
Contents
- 1 Domestic Violence: लग्नाच्या 11 वर्षांनी गृहिणीची पोलिसांत तक्रार; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Domestic Violence: लग्नाच्या 11 वर्षांनी गृहिणीची पोलिसांत तक्रार; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Domestic Violence Shirur Victim Since Last 11 Years
📍 शिरूर, पुणे | 2 जून 2025 | सत्यशोधक न्युज |
“Domestic Violence : शिरूरच्या बाबूराव नगरमध्ये 11 वर्षांपासून चालू असलेल्या वैवाहिक छळप्रकरणी गृहिणीने पोलिसात दिली तक्रार. पतीविरुद्ध शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण माहिती.”
शिरूरच्या बाबूराव नगर परिसरातील सौ. अस्मिता सिध्देश कदम (वय 28) यांनी आपल्या पतीविरुद्ध पोलिसात गंभीर तक्रार दाखल केली आहे.(Domestic Violence ) शिरूर पोलीस स्टेशन येथे गुरनं-374/2025 भादंवि कलम 85, 351(2)(3), 115(2) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔹 प्रकरण काय आहे?—-
फिर्यादी अस्मिता कदम यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं की, त्यांचा विवाह सिध्देश पंढरीनाथ कदम (वय 37) यांच्याशी 2014 साली दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस ते कल्याण आणि नंतर बेलवंडी फाटा येथे राहत होते. मागील तीन वर्षांपासून ते बाबूराव नगर, शिरूर येथे राहत आहेत.
लग्नानंतर काही काळातच पती सिध्देश यांना दारूचे व्यसन—-
मात्र लग्नानंतर काही काळातच पती सिध्देश यांना दारूचे व्यसन असल्याचे लक्षात आले. त्यांना स्थिर नोकरी नव्हती. दारूच्या नशेत पत्नीवर वारंवार शारिरीक व मानसिक छळ, तसेच माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव व भांडण केले जात असल्याचे अस्मिता यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
🔹 तक्रारीचा कालावधी—-
साल 2014 पासून ते 1 जून 2025 पर्यंतच्या कालावधीत हा छळ सुरू होता. अनेक वेळा माहेरी जावं लागल्याचं सांगत, तिथून पुन्हा पतीच्या विनवणीनंतर सासरी परत येत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
🔹 पोलिसांची कारवाई—-

या तक्रारीवरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुरनं 374/2025 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
✅ तपास अंमलदार: पो.ह. जगताप
✅ दाखल अंमलदार: पो.ह. टेंगले
✅ प्रभारी अधिकारी: श्री. चिवडशेट्टी (सौ. शिरूर पोलीस स्टेशन)
🔹 फिर्यादीचा स्पष्ट नकार—
फिर्यादीने तिच्या निवेदनात स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणात कोणतेही समुपदेशन (Counseling) न करता त्वरित कायदेशीर कारवाई करावी.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या—
1. महाराष्ट्र पोलीस – अधिकृत संकेतस्थळ
3. विधी सेवा प्राधिकरण – मोफत कायदेशीर मदत
4. शासकीय महिला व बालकल्याण विभाग
5. Google Maps – Shirur Police Station
✍️ टीप:
ही बातमी सत्य घटनांवर आधारित असून फक्त माहिती व जनहितासाठी प्रकाशित केली आहे. तक्रारीचा तपास व अंतिम निष्कर्ष अधिकृत पोलीस यंत्रणांद्वारे जाहीर केला जाईल.
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या —
Shirur Crime News Kanhur Mesai: कोकरूच्या कारणावरून तलवारीनं हल्ला; शेतकऱ्यावर जीवघेणा प्रहार