
Doctor La Shiksha
न्हावरे येथील नाथकृपा हॉस्पिटलच्या डॉक्टराला 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ! महिलेशी केले होते गैरवर्तन !
Doctor La Shiksha डॉक्टराला 2 वर्ष तुरुंगाची शिक्षा झाल्याने खळबळ!
Pune, Shirur 25 February 2025 : ( Satyashodhak News Report)
Doctor La Shiksha शिरुर तालुक्यातील
न्हावरे येथील नाथकृपा हॉस्पिटलच्या डॉक्टरला 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. या डॉक्टरने एका महिलेशी गैरवर्तन केले होते. मात्र
Doctor La Shiksha झाल्याने आणि 2 वर्ष काराग्रहाची शिक्षा झाल्याने खळबळ शिरुर तालुकाच नाही. तर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
Read more>>
उसतोड कामगार देतो म्हणुन 5 लाख 5 हजार रुपयांना गंडा घातला ! 420 पणा केला ! पुढे काय घडले ते वाचा.
Doctor La Shiksha डॉक्टरने महिलेशी केले होते गैरवर्तन —

न्हावरे,तालुका शिरुर येथील नाथकृपा हॉस्पिटलमध्ये घडलेल्या अश्लील वर्तन प्रकरणात, डॉक्टराला दोन वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 30,000 रुपयांचा दंड देखील न्यायालयाने सुनावला आहे. गाव-न्हावरे, शिरूर तालुका-शिरुर,जिल्हा – पुणे येथील नाथकृपा हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11 वाजता ही घटना घडली होती.ही एक गंभीर घटना मानली जात होती.
Doctor La Shiksha डॉ. रामकृष्ण भुजंगराव लाड असे डॉक्टरचे नाव—-
डॉ. रामकृष्ण भुजंगराव लाड असे नाव असलेल्या या डॉक्टरने एका महिलेच्या अंगाशी लगड करून, तिला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन केले होते . या प्रकरणात, फिर्यादी महिलेने शिरुर पोलिस स्टेशन मधे 2020 मधे फिर्याद दिली होती. ज्यामुळे खळबळ उडाली होती अखेर या प्रकरणात पिडीत महिलेला न्याय मिळाला असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
Read more>>
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल : काहीच बोललो नाही तर कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही !
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाला होता गुन्हा —

शिरुर पोलिस स्टेशनला या प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर 479/2020 असा होता. भारतीय दंड विधान कायदा कलम 354 (अ) आणि 354 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणात त्यावेळी तपास अधिकारी एस. एन. मोटे, पोलिस उपनिरीक्षक, शिरूर हे होते. त्यांनी सखोल तपास कला होता. त्यानंतर माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते .
Read more>>
Doctor La Shiksha शिरुर च्या न्यायालयाचा निकाल —
या खटल्याचे न्यायाधीश मे. जे. ए. झारी, माननीय प्रथम न्यायदंडाधिकारी, शिरूर, घोडनदी न्यायालय यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता माया शिवाजी क्षिरसागर (जाधव) यांनी प्रभावीपणे युक्तिवाद मांडला.
शिरुर पोलिसांनी चोख कामगीरी बजावली —
तपासादरम्यान पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार श्री. तुकाराम गोरे, महिला पोलिस अंमलदार सौ. मनिषा फंड, वारंट व समन्स बाबत पोलिस हवालदार श्री. बाळकृष्ण वाडेकर, पोलिस अंमलदार श्री. प्रकाश वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Read more>>
Doctor La Shiksha डॉक्टरला 2 वर्ष काराग्रह व 30000 रुपये दंडाची शिक्षा —-
दिनांख 21 फेब्रुवारी 2025 रोजी, माननीय न्यायालयाने डॉ. रामकृष्ण भुजंगराव लाड यांना भारतीय दंड विधान कायदा कलम 354 (अ) आणि 354 नुसार दोषी ठरवून, दोन वर्षांचा एकत्र कारावास आणि 30,000 रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयामुळे पीडित महिलेला न्याय मिळाला अशी समाजात भावना पसरली आहे. अशा प्रकारच्या वर्तनाबद्दल कोणालाही शिक्षा ही होईलच ! असा कठोर संदेश या निकालाने समाजात मात्र गेला आहे.
एकंदरीत हे प्रकरण हे सर्व सरकारी यंत्रणा आणि समाजासाठी आव्हान होते. समाजाने संयम पाळला. शिरुर पोलिसांनी चोख कामगीरी बजावली.मा. न्यायालयाने योग्य तो निकाल दिला आहे. पिडीत महिलेलेने न्यायासाठी झुंज दिली. ही बाब प्रशंसनीय ठरली. समाजाने यातुन , ‘ न्यायासाठी देर है लेकिन अंधेर नही है’ ! हा धडा घेतला पाहिजे.
1 thought on “Doctor La Shiksha न्हावरे येथील नाथकृपा हॉस्पिटलच्या डॉक्टराला 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ! महिलेशी केले होते गैरवर्तन !”