
Contents
Harassment Of Old Parents By Son Case : वयोवृद्ध आई वडिलांना त्रास देणार्या मुलावर अखेर गुन्हा दाखल ! तालुक्यात खळबळ !
Harassment Of Old Parents By Son Case Shirur
🗓️ तारीख : १० जुलै २०२५ | ठिकाण : शिरूर, पुणे
📰 सत्यशोधक न्यूज विशेष
Harassment Of Old Parents By Son Case : शिरूर तालुक्यातील हत्तात्राय खेडकर यांनी कौटुंबिक वाद, आर्थिक फसवणूक व मानसिक त्रासाविरोधात मुलगा महादेव खेडकर विरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मुलाने त्यांना एकटे सोडल्याचा आणि धमक्या दिल्याचा गंभीर आरोप.
(वयाच्या ८२ व्या वर्षी न्यायासाठी लढण्याची जिद्द ; तिही स्वतःच्या सख्या मुलासोबत : दत्तु उर्फ दत्तात्रय खेडकर)
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रहिवासी दत्तु उर्फ हत्तात्राय नामदेव खेडकर (वय ८२ वर्षे) यांनी आपल्या मुलाने मानसिक आणि आर्थिक त्रास दिल्याच्या तक्रारीसह शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खडतर प्रसंग आणि त्रासदायक अनुभव सांगितले आहेत.
🧾 फिर्यादीतील तपशील —-
फिर्यादीत दत्तु उर्फ दत्तात्रय खेडकर यांनी नमूद केल्याप्रमाणे, त्यांना पत्नी गंगुबाई. खेडकर ,एक मुलगा व तीन मुली आहेत. मुलगा महादेव दत्तु खेडकर याने त्याचा गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक व आर्थिक छळ केला आहे. २०१४ पासून मुलगा महादेव हा त्यांना सोडून शिक्रापुर येथे त्याची पत्नी आणि मुले यांना घेउन रहात आहे. त्यानंतर त्याने वयोवृद्ध आई वडिलांना उपजिवीका करण्यासाठी वारंवार विनंती करूनही मदत केली नाही.उलट त्यांनाच धमकावले.त्यांचे उपजिवीकेचे साधन देखील संपुष्टात आले. वयोवृद्ध झाल्याने आई वडिलांना काम करता येईना आणि मुलगा मदत करण्याऐवजी दम देवून अंगावर धावुन येवु लागला.
” दरम्यान खेडकर वयोवृद्ध आई वडिलांची त्यांना फसवुन जमिन मुलगा महादेव दत्तु उर्फ दत्तात्रय खेडकर याने विकली,ही तक्रार दाखल करण्याबाबत हा व्यवहार शिक्रापुर पोलिस हद्दीत झाला असल्याने त्याबाबतची फिर्याद शिक्रापुर पोलिस ठाण्यात नोंदवणे आवश्यक आहे, असे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी स्पष्ट केले आहे. दत्तु उर्फ दत्तात्रय खेडकर यांनी त्याबाबत शिक्रापुर येथे फिर्याद करणार असल्याचे ‘सत्यशोधक न्युज’ ला सांगितले आहे.’मात्र न्याय मिळेपर्यंत आपण लढणार असल्याचे पुढे ते म्हणाले. “
शेवटी हतबल होवुन वयोवृद्ध आई वडिलांना कधी मुलीकडे तर कधी इतर नातलग व ओळखीच्या लोकांकडे रहावे लागत आहे. घरी जिवितास धोका होण्याची भीती वाटत आहे.
🔍 कायदेशीर बाबी —-
माता पिता व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण याबाबत अधिनियम २००७, कलम २४,३५१(२) नुसार मुलगा महादेव दत्तु उर्फ दत्तात्रय खेडकर याच्यावर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेला हा बहुदा पहिलाच गुन्हा असावा.आता मुलगा आपले काय कर्तव्य करतो व शिरूर पोलीस मुलाला कधी ताब्यात घेतात?याकडे शिरुर तालुक्यातील लोकांचे लक्ष लागुन राहिले आहे.
📌 सध्याची परिस्थिती —-
हत्तात्राय खेडकर यांनी ही तक्रार दाखल करताना आपली मानसिकता/शारिरीक स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी न्यायाची मागणी केली असून, पोलिसांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
माता पिता व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण याबाबत अधिनियम २००७ काय आहे?—
“माता-पिता आणि जेष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, 2007” (The Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007) हा भारत सरकारने जेष्ठ नागरिकांच्या हितासाठी लागू केलेला एक महत्त्वपूर्ण कायदा आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे जेष्ठ नागरिकांना त्यांचा मुलांकडून किंवा कुटुंबीयांकडून आधार, काळजी व आर्थिक मदत मिळवून देणे.
काय आहे
🔷 या कायद्याचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे:
1. उद्देश:
👉 वृद्ध माता-पित्यांचा आणि 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण सुनिश्चित करणे.
👉 त्यांना त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाइकांकडून आर्थिक व वैयक्तिक मदत मिळावी यासाठी कायदेशीर अधिकार देणे.
2. निर्वाहासाठी दावा (Maintenance Claim):
👉 वडीलधारी माता-पिता किंवा जेष्ठ नागरिक त्यांच्या मुला/मुलीकडून निर्वाहासाठी महिन्याला निर्वाह भत्ता मागू शकतात.
👉 १०,००० रुपये पर्यंत निर्वाह भत्ता न्यायालयाने ठरवू शकतो.
👉 जर कोणी मुलगा किंवा मुलगी आपल्या वृद्ध आईवडिलांकडे दुर्लक्ष करत असेल, तर आईवडील कायदेशीररित्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे किंवा ट्रायब्युनलकडे तक्रार दाखल करू शकतात.
3. न्यायिक यंत्रणा:
👉 प्रत्येक जिल्ह्यामध्ये ‘जेष्ठ नागरिक ट्रायब्युनल’ स्थापन केले जाते.
👉 हा ट्रायब्युनल हा प्रकरण लवकर निकाली काढतो (३ महिन्यांच्या आत).
👉 या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील करता येते.
4. गृहांची परतफेड (Property Reclamation):
👉 जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलाला/नातेवाईकाला संपत्ती दिली आणि त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, तर
👉 त्या संपत्तीचे हक्क परत मिळवण्यासाठी कायदेशीर कारवाई करता येते.
5. शासकीय जबाबदाऱ्या:
👉 राज्य सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी वसतीगृहे (Old Age Homes) चालवावी लागतात.
👉 मोफत वैद्यकीय सेवा, सुरक्षा, आणि मानसिक आरोग्य सेवाही उपलब्ध करून द्यावी लागते.
6. शिक्षा व दंड:
👉 या कायद्याच्या उल्लंघनास ३ महिन्यांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
👉 गैरवर्तन किंवा दुर्लक्ष यास कठोर शिक्षा होऊ शकते.
✅ या कायद्यातून मिळणारे अधिकार:
अधिकार तपशील
• आर्थिक मदत मुलांकडून मासिक निर्वाह भत्ता
• निवारा सरकारी वृद्धाश्रमात प्रवेशाचा हक्क
• कायदेशीर कारवाई मुलांकडून दुर्लक्ष झाल्यास ट्रायब्युनलकडे दाद
• संपत्ती हक्क दुरुपयोग झाल्यास हस्तांतरण परत घेता येणे
📌 लक्षात ठेवा:
👉 या कायद्यात पालकत्व घेणाऱ्या मुलांचाही समावेश आहे (जसे दत्तक घेतलेले मुले).
👉 तक्रार स्वतः वृद्ध नागरिक किंवा त्यांच्यातर्फे कोणीही नातेवाईक दाखल करू शकतो.
👉 या कायद्याचा उद्देश म्हणजे वृद्धांची मानसिक, सामाजिक व आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे.
📚 उपयुक्त माहिती पहा खालील लिंकवर क्लिक करून ••••
1. भारत सरकारची अधिकृत माहिती (indiacode)
2. Legal Services India – Article on Senior Citizens Act
3. Ministry of Social Justice and Empowerment
📌 निष्कर्ष:
जगण्याच्या शेवटच्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या मुलांकडूनच जर आधार मिळत नसेल, तर हा कायदा त्यांच्या मदतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. प्रत्येक जेष्ठ नागरिकाने किंवा त्यांच्या नातेवाइकांनी या कायद्याची माहिती ठेवणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🔗
https://mhpolice.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
https://nhrc.nic.in – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
https://ncw.nic.in – राष्ट्रीय महिला आयोग
👉 आपणास अशाच अधिकृत बातम्या हव्या असतील तर वाचा – satyashodhak.blog
Boost your income—enroll in our affiliate program today! https://shorturl.fm/B8oBf