
Contents
- 1 शिरुर जवळील एका गावात एक व्यक्ती ,’हवेत’,कोयता फिरवुन ,’हवा’ करत होता.तेवढ्यात पोलिस आले ! पुढे काय घडले ते वाचा…..
- 1.1 शिरुर पोलिस स्टेशन मधे ‘हत्यार’ कायद्यानुसार गुन्हा दाखल!
- 1.1.1 शिरुर,दिनांक 11 जानेवारी: ‘सत्यशोधक न्युज रिपोर्ट ‘
- 1.1.2 शिरुर पोलिसांना फोनद्वारे मिळाली माहिती !
- 1.1.3 शिरुर पोलिस घटनास्थळी रवाना!
- 1.1.4 ‘हवा व दहशत करणार्याजवळ ‘कोयता’ !
- 1.1.5 त्याचे वर्णन खालील प्रमाणे—
- 1.1.6 शिरुर पोलिसांनी केला पंचासमक्ष पंचनामा व ‘कोयता’ जप्त !
- 1.1.7 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल !
- 1.1.8 About The Author
- 1.1 शिरुर पोलिस स्टेशन मधे ‘हत्यार’ कायद्यानुसार गुन्हा दाखल!
शिरुर जवळील एका गावात एक व्यक्ती ,’हवेत’,कोयता फिरवुन ,’हवा’ करत होता.तेवढ्यात पोलिस आले ! पुढे काय घडले ते वाचा…..
शिरुर पोलिस स्टेशन मधे ‘हत्यार’ कायद्यानुसार गुन्हा दाखल!

शिरुर,दिनांक 11 जानेवारी: ‘सत्यशोधक न्युज रिपोर्ट ‘
शिरुर जवळील एका गावात एक व्यक्ती , ‘हवेत’, कोयता फिरवुन , ‘हवा’ करत होता. तेवढ्यात पोलिस आले ! पुढे काय घडले ते पुढे वाचा ! शिरुर पोलिस स्टेशन मधे ‘हत्यार’ कायद्यानुसार या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शिरुर तालुक्यातील अण्णापुर या गावी घडली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर पोलिसांना फोनद्वारे मिळाली माहिती !
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद केल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 17/01/2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अजय हरिश्चंद्र पाटील ,पोलीस कॉन्स्टेबल ,वय – 24 वर्ष, नोकरी नेमणूक ,शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हे पोलीस ठाणे शिरुर पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलींग करत असताना पोलिस ठाणे अंमलदार यांना एका इसमाने फोन करून कळविले की,’ एक इसम अनण्णापूर गावात हातात कोयत्या सारखे हत्यार घेवून जोर जोरात आरडाओरडा करत दहशत माजवत आहे.त्यामुळे रस्त्याने जाणारे येणारे लोक घाबरत आहेत.
Read more >>
ब्रेकींग न्युज : 17 कमानीच्या पुलाजवळ अपघातात एक जण जागीच मृत्युमुखी !
शिरुर पोलिसांनी प्रतिबंधित 292 किलो वजनाचे गोमांस केले जप्त ! (पहा व्हिडिओसह)
शिरुर पोलिस घटनास्थळी रवाना!
सदर बातमीचा आशय ठाणे अंमलदार यांनी सांगितला. ते म्हणाले की सदर ठिकाणी जाऊन सदर इसमास ताब्यात घ्या. असे सांगून त्यांना सदर ठिकाणी रखाना केले. त्यानंतर फिर्यादी व पोलिस सब इनस्पेक्टर शुभम चव्हाण सोबत पोलिस हवालदार श्री. जगताप,पोलिस अंमलदार श्री. रावडे व दोन पंचांसह असे सदर ठिकाणी रवाना झाले. तेथे जावून सदर इसमास ताब्यात घेतले.
‘हवा व दहशत करणार्याजवळ ‘कोयता’ !
त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव गोविंद दशरथ जगताप उर्फ मायाभाई ,वय -36 वर्षे, राहणार- आण्णापुर, तालुका -शिरूर, जिल्हा – पुणे असे सांगितले.त्याची अंगझडती घेतली असता त्याचे उजव्या हातामध्ये लोखंडी कोयता मिळाला. तो दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला .
त्याचे वर्णन खालील प्रमाणे—
1) 200/-रू कि. एक 5 सेमी लांब लाकडी असलेला मुठे पासुन पुढे 27 सेमी लांब असलेला व 10 सेमी रूंदी असलेला त्याची जाडी 1 सेमी एका बाजुने धारदार असलेला लोखंडी कोयता किंमत 200/-रूपये आहे.
शिरुर च्या नदीकाठी आरामात गांजा ओढत होते ; पण नियतीला हे मंजुर नव्हते ! कसे ते वाचा…
शिरुर पोलिसांनी केला पंचासमक्ष पंचनामा व ‘कोयता’ जप्त !
हा वरील वर्णनाचा व किंमतीचा लोखंडी कोयता पोलिस हवालदार श्री. जगताप यांनी पंचनम्याने दोन पंचासमक्ष जागीच जप्त केले. त्यावर पंचाची व पोलीसांची सहयांची सिले व लेबले जागीच करण्यात आली. त्यास पकडले ती वेळ संध्याकाळी वाजण्याची 5 वाजण्याची होती.
भारतीय हत्यार कायदा आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कदम 4 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल !
तरी आज ता. 17/01/2025 रोजी सायंकाळी 19: 00 वाजण्याच्या सुमारास आण्णापुर ,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे येथे गोविंद दशरथ जगताप उर्फ मायाभाई ,वय -36 वर्षे ,राहणार -आण्णापुर, तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे यांस सार्जजनिक ठिकाणी कोयत्या सारखे हत्यार जवळ बाळगुन दहशतीचे वातावरण केले आहे.म्हणून त्याच्या विरुद्ध हत्याराचा कायदा कलम 4 (25) प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे.
शिरुर मधे 46 वर्षीय इसमाचा इलेक्ट्रिक शॉक लागुन दुर्देवी मृत्यु!
दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री. वारे हे आहेत.पुढीलतपासी अमंलदार पोलिस हवालदार श्री. जगताप हे करत आहेत.प्रभारी आधिकारी , पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे ,शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.