Babasaheb Ambedkar : ‘मोक्याच्या आणि मार्याच्या’ जागा कोनत्या व का ? : भाग : 1
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलेल्या 'मोक्याच्या आणि मार्याच्या' जागा कोनत्या व का ? : भाग :1 ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बाबासाहेबांना शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न ; " मार्याच्या आणि मोक्याच्या जागा हस्तगत करा."असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्याचा काय अर्थ होवू शकतो , हे शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे - संपादक, डॉ.नितीन पवार,सत्यशोधक न्युज ,न्युज पोर्टल,शिरुर.
‘मोक्याच्या आणि मार्याच्या’ जागा कोनत्या व का ? : भाग : 1
Babasaheb Ambedkar Sandesh
डॉ.बाबासाहेब आंबेडकर : अनेक पैलू. ..
” Babasaheb Ambedkar : हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि वैचारिक धोरणांचा सखोल अभ्यास करत “मार्याच्या आणि मोक्याच्या जागा” या संकल्पनेवर केंद्रित आहे. डॉ. आंबेडकरांनी सुचवलेल्या मार्गदर्शनाचा समाज, विशेषतः ब्राम्हणेतर समाज कसा आणि कितपत वापरतो आहे याचे विश्लेषण या लेखात आहे. सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक व धोरणात्मक संस्थांमधील ब्राह्मण वर्चस्वाचा इतिहास, तसेच बाबासाहेबांच्या विचारांची सार्वत्रिकता यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. लेखाचा हा भाग – 1 असून पुढील भागात अधिक सखोल तपशील येणार आहेत.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अनंत पैलुंचे सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक आणि वैचारिक योद्धा होते. प्रश्नाच्या केवळ मुळाशीच ते जात नव्हते तर प्रश्नावर ‘जालिम ‘ असा उपायही करत असत. पण सर्व ‘विलाज’ करण्याइतके आयुष्य माणसाला नसते . पण मुलभूत प्रश्नांवर ‘विलाज’ बाबासाहेबानी केले. तर काही उपाय बाबासाहेब आंबेडकर हे अनुयायांना सुचवून गेले,सांगून गेले . अर्थात अनुयायी कोनीही असु शकतो. तो केवळ नवबौद्धच असावा ,असे काही जरुरी नाही. ब्राम्हणीही असु शकतो ! फक्त तो संदेश समजणे आणि घेणे आवश्यक असते.’डॉ.बाबासाहेब आंबेडकर’
सत्यशोधक न्युज
“लेख लिहीता लिहीता लिखाण विस्तारत असल्याने हा भाग – 1 केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वगळुन भारत समजणे केवळ अशक्य ! बाबासाहेबाचे लेखन वाचत वाचत माझी पिढी जगली , तग धरुन राहिली ! जगण्याचे आयाम विस्तारले ! समाज आणि देशाला वाचवतील फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ! आज एक से एक मोठे नेते आसरा करत आहेत तो बाबासाहेब आणि त्यांच्या संविधानाचा ! यातच सर्व काही आले !”
– संपादक.सत्यशोधक न्युज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलेल्या ‘मार्याच्या आणि मोक्याच्या जागा’—
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एक उपाय सुचवला होता.”मार्याच्या आणि मोक्याच्या जागा मिळवा”! असा तो होता . छ.शिवाजी महाराज यांनी आपल्या युद्धनितीत ‘मार्याच्य आणि मोक्याच्या’ जागांचा उपयोग करुन एक युद्धशास्त्राच्या तंत्रालाच निर्माण केले होते . ‘गनीमी कावा’ असं त्याला आपण पुढे म्हणू लागलो. जेव्हा आपली शक्ती शत्रुपेक्षा खुपच कमी असते तेव्हा कमितकमी उपलब्ध साधनांचा उपयोग करुन जास्तीत जास्त प्रबळ शत्रुला कसे नामोहरम करायचे याचे ते एक शास्रच त्यांनी सांगितले आहेत . हा संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पारंपरिक अनुयायांनी काही प्रमाणात साध्य केला ही . विषेशत: नवबौद्ध अनुयायांनी ! पण सर्वात जास्त समजुन उमजुन सर्वात जास्त उपयोग केला तो ब्राह्मणी छावणीने. ही बाब अनेकांना समजणार नाही.पण सत्य आहे.व्यक्तिगतरित्या ब्राह्मणी छावणीतले लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासत असतात. त्यांचे महत्वाचे संदेश समजुन घेत असतात.
गुरुचा आदर सहसा प्रत्येकजण करतो !—-
अंमलात आणत असतात. फक्त जाहीर कबुल करत नाहीत. कारण पारंपरिक व्यवस्थेने ब्राह्मणी छावणीला ‘गुरुपद’ दिले होते. म्हणून एखाद्या वेळी आर्थिकदृष्टय़ा ब्राम्हण गरीब असला तरी त्याला शिक्षण , प्राध्यापक, संशोधक ,पक्षसंस्थापक,अध्यक्ष अशी ‘गुरुपदे’ हवी असतात .कितीही वाईट माणुस गुरु, शिक्षक, प्राध्यापिका, मातृ संघटना (?) अशा काही व्यक्तींचा आदर करतोच. किमान हात/अस्र उगारत नाही ! हीच ती पहिली ‘ मार्राची आणि मोक्याची ‘ जागा आहे. अर्थात ‘ज्ञान‘ हे संपत्तीपेक्षाही महत्वपुर्ण आहे ही बाब सप्रमाण समजुन घेणे .ज्ञानच जगावर राज्य करते. मार्ग ब्राम्हणेतरांसाठी कठिण आहे. कारण ब्राम्हणेतरांमधे तशी परंपरा नाही . येथे वर्ण आणि त्यांची कर्तव्य, कामे,एकुणच जीवन यांची व्यवस्था खोलवर रुजलेली आहेत. रुजवण्यामधेही ब्राम्हणी छावणीने त्याला पुरक अशा संस्था शिक्षणसंस्था, धर्मसंस्था, कर्मकांडे, प्रथा, परंपरा आणि काल्पनीक परंतु सुंदर , नयनरम्य आणि त्यात हजारो वर्ष समाज गुंतुन राहिल, असे साहित्य, बोधकथा,कथा,काव्ये,महाकाव्ये, उपदेश कथा , रम्य कल्पनांनी युक्त अशा पुराणकथा इ.कष्टपूर्वक निर्माण केल्या . जिद्दीने टिकवल्या. बाहेरील प्रबळ सत्ता भारतात कार्यरत असताना माघार नेउन , प्रसंगी धर्मांतर देखील करुन आपले अस्तित्व टिकवले. मुस्लिम,ख्रिच्शन,बौद्ध धर्मा स्विकारुन प्रमुख पदे आपल्याकडेच ठेवली. उदाहरणार्थ मुस्लीम धर्मगुरु बहुतांश पुर्वाश्रमीचे ब्राम्हणी परंपरेतील धर्मप्रमुख आहेत. तेच भारतीय क्रिश्चन धर्मसंस्थेत आहे.अर्थात धर्मसंस्था हेही एक ,” मार्याची आणि मोक्याची जागा ‘ आहे.
सांस्कृतिक देवाण-घेवाणीची ‘खाती’—-
सरकारी सांस्कृतीक खाती ,पुरातत्व संस्था,विदेशातील सांस्कृतिक संस्था वगैरे ठिकाणी या छावणीचे लोक ठाण मांडून बसलेले असतात . पुण्यामधे चिनी चित्रपट महोत्सवात पुण्यातील झाडून सारे ब्राम्हणी परंपरेतील लोक सामिल होतात . कार्यक्रमांचे ‘पास’, प्रसिद्धी वगैरे ‘आपल्याच’ लोकांना देतात. सांस्कृतीक देवाणघेवाणखाती देखील स्वत:कडे ठेवतात.त्याचे लाभही स्वतासाठी मिळवतात. बौद्ध बहुसंख्यांक राष्ट्राच्या भेटी ,अभ्यासदौरे, शिक्षण,सांस्कृतीक बाबींसाठी परस्पर देवाण घेवाण करतात.भारतातील कोनती माहिती अशा राष्ट्रांतील लोकांना सागायची आणि कोनती नाही. हे ठरवतात.आणि हे ब्राम्हणेतरांना कधीच समजतही नाही. अगदी कम्युनिस्ट रशियाशी मैत्रीसंबंधात ‘ब्राम्हणी छावणी’तील लोकच सामिल असतात.अण्णा भाउ साठे यांच्या व्यतिरिक्त ब्राम्हणेतर डाव्या चळवळीतील लोक कोण होते, हे रशियाला माहित नव्हते. रशियाने अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाची आणि पारंपारीक प्रबोधन पद्धतीची माहीती मिळवल्यानंतर त्यांना रशियाभेटीचे आमंत्रण आले. तेव्हा पं.नेहरुंना देखील अण्णा भाऊ साठे कोणी पुण्यातील एखादे ‘साठे’ आडनावाचे ब्राम्हण असावेत असे वाटले होते.
25 लाखांच्या मोर्चाचा अनुभव—–
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलेल्या ‘मार्याच्या जागा आणि मोक्याच्या जागा’ कोनत्या असतातच ? हा अनुभव 25 लाखांचे मोर्चे नेउन देखील न्यायालयाच्या एक निर्णयापुढे हतबल झाले.मागे आले हे आपण पाहिले. मुंबईत मोर्चा शांतिपूर्ण पद्धतीने संबंधित अधिकार्यांच्या निर्णयानुसार जरांगे पाटील यांना पुढे नेता आला नाही. तो वरिष्ट अधिकारी आणि संबंधीत खाते असणारे मंत्र ज्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. तरी लोखो आंदोलकांना (यशस्वी?) माघारी न्यावे लागले. हे सुद्धा ‘मार्याचे आणि मोक्याचे ‘एक खाते किंवा अधिकारपद ज्यांच्याकडे आहे. ती बाब बाजी मारुन गेली. मराठ्यांना आता बर्याच उशिरा या गोष्टी समजल्या.जसे ईडीसमोर (?) अजित पवारांना सरंडर (?) करावे लागले ! ही देखील ‘मार्याची आणि मोक्याची जागा’! एक सरकारी संस्था ! अंगदी मुख्यमंत्रीपदी असणारे अरविंद केजरीवाल यांच्या मागे दिल्ली व पंजाबसह देशात व परदेशात मोठी सहानुभुति व मान्यता आहे !
तरी सुद्धा—-
तर सुद्धा ! आणि हे सर्व कायद्यानेच केले गेले. आनपेपर हे सर्व कायदेशीर आहे. कदाचित EVM मार्फत ‘मैच-फिक्सिंग’ झाले असल्याची खात्री नितीश कुमार यांना पक्की समजली असावी.मग जेलमधे राहण्यापेक्षा आहे तिथे बिहारमधे मुख्यमंत्रीपदी राहणेच चांगले. उगाच त्रास आणि एवढी इज्जत मिळविल्यानंतर जेल म्हणजे काही चांगली गोष्ट नाही, असा विचार नितीश कुमार यांना करावा लागला असावा ! आपल्या अजितदादांचेही तेच झाले असावे.आज हे मशिन कदाचित मुख्य ‘मोक्याची आणि मार्याची’ जागा आहे , हे पुढे सप्रमाण पुढे येवू शकते.
दोन ‘मुख्यमंत्री’ कारागृहात—–
मुख्यमंत्रीपदी असेल तरी त्याला ईडी तुरुंगवासात पाठवू शकते, म्हणजेच केजरीवालांच्या बाबतीतील ! इतर अनेकांना जे ‘ईडी’ च्या पिडेने भयभित होवून अशाच जिथे कमी मनुष्यबळात मोठा परिणाम घडवून आणणार्या एका ‘मार्याच्या आणि मोक्याच्या’ अधिकारस्थानामुळे घडले !
याचे मुळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचित केलेली ‘मार्याची आणि मोक्याच्या जागांची’ महती ब्राह्मणी छावणीला समजली होती. आणि ती तेव्हापासून म्हणजे किमान भारत सार्वभौम राष्ट्र बनल्यापासुन ! मग अशा जागांवर पहिल्या निवडुन आलेल्या केंद्र सरकारपासुनच ब्राह्मणी छावणीने चिकाटीने या ‘मार्याच्या आणि मोक्याच्या जागा ‘ हस्तगत केल्या !
(लेखाचा हा भाग – 1 असून पुढील भागात अधिक सखोल तपशील येणार आहेत.)
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••••
🌐
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन (मराठीत) – महाराष्ट्र शासन ग्रंथालय:
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com