
Contents
शांतीनगर झोपडपटटीत लिंगपिसाटाचा कारनामा ?
तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे केले वर्तन !
शिरुर ,दिनांक 15 मार्च 2025:
( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
शांतीनगर झोपडपटटीत लिंगपिसाटाचा कारनामा पुढे आला आहे. या ठिकाणी एका तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन या लिंगपिसाटाने केले आहे. शिरुर पोलिस स्टेशन मधे संबंधित तरुणीने तक्रार दाखल केली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Read more >>
” दरम्यान सत्यशोधक न्युज कडे या संदर्भात अधिक माहिती येत आहे. याच वस्तीत महिलांचे भयंकर शोषण केले असल्याची माहिती मिळत.आहे.या वस्तीत दारुडे नवरे असलेल्या,विधवा झालेल्या महिला, परित्यक्या महिला या लैंगिक शोषणाच्या बळी पडत आहेत. त्यांना बळजबरीने कुटुंबीयांकडुनच बेकायदेशीर वेश्याव्यवसायास परावृत्त केले जात आहे. घरातील पुरुष देखील त्यांचे लैंगिक शोषण करत आहेत. कष्टप्रद असणारे भंगार वेचण्याच्या कामाला त्यांना पाठवले जाते. त्याच पैशातुन दारुबाज पुरुष दिवसभर दारु पेत असतात.
काहीही काम न करता दारु पिणे,कुटुंबांत शिवीगाळ,महिलांना मारहाण प्रसंगी अशी लैंगिक आगळीक केली जात आहे. घोडनदीच्या पलिकडे व एम आय डी सी रांजणगाव परिसरात येथील तरुणींना बेकायदेशीर वेश्या व्यवसायासाठी प्रवृत केले जात आहे. काही पुरुष यामधे दलाल म्हणुन काम करत आहेत. लहान वयातील मुला मुलींना सर्रास शहरात फिरुन कोणाकडे वडापाव माग,कोणाला कडेवरील मुल दाखवुन ते आजारी असल्याचे सांगुन त्याला दवाखान्यात नेण्यासाठी एखादा दयाळु माणुस हेरुन त्याच्याकडे पैसे मागायला सांगणे.ते पैसे दारु पिण्यासाठी वापरणे असे वर्तन येथील पुरुष करतात.
काही स्रीया विमल खाणे,दारु पिणे सर्रास करतात.विमल गुकखा खाण्यासाठी पैसे मागणे किंवा विमल घेवुन द्या असे म्हणणे.असे करत शहराच्या मध्यवर्ती भागात फिरत असतात.या सर्व बाबींची महिला पोलिसांकडुन छाणणी करणे आवश्यक आहे. यातुन काही शोषित घटकांना न्याय मिळेल.जीवन माणुस किती वर्षे जगतो ते महत्त्वाचे नसते.तर कोनत्या दर्जाचे जीवन जगतो ते महत्त्वाचे असते असे डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. याची जाणीव अद्यापही लाखोंच्या करोडोंच्या संख्येने असणार्या अनेक वंचित समाज घटकांना करुन देण्याची बाबासाहेबांनी सांगितलेली गरज आजही आहे.”
हकीकत अशी आहे. दिनांक 14 मार्च 2025 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या . सुमारास शांतीनंगर झोपडपटटी, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे येथील तरुणी (नाव गुप्तता) व तिची मुले असे घरांत होते. तेव्हा त्यांच्या घरात सुरेश पोपट लोंढे अचानक घुसला. तो दारू पिवुन आला होता. त्याने तरुणीचा हात धरला. तिची छेड काढुन तिला म्हणु लागला की, ‘तु माझ्या जवळ येवुन झोप’ ! हे तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आहे.
Read more >>
त्याची तिला लाज वाटेल,असे कृत्य केले.तसेच तिला शिवीगाळ केली. दमदाटी केली. म्हणुन सुरेश पोपट लोंढे, राहणार – शांतीनंगर झोपडपटटी, शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे याच्या विरूदध सदर तरुणीने शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
आरोपी –
सुरेश पोपट लोंढे, राहणार – शांतीनंगर, झोपडपटटी, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर -१७७/२०२५ असा आहे. तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम३३३,७४,३५२, ३५१(२),३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
दाखल अमंलदार पोलीस हवालदार श्री. आगलावे हे आहेत. तर पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार कोथळकर हे करत आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे,शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.