
Contents
श्री क्षेत्र देवडेेश्वर यात्रा महोत्सव निमित्त बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन !
श्री क्षेत्र देवडेेश्वर यात्रा रामलिंग शिरुर विशेष बातमी.
दिनांक १० ऑगस्ट २०२५ | प्रतिनिधी |
“पुणे जिल्ह्यातील रामलिंग येथे श्री क्षेत्र देवडेेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त ९ व १० ऑगस्ट २०२५ रोजी पारंपरिक बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन. आकर्षक बक्षिसे, ट्रॉफी स्पर्धा, आणि ग्रामस्थांचा उत्साह.”
पुणे जिल्ह्यातील रामलिंगजवळील श्री क्षेत्र देवडेेश्वरचा यात्रा महोत्सवानिमित्त ९ व १० ऑगस्ट पार पडला.या महोत्सवानिमित्त बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्यक्रमात ग्रामस्थांनी उत्साहात,या पारंपरिक खेळांची महत्त्वाची जपणूक केली. यावर्षी श्री क्षेत्र देवडेेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत शनिवार दिनांक ९ ऑगस्ट २०२५ व रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता रामलिंग ,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे येथे पार पडली.खास बैलगाडा शर्यतीसाठी म्हणुन या गावात मैदान,पुरेशी रुद भिंत व बैलांसाठी शर्यतीत लावल्यानंतर पुन्हा थांबणे व व्यवस्थित परत जाणे.यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
या शर्यतीत पारंपरिक वारसा, ग्रामीण क्रीडा संस्कृती,कृषी संस्कृती व शेतकरी बांधवांच्या मेहनतीची झलक पहायला मिळाली.अनेक आकर्षक बक्षिसांसह शर्यतीला ग्रामीण भागातून व शिरुर तालुक्यातुन गावोगावचे बैलगाडा शर्यती चे शौकीन आणि स्पर्धक बैलजोडी,गाडा व गाडामालक यांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची मिळाला.या बैलगाडा शर्यतीचा रोमांच काही वेगळाच होता.प्रेक्षक जागेवर खिळुन नाही राहिला तरच नवल असा होता.यात बैल,घोडे,गाडामालकांचे तरुण ,स्री पुरुष अशा अबालवृद्धांनी उपस्थिती लावली.प्रख्यात बैलजोड्यांनी देखील सरळ रेषेत पळताना आपला अनुभव व जिंकण्याची जिद्ध दाखवली.
मुख्य आयोजक मंडळ—-
ही शर्यत स्थानिक मंडळ, ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने पार पडली. यात अनेक नामांकित मान्यवरांचा सहभाग आहे. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचे व भावी पिढ्यांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.
शर्यतीतील गाडा क्रमांक व बक्षिसे—
• गाडा नंबर १ – रुपये ६५,५५५/-
• द्वितीय बक्षीस २– रुपये ९,५००/-
• तृतीय बक्षीस: रु. ७,५००/-
इत्यादी घोषित करण्यात आली होती.
अतिरिक्त आकर्षक बक्षिसे—
• रु. ७,००१/-
• रु. ५,००१/-
• रु. ४,००१/-
• रु. ३,००१/-
• रु. २,००१/-
• रु. १,१०१/-
विशेष आकर्षण : ट्रॉफी
या शर्यतीत एक विशेष ट्रॉफी स्पर्धा देखील झाली. ती श्री. शशिकांत दसगुडे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली होती .
शर्यतीचे महत्त्व—-
‘बैलगाडा शर्यत’ ही महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. ही फक्त एक स्पर्धा नसून शेतकरी व त्यांच्या मेहनती बैलांचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे.
• शेतीतील साथीदाराचा गौरव: ही शर्यत शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे स्थान अधोरेखित करते.
• ग्रामीण क्रीडा संस्कृतीची जपणूक: आधुनिक युगात हरवणाऱ्या पारंपरिक खेळांना नवसंजिवनी मिळते.
• ग्रामीण ऐक्याचे दर्शन: गावातील सर्वजण एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.
सुरक्षिततची काळजी—-
• बैलगाडी शर्यतींमध्ये स्पर्धक व प्रेक्षकांची सुरक्षा महत्त्वाची असते. आयोजक मंडळाने खालील उपाययोजना केल्या होत्या.
• स्पर्धा क्षेत्राभोवती सुरक्षित अशी एक कुंपणवजा भिंत केलेली होती.
• प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बसण्याच्या जागेची व्यवस्था करण्यात आली होती.
• आपत्कालीन आरोग्य सुविधा व अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.
• पोलिस प्रशासन व ग्राम सुरक्षा समितीने सहकार्य केले.
शर्यतीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील प्रभाव—-
• अशा शर्यतींमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
• गावात येणाऱ्या पाहुण्यांमुळे स्थानिक व्यवसाय चहा, नाश्ता, खानावळ, वाहतूक इ. वाढतात.
• शेतकरी बांधवांसाठी बक्षिसे व सन्मानामुळे त्यांना समाधान व प्रोत्साहन मिळते.
• ग्रामस्थांमध्ये आपुलकी व सहकार्य अधिक वृद्धिंगत होते.
ग्रामस्थांचा उत्साह—-
रामलिंग गावात हा यात्रा महोत्सव हा वर्षभरातील एक मोठा सोहळा असतो. घराघरात पाहुण्यांचे स्वागत, रांगोळ्या, सांस्कृतिक कार्यक्रम, भजनी मंडळांच्या गजरात गावात एक उत्सवी वातावरण निर्माण होते. बैलगाडी शर्यत ही या सोहळ्याची ‘शान’ असते.
पारंपरिक खेळांचे जतन : भविष्यकालीन गरज—
आजच्या आधुनिक युगात पारंपरिक खेळांकडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे अशा स्पर्धा आयोजित करणे ही संस्कृती जतन करण्याची खरी गरज आहे. युवकांना या खेळांशी जोडून ठेवणे, त्यांना शिस्त, कष्ट व स्पर्धेचे महत्त्व समजावणे हे ही आवश्यक असते.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••
1. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींबाबत माहिती
https://mr.wikipedia.org/wiki/बैलगाडी_शर्यत
2. पुणे जिल्हा पर्यटन व सांस्कृतिक वारसा
3. महाराष्ट्रातील पारंपरिक ग्रामीण खेळ
https://mr.wikipedia.org/wiki/महाराष्ट्रातील_खेळ
4. महाराष्ट्र सरकार – ग्रामीण विकास विभाग
https://rdd.maharashtra.gov.in/
5. पशुपालन विभाग, महाराष्ट्र शासन
https://ahd.maharashtra.gov.in/
6. महाराष्ट्रातील यात्रा आणि जत्रा
https://mr.wikipedia.org/wiki/महाराष्ट्रातील_यात्रा_आणि_जत्रा
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड: समाजासाठी फायदे, पात्रता, नियम व मराठी तरुणांना संधी .