माझं पहिलं प्रपोज ! ही एक आठवण आहे.तसं प्रत्येकाचे पहिले प्रपोज 'खासच'असतं.असायलाच पाहीजे.कारण काही अनुभव हे जिवन जगताना फक्त एकदाच येतात. माझं पहिलं प्रपोज ! हा सत्य अनुभव आहे. आणि पहिले म्हटले तर त्याचा अर्थ एकदाच !
First Propose : एक वैयक्तिक, भावनिक आणि प्रामाणिक अनुभव – ‘माझं पहिलं प्रपोज’. एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा त्याच्या विद्यार्थीदशेतला प्रेमाचा प्रयत्न, त्यामागची मानसिकता, सामाजिक मर्यादा आणि अंतर्मनाचा संघर्ष. आडगाव, नाशिकच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही कथा म्हणजे प्रेमाच्या अनोख्या वाटचालीचा अनुभव. ही कहाणी वाचकाला एकदा तरी आपल्या कॉलेजच्या आठवणीत नेऊन सोडते.”
माझं पहिलं प्रपोज !
First Propose : कसे करावे प्रपोज?
माझं पहिलं प्रपोज ! हे घडलं त्या वेळी मी त्यावेळी 21/22 वर्षांचा होतो . मी मेडिकल कालेजला असायचो. नाशिकला ! आडगाव, नाशिक. हा एक मोठा campus होता. पण त्याचे बांधकाम नुकतेच सुरु झाले होते.जास्त आवश्यक इमारती तयार होत्या. जसे डिसेक्शन hall ,लेक्चर्स हाल,एक केन्टीन,एक होस्टेल, lab ,cvs साठी चे इन्स्रुमेंटस इ. मी काही पेमेंट सिटमधला विद्यार्थी नव्हतो. मेरीट मधला विद्यार्थी होतो. त्यामुळे होस्टेलला प्रवेश घेण्याची काही शक्यता नव्हती. साहजिकच कम्पसला लागुन असलेल्या आडगाव या डिकाणी भाड्याने खोली घेऊन रहात होतो . तिथल्या राजवाड्यात रहात होतो . ‘राजवाडा’ म्हणजे ‘आगाखान पलेस’ सारखा नव्हे . तिथे ‘दलित वस्ती’ला ‘राजवाडा’ म्हणतात. कारण तिथे भाडे आणखीन कमी होते म्हणून राहिलो !
मेडिकल कॉलेजला. ….
तिथुन मी कालेजला जायचो ! काही काळानंतर मी एक सेकंड हन्ड सायकल घेतली होती . हप्याने पैसे देणार होतो. पण पुढे त्याने पैसे मागितले नाहीत. मीही दिले नाहीत. आडगाव हे गावच होतं . पण मेडिकल कॉलेजमुळे आज ते जगभर ‘सर्च’ केलं जातं . मी गावच्या तरुणांमधे सहज मिसळुन गेलो ते क्रिकेटमुळे . मी अगदी मचविनर असायचो .मी लागोपाठ तीन ओव्हर 24 च्या रनरेटने पिसल्या होत्या.पहिल्याच ball ला प्रतिस्पर्धी टिमच्या प्रमुख baller ला फोडुन काढायचा माझा बेत कायम असायचा.एकदम किलर इंन्टिंक्ट ! असे आजपर्यंत अनेक ballers चा मी कचला केला आहे.मी एक विशिष्ट प्रकारची फिरकी balling करारचे.मध्यम रनप घ्यायचो.आणि मुख्य म्हणजे हातापेक्षा डोक्याने जास्त खेळायचो.म्हणजे समोरच्या batsmam ला कुठे ball टाकल्यावर खेळता येत नाही. हे हेरायचो.आणि तसा ball टाकायचो.त्या लेवलला माझ्यासह कोणीच काही प्रशिक्षित खेळाडु नसायचे.मला कोणी ,’आचरेकर’ भेटले नाहीत! आणि या ‘खास’फिरकीने एका ओव्हरला 5 विकेट घेण्याची कामगिरी मी दोनदा केली आहे.हवे तर कोल्हापुर जिल्ह्यातील दत्तवाड आणि सातारा जिल्ह्यातील कलेढोणला जावून विचारा ! एकंदरच त्यामुळे मित्र खुश असत. माझ्यावर जिवापाड प्रेम करणारे मित्र मला तिथेच मिळाले . नंतर मी एकूण आठ जिल्ह्यांमधे फिरलो. राहिले. पण ‘आडगाव’च्या मित्रांसारखे मित्र आजतगायत कुठे भेटले नाहीत .विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजला एकही ज्याला मित्र म्हणावे असा कोणी भेटला नाही.काही परराज्यातुन तर काही परदेशातुन आलेले विद्यार्थी माझ्या batch ला होते.एक अमेरिकन व एक दुबयीचा होता.हे विद्यार्थी नेमके कोनत्या जगात वावरत होते मला समजत नसे.पण जग एकीकडे आणि हे एकीकडे ! मेडिकलच्या विद्यार्थीच्या मानसिकतेवर बरेच संशोधन होवू शकते.पहा एखादा मेडिकलचा विद्यार्थी फेल झाला आणि त्याने आत्महत्या केली.अशा बातम्या आपण वाचल्या असतील.अगदी शिरुरच्या माझ्या एका classmate बी.जे.मेडिकल काॅलेजला आत्महत्या केली. वेताळ असे त्याचे आडनाव होते.
आडगाव ,नाशिक …..
राजवाड्याजवळच एक सार्वजनीक hall होता. लहान होता. पण होता. तसा आडगाव नाशिक महानगरपालिकेचा एक वार्ड होता. नगरसेवक जे.टी.शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाचे होते. शिवसेना दुसर्या क्रमांकावर होती . बाळासाहेब ठाकरे त्यावेळी बहरात होते. राजकीयदृष्टया ! त्या hall मधे मी संध्याकाळच्या सुमारास पाहिले. तिथे एक तरुण मुलगी प्रौढ शिक्षण वर्ग अर्थात प्रौठांसाठी शिक्षण वर्ग घेत होती. मी त्याच hall मधे अभ्यास करत असे. तिथेच एखादे पुस्तक बिनधास्त एनीटाईम ठेवत असे.ठाम होतो की चोरुन नेले तर परत आणून ठेवील.कारण त्यातलं इंग्रजी बापजन्मी सर्वसामान्यांना समजणार नाही अशी माझी खात्री होती.
ते फक्त अनुभवण्याची चीज !
तर मी तिला पाहिले. तिने माझ्याकडे पाहिले. थोडी दचकली . बहुदा मी त्या गावचा नाही. हे तिला समजले असावे. पण मला ती आवडली. लव्ह एट फर्स्ट साईट असावं. प्रेमाची स्पष्ट एका वाक्यात व्याख्या मी आजपावेतो करु शकलेलो नाही . त्याला व्यक्त करण्यासाठी ना कोनता शब्द आहे , ना कोनते वाक्य आहे. हा माझा आजचा निष्कर्ष आहे. ते फक्त अनुभवण्याची ‘चीज’ आहे.
माझं पहिलं प्रपोज ! हे लिहिताना काही तथ्य लिहावी लागतील. प्रेम फक्त आयुष्यात एकदाच होते. तेच खरेखुरे असते. वगैरे मतांशी मी सहमत नाही. प्रेम एका आयुष्यात अनेकदा होते . हे खरे आहे. ते अपरिवर्तनीयही नाही. परिवर्तनशीलही आहे. म्हणजे एकावरील प्रेम आटुन ते दुसर्यावर होवू शकते. तरी पण तेही दीर्घकाळ टिकणारी अवस्था आहे , असेही मला दिसले नाही.आणि याला जगात अद्याप कोणी अपवाद झाला असेल असे मला वाटत नाही.यावरील कथा,कविता,कादंबर्या,महाकाव्ये काल्पनिक आहेत.
चक्क ‘मास्टर माईंड’….
तर माझे माईंड सी आय डी सारखे चालते असे आजही माझ्या बरोबर वावरणारे सहकारी म्हणतात. मी शोधून काढतोच ! काठले . तीचे नाव मंजु होते. म्हणजे मंजुशा किंवा मंजुश्री असेल onpaper. पदवीच्या तिसर्या वर्षांला होती. तिचं आडनाव सांगत नाही. पण लक्षात आहे.चेहरा सुंदर, उभा, रंग गोरा आणि सडपातळ ! अगदी स्वप्नातली सुंदरी आणि प्रेमिका होती. जीव तळमळायला लागला. मग तिचा प्रौढ साक्षरता वर्ग सुरु होण्याच्या आणि संपण्याच्या वेळेला मुद्द्दाम तिथे थाबत असे. तिला पहात असे.ती अगदी खुप समजावून समजावून प्रौढांना बाराखडी, अंक गणित वगैरे शिकवत असे. मी बाजुलाच थोड्या अंतरावर थांबत असे.तिचे बोलणे ऐकत असे.
कसे करावे प्रपोज?
आवडली. आता प्रपोज करायची स्टेप होती. कसे करावे? ती स्थानिक म्हणजे लोकल. मी अडीचसे किलोमीटर लांबचा शिरुरचा ! तिथे शिकायला आलेलो ! काही तक्रार झाली तर स्थानिक खुप मारतील , अशी भिती वाटायची ! मेडिकल स्टुडंट होतो. खुप रिस्पेक्ट मिळे. पण म्हणून काय डायरेक्ट आमच्या इज्जतीला हा हात घालणार का ? असा विचार तिचे घरचे करतील असे वाटायचं. ‘कार्ड’ मला त्यावयात व त्याकाळीसुद्धा चांगले समजत होते. कारण वडिलांनी देशातील व्यवस्था मला बर्याच लहान म्हणजे आमचे कुटुंब कोयनेला होते , त्यावेळी घरात बोलता बोलता सांगितली होती. माझा आय क्यु चांगला आहे. मला त्याचा अंदाज यायचा.
इथं ‘कार्ड’ चालतं…..
तर कार्ड म्हणजे इथं मी जातीचे कार्ड सांगत आहे , आधार कार्ड किंवा रेशन कार्ड नाही. तर तिचे कार्ड चालणारं कार्ड होतं . माझं कार्ड नेमकं उलटं होतं . न चालणारं. आजही ते आडवं येत असतं. मी शुद्ध आधुनिक विचारांचा आहे . विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्याशिवाय कोनतीच गोष्ट मी खरी मानत नाही . देव आहे की नाही हे मला अजुन नक्की करता आलेले नाही !
तर एक दिवस मी दुपारी त्या hall मधे डोकावले. तिथे मंजु त्या टेबलाजवळच्या खुर्चीवर बसलेली होती.आणि तिथं माझं नेमकं Anatomy च पुस्तक ठेवलेलं होतं. चक्क ती त्यातील पाने एकामागे एक उलटत होती.पहात होती. एव्हाना तिला माहित झाले होते की मी तिथल्या मेडिकल कॉलेजला लांबून शिकायला आलो आहे. पण माझं पुस्तक एवढ्या अधिकाराने तिने ड्रावरमधुन घेउन , खोलून एक एक पान उलटत आहे , हे पाहून मी सुखावलो . एक वेगळाच शहारुन टाकणारा अनुभव आला. मला पाहील्यावर काहिसे कौतुकाने माझ्याकडे पाहून ती ते पुस्तक परत ड्रावरमधे ठेवून बाहेर निघाली. मी आत जातच होतो. एकदम नजरेला नजर भिडली. त्याकाळी लाजायची पद्धत होती बरं का. आज सगळे ‘निर्लज्ज’ झालेले दिसतात ! म्हणजे खुपच स्वातंत्र्य आज मिळाले आहे. पटकन मान खाली घालुन ती निघुन गेली. मी रोमांचक अनुभव घेत होतो. पण आता तिच्याशी कसे आणि काय बोलायचे. आता ती रोजच थोडावेळ आधी येवून मी ठेवलेली पुस्तकं हाताळत बसायची . मला आनंद व्हायचा !
मग एक ‘आयडिया’. ….
मग एक आयडिया करायचं डरवलं. त्या पुस्तकात एक कोरं पान ठेवलं. चिठ्ठी लिहिणे फार महागात पडु शकेल. असा माझा ठाम विश्वास होता.गनिमी कावा उपजत माझ्यामधे असावा. मग कोड शब्द वापरायचे ठरवले. मला अंदाज होता की ते तिला समजतील ! मग त्या कागदावर लिहीले. For M म्हणजे ‘मंजु’साठी ! पुढे Yes/No अर्थात ‘होय किंवा नाही’ एवढेच लिहीले.यात धोका नाही.हे तिला समजणारचं याची मला खात्री होती. ते पान पुस्तकात ठेवले. प्रेम मान्य असेल तर तिने No वर काट मारावी आणि नसेल तर तिने Yes वर काट मारायची ! हे तिला समजेल याची मला खात्री होती . दुसर्या दिवशी बेचैन अवस्थेत ते पुस्तक घाईघाईने उघडले. तर Yes वर काट ! म्हणजे नाही . मी हादरलो. दु:खी झालो . नकार ! ब्रोक झालो. मग अगतिक झालो. पुन्हा तोच मेसेज ठेवला. तेच उत्तर ! शेवटी चिडलो. लिहीले , For M,I love you ! Yes/No ! तर रिप्लाय तोच ! मग भावनिक झालो. शेवटी परत मेसेज I love you, I love you,I love you ,बार बार जिंदगीभर ! मग रिप्लाय पाहीला.
मी हताश…..
काहीच नाही.ती यायचीही बंद झाली. मी हताश झालो !
तिथे शेजारीच माझा तेथील मित्र बाळु धोंडगे रहात असे. एक दिवस म्हणाला,” हुं डॉक्टर ! ते इथं नाही जमायचं बरं का ! पण इथलीच राजवाड्यातील मुलगी पहा. मी बोलतो वाटल्यास .आहेत इथल्या राजवाड्यात आहेत दोन तीन सुंदर मुली ! जमवून देतो. गावचे जावयी व्हा , कायमचे इथं रहा. आम्ही तुम्हाला काही सोडणार नाही !’
मला समजले. बाळु थोडा सिनीयर होता. बी.एस्सी. होता .त्याला माझ्या स्वभावाचा अंदाज होता.कारण रात्री आम्ही आडगावच्या मंदिरात वरील एका मजल्यावर झोपायचो. मी काय करील हे त्याला कळायला अवघड नव्हते .
त्यानेच त्या पुस्तकातील माझ्या मेसेजेसला उत्तरे दिली होती.राग आला नाही.
पण मंजुचं काय ? ते माझे मेसेज तिला मिळाले असतील का ? ती यायची का बंद झाली ? यांची उत्तरं शोधण्याचा मी कधीच विचार केला नाही.फक्त तिच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर ती एकदा तरी दिसेल या आशेने पहायचो.
आज मी माझ्या जिल्ह्यात आहे . पुणे. ती तशी क्वचितच आठवते . पण प्रपोज करण्याच्या हा प्रकार मला आजही लाजवतो. पण आज ती कुठे असेल. वयात फार अंतर नव्हते. चाळीसी ओलांडली असेल ! भेटलीच तर ओळखणारही नाही आता मी तिला .त्यानंतर पुष्कळ वर्षे मी परत आडगावला गेलेलो नाही. सोडले ते सोडलेच !
—
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••••
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com