करली होती.
Modi Looses PoK? : लालबहादुर शास्रींनी ‘कणा’मोडला नाही !
लालबहादुर शास्त्री यांनी १९६५ च्या युद्धानंतर ‘ताश्कंद करार’ केला होता. पण त्यावेळी भारताची लष्करी ताकद तेव्हाही स्पष्ट होती. त्या तुलनेत आज मोदी सरकारकडे प्रचंड बहुमत, लष्करी ताकद, तांत्रिक कौशल्य, गुप्तचर यंत्रणा, आर्मी,नेव्ही व एअरफोर्स आणि जागतिक पाठिंबाही होता . तरीही PoK बाबत कार्यवाही केली गेली नाही.असै का ?
बढाईखोर माध्यमांच्या भूमिका: जनमत तयार झाले की संभ्रम निर्माण झाला?
देशातील काही माध्यमं नेहमी ‘मोदी सरकार सर्वकष आहे’, ‘PoK भारतात येणारच’ अशा बातम्यांनी जनमत तयार करत राहतात. त्यांना गोदी मिडीया असे ही म्हटले जाते. पण या बातम्यांमध्ये वास्तव कितपत असते? जर PoK वरील नियंत्रण चीन-पाकिस्तानकडे जाणार असेल, तर या देशाला माध्यमांनी खरा आरसा दाखवायला हवा होता.
तर मग, मोदींनी PoK गमावलं का?
या प्रश्नाचं उत्तर तसं इतकं सोपं नाही. प्रत्यक्ष कृती व कूटनीती यांच्या तुलनेत, PoK संदर्भातील धोरणांत सुसंगतता व स्थिरता, आक्रमकता यांबाबत संभ्रम जाणवतो. “मोदी हरले का?” असा थेट निष्कर्ष काढणे अतिरंजित ठरेल, पण निश्चितच हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे की ‘Modi Looses PoK? – मोदींनी PoK गमावलं का?’
निष्कर्ष काय निघतो?
PoK ही भारताच्या अस्मितेशी जोडलेली भूमी आहे. इंदिरा गांधी व शास्त्रींच्या काळात जसे निर्णायक निर्णय घेण्यात आले होते तशी संधी निर्माण झाली होती. तिचा फायदा उचलणे आवश्यक होते. केवळ राजकीय घोषणांनी ,मिडीयावर आयपीएल मधील सामण्यासारखी कॉमेंट्री करणे आवश्यक नसते. तर सामरिक व कूटनीतिक कृतींनी भारताचं सार्वभौमत्व सिद्ध करणं आवश्यक असते !
अधिक माहितीसाठी पुढील बाह्य स्रोत अम्यासा…
1.https://www.wikipedia.org/wiki/Pakistan_occupied_Kashmir 2. https://mea.gov.in/ (भारत सरकारचं परराष्ट्र मंत्रालय) 3. https://www.brookings.edu – आंतरराष्ट्रीय धोरणविषयक विश्लेषण 4. https://www.reuters.com – जागतिक घडामोडींसाठी 5. https://timesofindia.indiatimes.com – संबंधित बातम्या
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com