Editorial By Nitin Pawar: दलित महिलेची दोन मुलांसह निर्घृण खुन: फडणवीस सरकार संवेदनशून्य?
Editorial By Nitin Pawar : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे एक दलित महिला व तिच्या दोन निष्पाप मुलांचा निर्घृण खून झाला आहे. हे प्रकरण केवळ गुन्हेगारीचं असणं शक्य नाही.याला काही जातीय हिंसेचं भयंकर रूप आहे का? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो? कारण मृत महिलेच्या हातावर ,' जयभीम' असे गोंदलेले आहे. नवरा म्हणावा तर तर तो 'काही' कारणांमुळे बायकोला मारु शकतो ! पण स्वत:च्या मुलांना इतक्या निर्घृणपणे मारुन टाकतो. अशी शक्यता पचनी पडत नाही.
रांजणगाव (शिरूर) येथील ग्रोवेल कंपनीजवळील निर्जन ठिकाणी एक स्त्री व दोन मुलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. Breaking News Ranjangaon Lady Murder : संदिप सिंह गिल SDPO पाहणी करताना घटनास्थळी.
Editorial By Nitin Pawar: दलित महिलेची दोन मुलांसह निर्घृण खुन: फडणवीस सरकार संवेदनशून्य?
संपादक डॉ.नितीन पवार, शिरुर /पुणे.
संपादकीय. …
Editorial By Nitin Pawar: पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे एक दलित महिला व तिच्या दोन निष्पाप मुलांचा निर्घृण खून झाला आहे. हे प्रकरण केवळ गुन्हेगारीचं असणं शक्य नाही.याला काही जातीय हिंसेचं भयंकर रूप आहे का? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो? कारण मृत महिलेच्या हातावर ,’ जयभीम’ असे गोंदलेले आहे. नवरा म्हणावा तर तर तो ‘काही’ कारणांमुळे बायकोला मारु शकतो ! पण स्वत:च्या मुलांना इतक्या निर्घृणपणे मारुन टाकतो. अशी शक्यता पचनी पडत नाही.
Editorial By Nitin Pawar मधे घटना दुर्दैवी ,दु:खदायक व अंगावर शहारे आणणारी—
या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होते.वैष्णवी हगवणे प्रकरण पुणे येथे घडले आणि पुण्यापासुन 50 किलोमीटर वर दलित महिलेची दोन मुलांसह निर्घृण हत्या होते.पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न प्रथमदर्शी खुन्याने केले असल्याचे दिसते.खून दुसऱ्या ठिकाणी करुन रांजणगाव गणपती एमआयडीसी परिसरात झाडीत त्याची विलेव्हाट लावण्याचा प्रयत्न देखील असु शकतो. खुनी एकापेक्षा जास्त संख्येने असू शकतात.पण घटना दुर्दैवी ,दु:खदायक व अंगावर शहारे आणणारी आहे.
Editorial By Nitin Pawar नुसार दलित अत्याचाराच्या घटना नवीन नाहीत—-
ज्यां दलित जातींना संरक्षण मिळायला हवं होतं,तेथे त्यांच्यावरच समाजाने कुरघोडी केल्याच्या दलित अत्याचाराच्या घटना नवीन नाहीत . एका दलित महिलेचा आणि तिच्या दोन बालकांचा हा अमानुष, निर्दयी खून झाला. अख्ख्या व्यवस्थेचा चेहरा पुन्हा एकदा उघड पडला आहे . ही एक साधी खुनाची घटना नव्हे — हा एक समाजशास्त्रीय कलंक आहे.ती दलित आहे हे मारेकर्यांना माहिती असणारच !
ही दलित महिला कोण होती?—
याची अद्यापही महिलेची ओळख स्पष्ट झालेली नाही. परंतु तिच्या हातावर गोंदवलेले शब्द “जय भीम”, “Mom-Dad”, “राजरत्न” हे स्पष्ट दर्शवतात की ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी जोडलेली होती. तिच्या अंगावर दिसणाऱ्या गोंदवलेल्या ओळखी व त्या दोन निष्पाप मुलांचे जळालेले, अत्याचारग्रस्त मृतदेह,हे सगळं कोणालाही अस्वस्थ करून टाकणारं आहे.
या खुनामागे नक्की कोणाचा हात आहे? हे कळायला मार्ग नाही. पोलीस तपास अद्यापही सुरू आहे. फिंगरप्रिंट, डॉग स्कॉड, फॉरेन्सिक यंत्रणा यांचा वापर करून पुरावे गोळा केले जात आहेत. पण खुन्यांचा कुठलाही ठोस माग काढलेला नाही.इलेक्ट्रानिक माध्यमे काय झोपलेली आहेत का?एरवी ओरडुन ओरडुन,पळुपळुन आक्रस्ताळेपणा करणारे टिव्ही वाले एंकर इथं का गप्प ? चेनलच्या गाड्या घटनास्थळाकडे अजुन का वळल्या नाहीत? की यात काही ‘मिळणार?’नाही म्हणुन पाठ फिरवतात का?
हे अपयश आहे — व्यवस्थेचं, पोलिसांचं आणि राजकीय इच्छाशक्तीचं!
तपास तंत्रज्ञान आधुनिक झाले आहे. अगदी सटेलाईट वापरता येतात,ड्रोन वापरता येतात.तरी या प्रकरणात गती धिमी का झाली आहे? जी ‘मोठ्यांच्या’ बाबतीत ‘जलद’ होत असते !
मुलांचं काय चुकलं होतं? दलित महिला खून प्रकरणात तिघांपैकी दोन मृतदेह हे लहान मुलांचे आहेत. एक अंदाजे 3 वर्षांचा आहे.तर दुसरा 1-2 वर्षांचा. त्यांचं निष्पाप, चिऊमाऊसारखं जीवन कोणी काढून घेतलं ? हे फक्त गुन्हा नाही, तर माणुसकीविरहित क्रौर्याचं अपवित्र प्रतीक बनले आहे .
Editorial By Nitin Pawar: सरकार गप्प का?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री यांनी या घटनेवर अद्याप एक शब्दही काढलेला नाही.की त्यांना अजुन इनपुट मिळालेले नाही? जे इतर वेळी तत्काळ मिळते.जर ही घटना एखाद्या उच्चवर्गीय ,उच्चजातीय घरात घडली असती, तर सगळी यंत्रणा हलली असती.
दलित महिला आणि तिच्या मुलांचा खून सत्ताधाऱ्यांच्या रडारवरसुद्धा अजुन आलेली नाही, हीच सर्वात भयंकर गोष्ट आहे.फडणवीस सरकार काय झोपा काढत आहे का?माध्यमांची निष्क्रियता पक्षपाती संवेदना नेहमीचीच आहे.याच घटनेची चित्रं तुम्हाला व्हायरल व्हाट्सअॅप फॉरवर्डमध्ये दिसतील, पण राष्ट्रीय टिव्ही चॅनेल्स किंवा लोकप्रिय पोर्टल्सवर दिसणार नाहीत.
स्थानिक पत्रकार, न्युज साईटस् वाले सरस—
बिचारे स्थानिक पत्रकार, न्युज साईटस् वाले धडपड करतात.पण त्यांचा आवाज पोचणार तर कुठपर्यंत ? नसेल. कारण ती महिला ‘ब्राम्हणकन्या’ नाही ,बनियाकन्या नाही,आमदार खासदारांची जातवाली किंवा नातलगांची नाही. ती ‘ग्लॅमरस सेलिब्रिटी’ नाही. — ती एक दलित गरीब दोन मुलांची आई होती !
हा फक्त खून नाही ; तर हा जातीय नरसंहार तर नाही?
जर या घटनेमागे जरहजातीय हेतू असला, तर ही घटना भारतातल्या संविधानाच्या मूळ मूल्यांवर नक्कीच हल्ला आहे !’जय भीम’ म्हणणाऱ्या,लिहिणार्या,हातावर गोंदणार्या स्त्रीला संपवलं गेलं आहे. तीच ओळख तिच्या मृत्यूचं कारण तर ठरली नाही ना ?
सरकारला खुले आव्हान—-
• सरकारने SIT (विशेष तपास पथक) नेमावे.
• मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी DNA व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करावा.
• दलित समाजाला विश्वासात घेऊन स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी.
• संपूर्ण महाराष्ट्रात दलित महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस धोरण आखावे.
Editorial By Nitin Pawar ची मागणी—-
या घटनेवर त्वरित कारवाई झाली नाही, तर सत्य, न्याय व लोकशाही यांची थडगी रचली जात आहेत . असा त्याचा अर्थ होतो.वैष्णवी हगवणे प्रकरण, हुंडा काय आणि हे दलित महिला व तिच्या दोन मुलांची हत्या काय?फडणवीस सरकार व पुण्याचे पालकमंत्री यांनी भानावर यावं.फक्त राजकारणातले किळसवाणे खेळ खेळण्यात वेळ चालला आहे.तो सोडा.समाजाकडे,राज्यातील जनतेकडे पहा !
अधिक माहितीसाठी खालिल लिंक वर क्लिक करून माहिती मिळवा—-
” ही घटना विसरू नका.तीच तुमच्या भविष्याची सावली ठरू शकते. दलित महिलेची दोन मुलांसह निर्घृण खुन हा लाजिरवाणा क्षण आहे, जो संपूर्ण भारताला डोळे उघडायला भाग पाडतो.”
सत्यशोधक न्युज चे संपादक डॉ. नितीन पवार यांची इतर वाचण्यासारखी Editorial पुढील लिंक वर क्लिक करून वाचा—-
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com