Hinduism:हिंदुत्व म्हणजे नुसतेच पूजा-अर्चा करणे नाही. तर ती एक समग्र जीवनदृष्टी आहे. या लेखात हिंदुत्वाचा खरा अर्थ, त्यातील विविध संप्रदाय, धार्मिक ग्रंथ, संस्कृती आणि तत्त्वज्ञान यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदुत्वाची सर्वसमावेशकता, सहिष्णुता आणि शाश्वत तत्त्वे यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.ती माहिती आमच्या वाचकांना उफयुक्त ठरेल.असे आम्हाला वाटते.
प्रारंभी एक बाब समजुन घेतली पाहिजे की धर्म ( Religion) या शब्दाचा डिक्शनरीमधील अर्थ असे दर्शवतो की कोनत्याही धर्मांचा एक निर्माता ईश्वर, प्रेषित असतो.त्याने एक पवित्र ग्रंथ निर्माण करुन त्याच्या निर्मात्याने दिलेला विचार ,उपदेश व संदेश त्या ग्रंथात असतो. पण आजचा हिंदु धर्म हा या अर्थाने धर्म ठरत नाही.पण हिंदु धर्म म्हणुन तो आज जगभर समजला जातो.त्याला समाजात तशी मान्यता मिळाली आहे.पण एक विरोधाभास उत्पन झाला.तो असा की ‘हिंदु‘ हा शब्द हिंदुंचे जे ग्रंथ आहेत.त्यात सापडत नाही.ते ग्रंथ म्हणजे वेद,उपनिषेद,पुराणे,सृती,स्मृती,आरण्यके,बाह्मण्यके,रामायण, महाभारत अशा प्रमुख ग्रंथात हा शब्द सापडत नाही. हा शब्द अलिकडच्या काळात सापडतो.तो पारशी भाषेत सापडतो.याचा अर्थ भारताच्या पश्चिमेकडील आजच्या देशांमधुन हा शब्द आला आहे.पारशीमधे सिंधु चा उच्चार हिंदु असा नंतर केला गेला.सिंधु नदीच्या परिसरातील राहणारे लोक अशा अर्थाने तो वापरला गेला आहे असे अभ्यासकांना आढळुन आले.तोपर्यंत भारतातील लोकांना हिंदु म्हणणे जगभर प्रचलित झाले होते. तरी इथे एक किंवा एका पेक्षा जास्त अशा विविध तत्वज्ञानाचे प्रवाह व विचारधारा अस्तित्वात होत्या.त्यांचा उल्लेख वैदिक,सनातन धर्म ,बुद्ध परंपरा,जैन,शैव,वैश्णव,तंत्र,चार्वाक,सांख्य इ.त्या होत्या.
स्वामी विवेकानंद –
“जगाला जर कोणता एकच धर्म स्वीकारायचा असेल, तर तो हिंदू धर्मच असावा. कारण तोच एकमेव सहिष्णुता शिकवतो.”
“हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नाही, तर तो एक जीवनपद्धती आहे.”
“हिंदू हा ना केवळ स्वधर्माचा, तर सर्व धर्मांचा मान राखणारा असतो.”
गोलवलकर गुरुजी (एम. एस. गोलवलकर) –
श्री.गोळवलकर गुरुजी
“हिंदू हा केवळ एक धार्मिक संज्ञा नाही, तर ही एक संस्कृती आणि परंपरा आहे.”
“हिंदुत्व हे केवळ पूजापद्धती नाही, तर ते एक संपूर्ण राष्ट्रवादाचे प्रतीक आहे.”
“हिंदू समाजाच्या एकतेतच देशाच्या भविष्यातील यश दडले आहे.”
बाळासाहेब ठाकरे –
श्री.बाळासाहेब ठाकरे
“मी आधी हिंदू आहे, मग त्यानंतर इतर काही.”
“हिंदू धर्म हा कधीच आक्रमक नव्हता, पण जर तो टिकून राहिला पाहिजे, तर त्याला आता आक्रमक व्हावे लागेल.”
“हिंदू एकत्र आले तर त्यांच्यापुढे कोणताही विरोधक टिकू शकणार नाही.”
म्हणुन अलिकडच्या काळात या सर्वांना एकत्र बांधण्यासाठी आधी प्रचलित झालेला हिंदु हा शब्द व्यापक अर्थाने हिंदुत्व असा वापरला गेला. तो सर्व विचार,परंपरा, प्रथा,उपासना पद्धती,देव,देवता,कर्मकांड इ.सर्व हिंदुत्वाच्या व्याख्येत आणले गेले.त्यातुन ,’ हिंदुत्ववाद ‘ हा विकसित झाला.असे वास्तव नाकारणे शक्य नाही.या हिंदुत्ववादाचा प्रचार व प्रसार हिंदुंमधे करण्यात आला.बहुसंख्येने हा विचार वैविध्य असलेल्या हिंदुंनी स्विकारला देखील आहे.आणि तोच आजचा ‘हिंदुत्ववाद’ आहे.त्यालाही जगभर मान्यता मिळाली आहे. म्हणुन आज हिंदु धर्म हा या व्यापक अर्थाने प्रचलित होत आहे.हे हिंदुत्ववादाची मांडणी करणारे आधुनिक काळातील प्रामुख्याने स्वामी विवेकानंद, विणायक दामोदर सावरकर,गोळवलकर गुरुजी,बाळासाहेव ठाकरे या हिंदुत्ववादाच्या पुरस्कर्यांना यश मिळाले आहे.’ हिंदु एक समृद्ध अडगळ’ या मराठी पुस्तकाचे लेखक ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या विषयाची व्यापक मांडणी करण्याचा प्रयत्न केला.तो मुळातुन वाचण्यासारखा आहे.
हिंदुत्ववादानुसार हिंदुत्व हा केवळ एक धर्म नाही.तर एक वैविध्यपुर्ण जीवनशैली,जिवनपद्धती , संस्कृती आणि तत्त्वज्ञान आहे. त्याचे अंश ज्याअर्थी असेतुहिमाचल अस्तित्वात आहेत.त्यामुळे या मांडणीला चुकीची मांडणी म्हणुन कोणी सिद्ध करु शकले नाही.कारण ते वास्तव आहे.हे खरे !
या लेखात आपण याच हिंदुत्वाचा अर्थ, मूलतत्त्वे,त्याचे विविध पैलू ,आधुनिक काळातील त्याचे महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करु !
ACHEIVEMENT —
Achievement by Dr. Nitin Pawar,Pune.
हिंदुत्ववाद हा फार मोठा विषय—-
वास्तविक हिंदुत्ववाद हा फार मोठा विषय आहे.आमच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे.म्हणुन जे काही या संबंधाने आम्हाला आकलन होत आहे. व इतर हिंदुत्ववादी लेखकांना लिहिण्यासाठी एक व्यासपिठ मिळावे.यासाठी ‘सत्यशोधक न्युज ‘ने ,’ हिंदुत्ववाद ‘ ही एक क्षेणी/Catagory निर्माण केली आहे. त्यातला हा पहिला लेख आहे.
प्रस्तावना—
हिंदुत्व किंवा हिंदू धर्म हा आता वैदिक अथवा सनातन धर्म हे नाव परिवर्तीत होवुन जगातील सर्वात प्राचीन आणि गहन धर्मांपैकी एक धर्म बनला आहे.यात शंका नाही. पण हिंदुत्व म्हणजे नक्की काय? हिंदु लोक जे अनेक देवी-देवतांची पूजा करतात. व्रते,वैकल्ये,उपवास वगैरे करतात.त्या पेक्षा काहीतरी अधिक आहे ! आता यापुढे हिंदू व हिंदुत्व असाच आपण शब्द विपरु. तर हे हिंदुत्व हे एक विशाल असे तत्त्वज्ञान आहे. जो मानवाच्या जीवनाच्या अनेक पैलूवर प्रकाश टाकतो. हा धर्म केवळ नियमांचा संग्रह नसून एक स्वतंत्र आणि बहुआयामी जीवनपद्धती आहे.हे आजचे वास्तव आहे.
हिंदुत्वाचा अर्थ—-
‘हिंदुत्व’ हा शब्द ‘हिंदू’ या शब्दापासून तयार झाला हे आपण पाहिले. प्राचीन काळात सिंधू नदीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सिंधु,त्या भागात आज सिंध नावाचा एक प्रांतही आहे .सिंधुचे हिंदु झाले. कालांतराने हा शब्द आज एक धर्म, संस्कृती,जीवनपद्धती,एक तत्त्वज्ञान बनला.
हिंदुत्वाला ‘सनातन धर्म’ असेही म्हणत होते. ‘सनातन’ म्हणजे शाश्वत, ज्याला कोणतीही सुरुवात किंवा शेवट नाही.त्यामुळे हिंदुत्व हा केवळ धर्म नसून जीवन जगण्याची एक पद्धत आहे.असेच म्हणणे प्रचलित झाले आहे.त्यात गैर असे काही नाही.
हिंदुत्वाची मूलतत्त्वे कोनती ? —
1. धर्म नेमका कोनता? —
हिंदुत्वात ‘धर्म’ म्हणजे केवळ पूजाप्रकार नाही. तर नैतिकता, कर्तव्य आणि न्याय यांचा समुच्चय आहे .यानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा धर्म असतो (स्वधर्म) .जो त्याच्या वर्ण, आश्रम आणि क्षमतांनुसार ठरतो.मुळ ऋग्वेदात वर्ण कर्माने ठरत होते.असे अभ्यासक म्हणतात. नंतर ते जन्मावरून ठरु लागले.म्हणजे एक प्रथा बनले !
2. कर्मतत्त्व म्हणजे काय? —
हिंदुत्वात कर्मयोग आहे.त्याला विशेष महत्त्व आहे.”जसे कर्म, तसे फल“! असे हे तत्त्व सांगते. प्रत्येकाचे भविष्य त्याच्या कर्मांवर अवलंबून असते. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात,”कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” म्हणजे ,’ फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म कर.’
3. पुनर्जन्म आणि मोक्ष संकल्पना —-
हिंदुत्वात असा विश्वास आहे की आत्मा अमर असतो. तो वेगवेगळ्या जन्मांतुन प्रवास करतो.पुनरपी नजमम् पुनरपी मरणम् ! आत्मा अ जन्म-मृत्यूच्या या चक्रातून सुटणे म्हणजे मोक्ष. हा मोक्ष योगाद्वारे साधतात येतो. ज्ञानयोग, भक्तीयोग,कुंडलिनी योग, किंवा कर्मयोगाद्वारे हा ‘मोक्ष’ प्राप्त होऊ शकतो.
4. वैविध्यामधे एकता —-
हिंदुत्ववाद हजारो देवी-देवतांना मानतो.मुर्तीमधे ईश्वराचा अंश आहे .असे मानतो. परंतु हे सर्व एकाच परमसत्याचे (ब्रह्म) विविध रूपे आहेत.असे हिंदुत्ववाद मानतो. “एकं सत् विप्रा बहुधा वदंति” (ऋग्वेद) — सत्य एकच आहे. ज्ञानी लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात.
5. अहिंसा आणि सहिष्णुता—
हिंदुत्वामध्ये अहिंसा परमो धर्मः (जैनमत) (अहिंसा हा सर्वोच्च धर्म) या तत्त्वाला महत्त्व आहे. बुद्ध, महावीरांनी या तत्वाचा जोरदार पुरस्कार केला.
हिंदुत्वाचे प्रमुख ग्रंथ—-
1. वेद —
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे चार वेद हिंदुत्वाचे पाया आहेत.असे मानले जाते. यात ज्ञान, विज्ञान, आध्यात्मिकता, यज्ञविधीं, तत्त्वज्ञान अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत .
2. उपनिषदे —-
उपनिषदांमध्ये ब्रह्म (परमात्मा) आणि आत्मा (जीवात्मा) यांच्या शकते (अद्वैत) भर दिला आहे.
३. गीता—
महाभारतातील भगवद्गीता हे हिंदुत्वाचे प्रमुख तत्त्वज्ञान आहे. इथे कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे सुंदर विवेचन केले आहे.
४. पुराणे—
१८ पुराणांमध्ये देवी-देवतांच्या कथा, इतिहास आणि नीतितत्त्वे सांगितली आहेत.
हिंदुत्वातील विविध संप्रदाय—-
हिंदुत्व हा एकरूप नसून त्यात अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत.
वैष्णव — विष्णू किंवा कृष्ण भक्त
– शैव शिवभक्त
– शाक्त — देवी (दुर्गा, काली) उपासक
– स्मार्त — सर्व देवतांची पूजा करणारे
– योगी आणि साधू — ध्यान आणि तपस्या करणारे
आधुनिक युगात हिंदुत्व—
आजच्या जगात हिंदुत्वाची तत्त्वे अधिक प्रासंगिक झाली आहेत.
योग आणि ध्यान — जगभर प्रचलित
– वसुधैव कुटुंबकम् — संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे
– पर्यावरण संरक्षण — नद्या, वृक्ष, प्राणी यांची पूजा
– वैज्ञानिक दृष्टिकोन — वेदांतील खगोलशास्त्र, गणित
निष्कर्ष—
हिंदुत्व म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर जीवनाचे तत्त्वज्ञान. ते सर्वांना स्वीकार्य, सहिष्णु आणि शाश्वत मार्ग दाखवते. हिंदुत्व हा मानवतेचा, नैतिकतेचा आणि आध्यात्मिकतेचा धर्म आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com