
Missing Woman : उरळगाव येथील विवाहित महिला बेपत्ता – पतीने दाखल केली मिसिंगची तक्रार
Missing Woman In Shirur Uralgaon
📰 शिरूर | मिसिंग बातमी | दिनांक : 4 जुलै 2025
Missing Woman: उरळगाव (शिरूर) येथून 32 वर्षीय विवाहित महिला कोमल सात्रस बेपत्ता. किरकोळ भांडणानंतर कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्याची तक्रार पतीकडून दाखल. शिरूर पोलिसांकडून तपास सुरू.
शिरूर तालुक्यातील उरळगाव येथून एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे.
➡️ मिसिंग रजि. नं: 109/2025
➡️ खबर देणारा: संभाजी शिवाजी सात्रस, वय 42, व्यवसाय – शेती, रा. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे.
➡️ मिसिंग तारीख व वेळ: 2 जुलै 2025 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता
➡️ मिसिंग ठिकाण: राहते घर, मौजे उरळगाव, ता. शिरूर
➡️ मिसिंग व्यक्तीचे नाव: कोमल संभाजी सात्रस
➡️ वय: 32 वर्षे
➡️ वर्णन: गव्हाळ रंग, उंची 5 फूट 3 इंच, अंगात हिख्या रंगाची साडी व ब्लाऊज, उजव्या भवईजवळ मस, गळ्यात मिनी मंगळसूत्र
पती संभाजी सात्रस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी किरकोळ घरगुती कारणावरून भांडण झाल्यानंतर कोमल सात्रस रागाच्या भरात कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडली व ती अद्याप परतलेली नाही. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असून यश न आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
➡️ तक्रार दाखल तारीख: 3 जुलै 2025 रोजी सायं. 5:20 वाजता (इंट्री क्र. 43/2025)
➡️ दाखल अमलदार: सहायक फौजदार बनकर
➡️ तपास अधिकारी: पो.ह. 398 पवार
➡️ प्रभारी अधिकारी: श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन
कोमल सात्रस यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास कृपया वरील मोबाईल क्रमांकावर किंवा शिरूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🔗
https://www.mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
https://www.google.com/maps – उरळगावचे स्थान पाहण्यासाठी
https://www.nhp.gov.in – नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन पोर्टल