
Contents
- 1 Danewadi Youth Murder Case : दाणेवाडीतील 19 वर्षीय तरुणाचा निर्घ्रुन खुन : माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य!
- 1.1 Danewadi Youth Murder Case: महाराष्ट्र स्तब्ध !
- 1.1.1 मृतदेह ओळखणे कठीण होते—
- 1.1.2 खास भेट :
- 1.1.3 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.4 कारण तो त्यांच्याच हाडामासाचा असतो—
- 1.1.5 बारावीत हा मुलगा शिक्षण घेत होता—
- 1.1.6 हत्या करणारे नराधम अशा कोनत्या राक्षसी मानसिकतेत होते?
- 1.1.7 त्यांना फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास करणे अपरक्षित–
- 1.1.8 आनर किलींगचा प्रकार तर नाही ना?—
- 1.1.9 About The Author
- 1.1 Danewadi Youth Murder Case: महाराष्ट्र स्तब्ध !
Danewadi Youth Murder Case : दाणेवाडीतील 19 वर्षीय तरुणाचा निर्घ्रुन खुन : माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य!
Danewadi Youth Murder Case: महाराष्ट्र स्तब्ध !
Maharashtra Crime News 16 March 2025;
Danewadi Youth Murder Case दुर्मिळतील दुर्मिळ अत्याचाराची , क्रुरतेची आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.पुणे जिल्यातील शिरुर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रिगोंदा तालुक्याच्या सीमेवर दाणेवाडी हे छोटेसे गाव आहे. या दाणेवाडीतील 19 वर्षीय तरुणाचा निर्घ्रुन खुन करण्यात आला आहे. ही घटना अक्षरश: माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य नराधमांनी केलेले आहे. यातील गुन्हेगार नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. असा जन आक्रोश पुणे,अहिल्यानगरच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात व्यक्त होत आहे. उभा महाराष्ट्र या घटनेने स्तब्ध झाला आहे.
Read more >>
Atrocity Act नुसार अल्पवयीन मुलीशी दोन वेळा शारीरीक संबंध व धमकी दिल्याने गुन्हा दाखल!
मृतदेह ओळखणे कठीण होते—
गेल्या तीन चार दिवसांपासुन दाणेवाडी, तालुका-श्रिगोंदा,जिल्हा -अहिल्यानगर या गावातील एका विहिरीत तरुणाचाचा मृतदेह ओळखणे कठीण होते.अशा स्थितीत तो मृतदेह सापडला होता. त्याची खात्रीशीर ओळख पटवणे पोलिसांना अवघड जात होते.अखेर तरुणाचे शिर, हात,पाय,सापडले आहेत.तसे एक तरुण बेपत्ता झाला असल्याची माहिती दाणेवाडी व परिसरात पसरली होती.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
कारण तो त्यांच्याच हाडामासाचा असतो—
त्यानंतर एका तरुण कोवळ्या 19 वर्षीय तरुणाला त्याचे घरचे लोक कुठल्याही पपरिस्थित ओळखु शकतात.कारण तो त्यांच्याच हाडामासाचा असतो.तसे तो ओळखला गेला होता. गव्हाणे, दाणेवाडी असे तरुणाचे नाव लोकांच्या चर्चेत येत होते.शेवटी तो मृतदेह माऊली सतिश गव्हाणे,राहणार-दाणेवाडी येथील तरुणाचा असल्याची खात्री पटली आहे.पण अमानुष ,अंगावर काटा आणणार्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. तो दाणेवाडी येथील आधिच्या विहीरीपासुन जवळच्या एका विहिरीत पोत्यामधे बांधलेल्या अवस्थेत भिन्नभिन्न अवस्थेत सापडला. तो एका गाठोड्यात सापडला .या गाठोड्यामधे दगडही टाकलेले आढळले आहेत.
Read more >>
बारावीत हा मुलगा शिक्षण घेत होता—
पोलिसांनी तपासणी केली असता दोन हात,पाय व डोके सापडले आहे.गेल्या चार दिवसांपासुन हा धड नसलेला मृतदेह ओळख पटत नसल्याने उलट सुलट चर्चा शिरुर ,श्रिगोंदा तालुक्यात घरोघरी चालु होती. बारावीत हा मुलगा शिक्षण घेत होता.अशी माहिती प्राप्त होत आहे. त्याने बारावीच्या परीक्षेचा पेपरही दिला होता. असे समजते.
हत्या करणारे नराधम अशा कोनत्या राक्षसी मानसिकतेत होते?
19 वर्षीय तरुण ,बारावी इयत्तेत ! या कोवळ्या वयात त्याने असा कोनता अपराध केला होता की इतकी क्रुरपणे त्याची हत्या करण्यात आली आहे. हत्या करणारे नराधम अशा कोनत्या राक्षसी मानसिकतेत होते?की हैवान त्यांच्यामधे संचारला होता? अगदी सुन्न करणारा हा प्रसंग आहे.दुर्मिळातील दुर्मिळ असा क्रुरपणे हा खुन करण्यात आला आहे.
Read more>>
त्यांना फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास करणे अपरक्षित–
मारेकरी हे प्रशिक्षीत सराईत प्रोफेशनल खुनी दिसतात.त्यांच्याकडुन थंड डोक्याने नियोजनपुर्वक हा खुन करण्यात आला आहे. असे दिसते.घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिस काही माहिती तपासाच्या कामात अडथळा येवु नये.मारेकरी सावध होवु नयेत.म्हणुन लगेच पुर्ण तपासाशिवाय माहिती सांगण्याची अपेक्षा नाही.पण सखोल तपास करून मारेकरी व इतर कोणी असतील त्यांना फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास करणे अपरक्षित आहे.या गुन्ह्यास देहांताशिवाय दुसरे प्रायश्चित्य नाही.हे मात्र नक्की!
आनर किलींगचा प्रकार तर नाही ना?—
तरी देखील अशा घटनांच्या बाबतीत समाजातुन थोडी थोडी माहिती लोकांच्या बोलण्यातुन मिळत असते.हा गुन्हा कोण्या मुलीच्या कारणावरुन झाला आहे. त्यावेळी दोन मुली व इतर काही तरुण तेथे होते.अशी माहिती उडत उडत मिळत आहे. हा आनर किलींगचा प्रकार तर नाही ना? की आणखी काही पैलु असतील ? अशा सर्व अंगानी तपास पोलीस करतीलच !
शेवटी एकच सांगावे वाटते.या आजच्या महाराष्ट्रात राहु नये असे सज्जन लोकांना वाटु लागले आहे. काय अमानुष संतोष देशमुख हत्या,काय खोक्या,काय कोयता गंग,काय आहुजाचे भर चौकात लघुशंका उद्दामपणे करणे, अगदी नको नको से वाटु लागले आहे. तरी मुळ कारण तपासले पाहिजे. पळुन जाणे,तेही ऐन लढाईतुन ! काही सत्यनिष्ठेचे ठरणार नाही. ‘कर्म’ करतच राहावे लागणार ! फलाची अपेक्षा न ठेवता !