

Contents
गेट टुगेदर : खरचं अविस्मरणीय अनुभव !
गेट टुगेदर च्या वेळी जवाहर विद्यालयाच्या 1994 -1995 ची बॅच बुडली जुन्या आठवणींमधे !
चास,दि.3 जुन : (श्री.विठ्ठल परदेशी यांजकडुन)
गेट टुगेदर म्हणजे एकत्र येणे.तसे आपण सहजा आपल्या जवळच्या मित्रपरिवाराबरोबर एकत्र येतच असतो.पण काही लोकाच्या बाबतीत जवळचे मित्र मैत्रिणींचा समुह एकच नसतो.तर एकापेक्षा जास्त असतो.कारणे अनेक असु शकतात.काही सरकारी नोकरदारांची मुले त्यांच्या वडिलांच्या बदल्यांमुळे वेगवेगळय़ा ठिकाणी राहतात.प्रत्येक ठिकाणी त्यांचा मित्र मैत्रिणींचा समुह तयार होतो.पण तिथुन बदली झाली की हे मित्रमैत्रिणी कायमच्या दुरावत असत.काही वर्षापूर्वी पर्यंत मोबाईल फोन,व्हिडीओ call वगैरे गोष्टी अस्तित्वात नव्हत्या.
चास कमाणचा गेट टुगेदर….
गेट टुगेदर चा हा कार्यक्रम चास कमाणची येथील जवाहर विद्यालयाच्या 1994 -1995 च्या batch ने आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.हे ठिकाण खेड/राजगुरूनगर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचं ठिकाण आहे.
मुले लहान असत .ती स्वत: एस टी ने प्रवास करत त्या ठिकाणी जावू शकत नसत.मित्रही लहान असत.मग त्या आठवणीआनंद आणि दु:खही देत असत.आजही देतात. अशा दोन तीन पिठ्या स्वातंत्र्यानंतर या अनुभवाला उपलब्ध झाल्या होत्या. मी (संपादक) आठ जिल्ह्यांत राहिलो आहे.आणि आठवणींचा जणु महापुरच मनात येत असतो.अधुन मधुन !

गेट टुगेदर च्या वेळी जवाहर विद्यालय,चास कमाणची 1994 -1995 ची बॅच बुडाली जुन्या आठवणींमधे !
गेट टुगेदर कुणाचा?
गेट टुगेदर हा अशा मित्रमैत्रिणींना एकत्र आणून पुन्हा शालेय किंवा कालेजच्या जिवनाचा अनुभवांना उजाळा देणारा असा एक समारंभ निश्चितच आहे.विशेषत: दहावी बारावीच्या निकालांनंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी किंवा काही वेळेला कामासाठी,रोजगारासाठी आपले गाव किंवा शहर सोडतात.काही वेळा काहीजण परदेशात देखील जातात. मग सगळंच जिवनच बदलून जाते.नवीन लोक जीवनात येतात.त्यांमधे मन गुंतुन जाते.जुन्या मित्र मैत्रिणींचा विसर पडून जातो.पण पुर्ण विसरणे हा मनाचा स्वभाव नाही.कोनती ही स्मृती मन कधी विसरत नाही.स्मृती अस्पष्ट होवू शकते पण नष्ट होवु शकत नाही. आणि जर नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आणखीन जास्त घट्ट होते.

गेट टुगेदर च्या वेळीजवाहर विद्यालय,चास कमाणची 1994 -1995 ची बॅच बुडाली जुन्या आठवणींमधे !श्री.विठ्ठल परदेशी.
असाच एक गेट टुगेदर जव्हार विद्यालय,चास, तालुका- खेडे, जिल्हा -पुणे येथे १९९४-१९९५ च्या batch चा गेट-टुगेदर
आयोजन करण्यात आला होता.हा कार्यक्रम दिनांक २/६/२०२४ रोजी, निसर्गरम्य इंद्रायणी पाझर तलाव, खेडचा घाट येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी १९९४-९५ च्या batch चे सर्व मित्र मैत्रिणी तीस वर्षांनंतर पुन्हा एकमेकांना भेटले.अंगावर शहारे आणणारा हा अनुभव होता.मित्र मैत्रिणींना अक्ष्रु अनावर झाले.
उखाण्यांचा कार्यक्रम. ….
गेट टुगेदर च्या वेळी माजी विद्यार्थीनींनीच्या उखाणे घेण्याच्या कार्यक्रम झाला आणि रंगत आणली.माजी विद्यार्थिनी कल्याणी दौंडकर यानी,’गणेशाला दुर्वा,महेश आल बेल,सुनिलरावांनी फुलवले माझ्या आयुष्याचे वेल,’ तर ,’हाताच्या कंकणाला आरसा कशाला,श्रिकांतरावांचे नाव घ्यायला मी लाजु कशाला’,असे किशोरी शिंदे यांनी आपल्या ,’नवर्याचे नाव’ घेतले.त्याचबरोबर रोशन रणपिसे,रंजना खडगे ,कविणा नाइकरे,शशिकला शेटे,निर्मला खटावकर,किशोरी शिंदे, मैना मुळक,अनुजा चितळे,वैशाली कर्हे,सुनिता दौंडकर,वंदना राक्षे या माजी विद्यार्थिनींनी एक से बढकर एक उखाणे सादर केले.
यावेळी शाळेतील बालपणाचं रूपडं आणि आता चाळीसीतील रुप,बोलणं,वागणं लाजणं,हसणं यात काही फारसा फरक पडलेला नाही,असे जाणवले.पण आयुष्याच्या प्रवासातील उन्हाळे पावसाळे सर्वांनी अनुभवले असल्याचा प्रत्यय यावेळेस आला.आपली ,’आतली’सारी दु:खे विसरुन या माजी विद्यार्थी विद्यार्थिनीच्या चेहर्रावर इतक्या वर्षांनंतर भेटल्यावर आनंद ओसंडुन वाहताना दिसला.
आयुष्याच्या या वळणावर….
आयुष्याच्या या एका वळणावर असा अंगावर व मनावर रोमांच उभा करणारा अनुभव सर्वच माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या जिवनात आणखीन एक ह्रदयाच्या कोपर्यात जपुन ठेवावा असा ठेवा ठरला.याची आताच्या या परिपक्व वयात याची जाणीव माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या चेहर्यावर उमटत होती.अतिशय भावनिक आणि आनंद दु:खाच्या विविध छटा विद्यार्थी अर्थात पुरुष मंडळीच्या चेहर्यावर उमटत होत्या.
गेट टुगेदर ला यावेळी मा. विठ्ठल परदेशी,आश्रीम आदमी पार्टी पुणे ( सचिव ) यांचे भाषण झाले.यावेळी प्रमोद मुळक,शिंदे गुरुजी,विलास राक्षे,संतोष तनपुरे,संतोष ढमढेरे,विनोद भंडारे,माजी सरपंच,रंगनाथ चव्हाण,माजी सरपंच प्रवीण नाइकरे,संतोष वाडेकर यांसह अनेक मित्रांची भाषणे झाली.
जुन्या आठवणींमधे रमले क्लासमेट….
अनेक जुन्या शाळेतील जीवनातील आठवणी यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांगितल्या.गावातील त्यावेळचे सरपंच रंगनाथ चव्हाण व माजी सरपंच प्रवीण नाइकरे यांची उपस्थित सुद्धा आनंद द्विगुणीत करणारी होती.ती जुनी शाळेची इमारत,आंगण,झाडे आता बदललेली होती.बराच विकास मधील काळात झाला.संख्यात्मक व गुणात्मक असा दोन्ही प्रकार चा आजचा माहौल वेगळा होता.
सर्वांचे धन्यवाद मानण्यात आले. प्रमोद मुळक अनिश खान,
शिंदे गुरुजी,इ. विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे आभार मानले.