
Contents
- 1 माऊली आबा कटके फाउंडेशन,शिरुर चे मकर संक्राती निमित्त आश्रम शाळेतील मुलांसाठी भोजन कार्यक्रम! तसेच शिरुर बाबत इंटरेस्टींग माहिती वाचा इथेच….
माऊली आबा कटके फाउंडेशन,शिरुर चे मकर संक्राती निमित्त आश्रम शाळेतील मुलांसाठी भोजन कार्यक्रम! तसेच शिरुर बाबत इंटरेस्टींग माहिती वाचा इथेच….
माउली आबा कटके यांच्या आमदार पदी निवडीचेही कार्यक्रमामागे स्वागत !
शिरुर, दिनांक- 15 जानेवारी : (डॉ. नितीन पवार )

माऊली आबा कटके फाउंडेशन,शिरुर चा मकर संक्राती निमित्त शिरुर येथील आश्रम शाळेतील मुलांसाठी भोजन कार्यक्रम संपन्न झाला. माउली आबा कटके यांच्या आमदार पदी निवडीचेही स्वागत या कार्यक्रमाद्वारे केले गेले आहे. तर शिरुर तालुक्यासंबंधी इंटरेस्टींग माहिती देखील इथे देण्यात आली आहे.
माऊली आबा कटके फाउंडेशन शिरुर . …
माऊली आबा कटके फाउंडेशन वतीने मकरसंक्रातीच्या निमित्त, आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांची तब्बल पाऊण लाख मतधिक्याने आमदारपदी निवड झाल्याबद्दल
शिरूर – हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके फाउंडेशन’ शिरूरयांच्या वतीने प्राथमिक आश्रमशाळा मोतीनाला,शिरूर येथे गोड स्नेहभोजनाचेचे आयोजन करण्यात आले.’माउली आबा अटके’
Read more >>
शिरुर मधे नाताळ निमित्त येशुची प्रार्थना संपन्न !
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात दि. २७-२८ डिसेंबर २०२४ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन !
या आयोजनामधे स्वप्निल रेड्डी, सुनिल जाधव,इ.माऊली आबा कटके यांच्या कार्यकर्त्यांचा या कामी बहुमोल असा वाटा होता.याप्रसंगी
आश्रमशाळेतील मुलांना झाला आनंद !
आश्रमशाळेतील मुले मुली यांच्यात आनंद व उत्सााह दिसुन आला.इतर मान्यवर,पत्रकार व नागरिक यांनी माऊली आबा कटके फाउंडेशन,शिरुर च्या कामाचे कौतुक केले. तसेच भावी कार्यासाठी सुभेच्छा दिल्या.माऊली आबा कटके यांचे आभार व्यक्त केले.
त्याच बरोबर वाचा शिरुर व तालुक्यातील काही इंटरेस्टिंग माहिती खास सत्यशोधक न्यूज च्या वाचकांना देत आहोत –

1. शिरूरच्या बाबतीत 1911 च्या इंटरनूटवरील नोंदीनुसार – शिरुर तालुक्याची 3,85,414 इतकी लोकसंखा आहे. त्याबाबतीत पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्याचा 6 वा क्रमांक लागतो.तर महाराष्ट्रात 50 वा क्रमांक लागतो. यापैकी 199585 लोक नोकरीत आहेत. 118181- इतके पुरुष आहेत.तर 81404 इतक्या महिला आहेत.
2. शिरूर तालुक्यातील बेरोजगारी 0℅ इतकी नोंदवण्यात आलेली आहे.याबाबबत शिरुर तालुक्याचा जिल्ह्यात 4 वा क्रमांक लागतो. तर महाराष्ट्रात 77 वा क्रमांक लागतो. मात्र ही नोंद 2011 च काय पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील कोनत्याही तालुक्यात असली तरी ती शक्य नाही. खोटी आहे.ती नोंद करणार्याच्या अकलेचे दिवाळे निघालेले असु शकते.
3. शिरूर तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण ८२℅ इतके नोंद केले गेले आहे.ती संख्या 278001 इसकी नोंदवली गेली आहे. हे ही काही खरे दिसत नाही. आणि साक्षरता आणि विद्वत्ता यांचा संबंध थोडाफार तरी असावा.पण याबाबत काय बोलावे ! याबाबबत शिरुर तालुक्याचा पुणे जिल्ह्यात 7 वा क्रमांक लागतो. अशी नोंद केली आहे.तर महाराष्ट्रात तो 117 वा क्रमांक नोंद केला गेलेला आहे.
4. शिरूर तालुक्यातील धार्मिक लोकसंख्या म्हणुन 37111 म्हणजे 76.14℅ हिंदू आहेत. 15.08℅-मुस्लिम आहेत. 0.42 ℅ ख्रिचियन आहेत.बाकी नवबौद्ध, जैन,शिख,पारशी,इ.ची बहुदा गणना हिंदूंमधे केलेली असावी.मात्र या धर्मियांना हे बर्याच अंशी मान्य नसते.आमचा स्वतंत्र वेगळा धर्म आहे असे त्यांचे मत असते.
5. शिरुर मधे जैन धर्मीय आहेत.ते मारवाडी म्हणुन ओळखले जातात.त्यात प्रामुख्याने स्वेतांबर पंथीय जैन धर्मीय लोक आहेत.तर दिगंबर पंथीय जैन मुनी देखील दृष्टिस क्वचित पडत असतात. हे मारवाडी मुळ राजस्थानातून १९ व्या शतकात महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत.त्याची बरीच कारणे त्यावेळी होती.
Read more >>
श्रीराम BCA / BCS महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची विद्यापीठ संघात निवड !
बहुजन समाजाचे झुंजार कार्यकर्ते श्री. दादासाहेब जगताप यांचे दुःखद निधन !
6. शिरुर शहरात चांभार समाज जुना असल्याची नोंद केली आहे. ब्रिटीश राजवटीत त्याच्याभोवती घोडा स्थिर होता.
7. तर मुस्लीम हा इंग्रजांच्या कडे नोकरीला होता. 8 . 16 मे 1990 ला शिरुर तालुक्यातील पहिला कॉर्पोरेट साखर कारखाना सुरु झाला .अशी नोंद आहे.
9. रांजणगाव MIDC-1984 सुरु झाली.ज्यानंतर शिरुर तालुक्याचा कायापालट झाला. कारेगाव, सणसवाडी, रांजणगाव गणपती ही 3 मोठी गावे वेगाने वाढली.
10 .रांजणगाव एम आय डी सी मधे प्रामुख्याने असलेल्या कंपन्या म्हणजे अपोलो टायर्स, व्ह्रोलपूलचे रेफ्रिजनेटर युनिट, एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा डावू हा टीव्ही आणि मोबाइल हँडसेट प्लांट. व्हील्स इंडिया, बजाज इलेक्ट्रिकल्स, फ्रिटो-ले : पेप्सिको होल्डिंग, फियाट ऑटोमोबाईल्स, किर्लोस्कर, स्वारोव्स्की, ओहसुंग, एक्वा प्रणाली जी पॅक केलेले पेय पाणी तयार करते इ.आहेत.
11. हरिता आणि हरिता फेहरर-सीटिंग सिस्टम कारखाना देखील येथे आहे. ‘हरितास श्रीनिवास सेवा ट्रस्ट’ हे 147 गावांमधे शिक्षण, आरोग्य, पाणी, पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि पर्यावरण यांवर काम करणारी एन जी ओ आहे.शिरुर तालुक्यातील 6,658 कुटुंबांना या ट्रस्टचा लाभ झाला आहे.
12. शिरुर तालुक्याचे हवामान स्टिपेट, कोपेन आणि गीगर यांच्या नोंदीनुसार BHs प्रकारचे आहे.
13. शिरुर तालुक्याचे 25.4•C- सरासरी वार्षिक तापमान नोंद केलेले आहे. 489 मिमी पाऊस प्रती वार्षिक नोंद करण्यात आला आहे. तापमान 30.8•C हे मे महिन्यात सर्वोच्च असल्याचे नोंद आहे. मात्र अलिकडील काळात ते यापेक्षा जास्त वाढलेले आहे.तर 21.1•C इतके कमितकमी ताफमान हे डिसेंबर महिन्यात नोंद केलेले आहे.
14 . शिरुर शहरात नगर परिषद शाळा, विद्याधाम प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल हे रयत एस संस्थेचे , उर्दू शाळा, इंग्रजी शाळा न्यू इंग्लिश स्कूल, आरएमडी इंग्लिश मीडियम स्कूल हे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे, जीवन शिक्षण मदिर,इ.शाळा आहेत. उच्च शिक्षणासाठी सी टी बोरा कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स आणि सायन्स, RMDIMT इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रुरल टेक्नॉलॉजी हे BCS, MCA चे शिक्षण देतात.छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे फार्मसी काॅलेज ,सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी हे आहे.तर शिक्रापूर येथे कस्तुरी शिक्षण संस्थेचे फार्मसी काॅलेज आहे.
लेखन विस्तार भयास्तव थोडीच माहिती इथे दिली आहे.
1 thought on “माउली आबा कटके फाउंडेशन,शिरुर चे मकर संक्राती निमित्त आश्रम शाळेतील मुलांसाठी भोजन कार्यक्रम! तसेच शिरुर बाबत इंटरेस्टींग माहिती वाचा इथेच….”