
Contents
- 1 हापिज सईदचे सिक्रेट ठिकाण कुठे आहे? एक चर्चा.
- 1.1 हापिज सईदचे सिक्रेट ठिकाण कुठे आहे? अजित डोवाल यांचे ,’ सिक्रेट मिशन ?
- 1.1.1 हापिज सईद: एक ओळख—–
- 1.1.2 हापिज सईदविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर खटले—
- 1.1.3 हापिज सईद: पाकिस्तान सरकारच्या संरक्षणाच्या छायेत–
- 1.1.4 2020 नंतरचा काळ: हापिजला अटक की नाटक?—-
- 1.1.5 हापिज सईदच्या सिक्रेट ठिकाणांची शक्यता असलेले मुख्यत: पुढील प्रमाणे होती—
- 1.1.6 हापिज सईदसाठि गुप्त ठिकाणे का निवडली जातात?—
- 1.1.7 हापिज सईद बाबत पश्चिमेकडील मीडिया काय सांगतो ?—
- 1.1.8 हापिज सईद बाबत भारताची भूमिका व प्रतिक्रिया–
- 1.1.9 सारांश काय निघतो? हापिज सईद अजूनही सुरक्षित स्थळी आहे का?—-
- 1.1.10 पाक लष्करचा हापिज सईदला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न—
- 1.1.11 About The Author
- 1.1 हापिज सईदचे सिक्रेट ठिकाण कुठे आहे? अजित डोवाल यांचे ,’ सिक्रेट मिशन ?
हापिज सईदचे सिक्रेट ठिकाण कुठे आहे? एक चर्चा.
हापिज सईदचे सिक्रेट ठिकाण कुठे आहे? अजित डोवाल यांचे ,’ सिक्रेट मिशन ?
(लेख – डॉ.नितीन पवार संपादक सत्यशोधक न्युज शिरुर /पुणे)
हापिज सईद: एक ओळख—–
हापिज सईद हे नाव भारतासाठी धोक्याचा एक मोठा चेहरा ठरले.याला बरीच वर्षे झाली. 2008 मधे मुंबईवर झालेल्या आतंकी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून हापिज सईद ओळखला जातो. तो जमात-उद-दावा (JuD) या संस्थेचा प्रमुख आहे. ही संस्था ‘लष्कर-ए-तय्यबा‘ या दहशतवादी संघटनेशी जोडलेली आहे असे मानले जाते.
हापिज सईदविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर खटले—
भारतातून व आंतरराष्ट्रीय स्तरावर हापिज सईदविरुद्ध बरेच खटले दाखल करण्यात आलेले आहेत. अमेरिका व संयुक्त राष्ट्र संघटनेने हापिज सईद याला ‘ग्लोबल टेररिस्ट‘ म्हणुन घोषित केलेले आहे. तरीही पाकिस्तानात तो बराच काळ मोकळेपणाने फिरत होता. त्यामुळे एक प्रश्न निर्माण कायम व्हायचा – हापिज सईदचे सिक्रेट ठिकाण कुठे आहे?
Read more >>
हापिज सईद: पाकिस्तान सरकारच्या संरक्षणाच्या छायेत–
अनेक शोध व गुप्त अहवालांनुसार हापिज सईदला पाकिस्तानी सशस्त्र संस्थांकडून संरक्षण दिले जात आहे . त्याचे ठिकाण देखील सतत बदलले जात असे.त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावाखाली पाकिस्तान सरकारला त्याच्यावरील कारवाई टाळता येत होती .मात्र काही विश्लेषकांचे म्हणणे होते की
तो लाहोर जवळ ‘मुरिदके’ भागात एका किल्ल्यासारख्या भागात राहत आहे.
हा भाग ‘जमात-उद-दावा‘ चे मुख्यालय म्हणुन प्रसिद्ध आहे.याच ठिकाणी त्याच्यासाठी एक खास सुरक्षा ‘कवच‘ निर्माण करण्यात आले होते. ISPR (Inter-Services Public Relations) किंवा पाकिस्तानी लष्कराचे गुप्त समर्थन देखील त्याला मिळत होते. असा संशय व्यक्त करण्यात येत असे.
Read more >>
‘क्या भारत और पाकिस्तान के बीच में युद्ध होगा?’
2020 नंतरचा काळ: हापिजला अटक की नाटक?—-
2020 मध्ये पाकिस्तान सरकारने हापिज सईदला अटक केली होती.त्याला अँटी-टेररिझम कोर्टाने दोषी ठरवले होते. मात्र या अटकेबाबत संशय अनेकांना होताच ! त्यामुळे ही अटक संशयाच्या भोवऱ्यात राहिली . इतर अनेक सुरक्षा तज्ज्ञांचे मत असे होते की ही अटक FATF (Financial Action Task Force) च्या दबावामुळे करण्यात आली होती. हापिज सईद याला खरंच तुरुंगात ठेवले गेले होते की नाही असा संशय होता.’ हाऊस अरेस्ट’ च्या सबबीखाली त्याला एका ‘खास’ ठिकाणी ठेवण्यात आले होते, हे अस्पष्ट होते.अनेकांनी असेही आरोप केले होते की तो एका “सिक्रेट लोकेशन” मध्ये राहत आहे. जिथे त्याला पाक लष्कर व आयएसआयकडून संपूर्ण संरक्षण मिळत होते .
हापिज सईदच्या सिक्रेट ठिकाणांची शक्यता असलेले मुख्यत: पुढील प्रमाणे होती—

1. मुरिदके, लाहोर (Muridke, Lahore):हे ‘जमात-उद-दावा’ चे मुख्यालय आहे. हा अत्यंत सुरक्षित परिसर मानला जात होता. धार्मिक प्रशिक्षण केंद्र व गेस्ट हाऊस असा हा भाग आहे.
2. रावलपिंडी (Rawalpindi): हे ISI व पाकिस्तानी लष्कर मुख्यालयाजवळचे एक सुरक्षित क्षेत्र आहे.अनेक आतंकी नेटवर्क्ससाठी सुरक्षित आश्रयस्थान असा हा भाग मानला जातो.
3. ‘अबोटाबाद’ च्या आसपासचा भाग–
याच ठिकाणी ओसामा बिन लादेन पुढे मारला गेला.अर्थात हे क्षेत्र ‘गुप्त’ हालचालींसाठी उपयुक्त असे मानले जाते.
Read more >>
Pahelgam Incident:पहलगाम हमला- निर्दोष पर्यटकों पर आतंकी हमला, देशभर में आक्रोश
हापिज सईदसाठि गुप्त ठिकाणे का निवडली जातात?—
• आंतरराष्ट्रीय दबाव चुकवण्यासाठी.
• ‘गुप्त नियोजन’व’ संपर्क सुविधा’ राखण्यासाठी उपयुक्त म्हणुन.
• लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी व नव्या कारवायांची योजना तयार करण्यासाठी.
हापिज सईद बाबत पश्चिमेकडील मीडिया काय सांगतो ?—
BBC, The Guardian, व New York Times यासारख्या संस्थांनी अनेक वेळा हापिज सईदच्या हालचालींवर रिपोर्ट दिलेले आहेत.
त्यांच्यामते—-
• पाकिस्तान सरकार त्याला फक्त जगाला ‘दाखवण्याची अटक’ करत होते.
• प्रत्यक्षात तो ISI च्या गुप्त नेटवर्क मध्ये लपून राहत आहे.
• त्याचे ठिकाण कायम बदलले जात होते. जेणेकरून कोणत्याही क्षणी हापिज सईदवर कारवाई होऊ नये.
हापिज सईद बाबत भारताची भूमिका व प्रतिक्रिया–

भारताने अनेकवेळा पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तान सरकारने “पुरावा नाही” असे कारण देत वेळोवेळी हापिज सईदवर कारवाई करण्याचे टाळले.2019 नंतर UN व FATF चा दबाव वाढला. पाकिस्तान काही प्रमाणात ‘अॅक्शन’ मोडवर आल्यासारखे दाखवु लागला. पण काही खरी कारवाई नव्हती. की होती? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
सारांश काय निघतो? हापिज सईद अजूनही सुरक्षित स्थळी आहे का?—-
हापिज सईदचं ‘सिक्रेट’ ठिकाण हे आजही तसे एक रहस्याच आहे. भारतीय मिडीया आज ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पाकिस्तान त्याला शिक्षा झाल्याचे जाहीर करतो.पण त्याचे पहलगाम आतंकी हल्ल्यानंतर एक प्रक्षोभक भाषण मिळते.असे असले तरी:हापिज सईदचे त्याचे ठिकाण निश्चित नाही.त्याच्यावर पाकिस्तान दाखवत असलेली कारवाई निव्वळ ‘नाटक‘ आहे, असे अनेकांचे मत आहे. ISI कडून त्याला संरक्षण मिळत असणारच आहे.
पाक लष्करचा हापिज सईदला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न—
पण पाक लष्करही त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार हे निश्चित! ही शक्यता आजही तशीच आहे ! कारण ‘हापिज सईद’ हा केवळ एक व्यक्ती नाही, तर दहशतवादाच्या रस्त्यावर चालणारी एक पाकिस्तान व ‘इतर'(?) अशी एक मोठी यंत्रणा आहे. हापिज सईदचे ‘सिक्रेट ठिकाण उघड करणं म्हणजे पाकिस्तानच्या गुप्त यंत्रणांचा खरा चेहरा समोर आणणं आहे .
पण तो दिवस जवळ दिसतो आहे, कारण अजित डोवाल यांचे, ‘मिशन ‘! म्हणुश त्याच क्षणाची वाट जग पाहत आहे.
1 thought on “हापिज सईदचे सिक्रेट ठिकाण कुठे आहे? एक चर्चा.”