
-
Contents
Danewadi Mauli Gavhane Murder Case: सागर गव्हाणे चे समलिंगी संबंध दुसर्या एकाशी ; माऊलीला समजले म्हणुन हत्या?
Danewadi Mauli Gavhane Murder Case: माऊली गव्हाणेची हत्येची कबुली कि ,’थिअरी नंबर 1?
Maharashtra Crime News 18 March 2025:
(Satyashodhak News Report)
Danewadi Mauli Gavhane Murder Case: सागर गव्हाणे चे समलिंगी संबंध दुसर्या एका मित्राशी होते.हे माऊली गव्हाणे ला माहिती झाले होते. म्हणुन माऊली गव्हाणे याची हत्या झाली आहे. अशी माहिती प्राप्त होत आहे.अशी कबुली सागर गव्हाणे याने दिली आहे. असे वृत्त आहे. या बातमीमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पण काही लोक ही ‘थिअरी नंबर 1’ असल्याचे बोलत आहेत.सागर गव्हाणे व त्याचा कोण एक मित्र ज्याचे नाव देण्यात आले नाही. यांचे समलैंगिक संबंध होते.ते माऊली गव्हाणे याने पाहिले होते. ते तो इतरांना सांगेल ; त्यामुळे आपली बदनामी होईल असे सागर गव्हाणे याला वाटत होते. म्हणुन त्याने,त्याचा समलैंगिक मित्र व या समलैंगिकाच्या साथीदारांनी मिळून माऊली गव्हाणे याचा मार्गातील अडथळा म्हणुन कट रचला. नंतर त्याला गाठले.सागर गव्हाणे व त्याचे साथीदार यांनी मिळुन त्याची हत्या केली.व पुरावे नष्ठ करण्यासाठी कटरने त्याचे तुकडे केले. अशी ही माहिती मिळत आहे.
हॉलिवुड मर्डर मिस्टरी सारखी वाटावी अशी माहिती—-
अगदी एखाद्या हॉलिवुड सस्पेंन्स फिल्म किंवा नेटफ्लिक्स वरील एखाद्या ‘डार्क डिझायर’ या हॉलिवुड मर्डर मिस्टरी सारखी वाटावी. अशी माहिती प्राप्त होत आहे. व्यक्तीगत सत्यशोधक न्युज संपादक म्हणुन मला याचे बिल्कुल आश्चर्य वाटत नाही. कारण मी अशा मालिका,चित्रपट पाहतो.अगदी नाद म्हणता येणार नाही. पण थोडा भाग पाहिला आणि पुढे काय होते?पुढे काय होते? असे जास्तच कुतुहल वाटले तर पुढे पाहतो.वास्तवात घडलेल्या सस्पेंस कथा ही वाचतो.जक्कल सुतार आणि जोशी अभ्यंकर हत्याकांड मला माझ्या वडिलांनी मी लहान असतानाच सांगितल्या होत्या. आणि त्या वयात मला त्या समजल्याही होत्या.तरी जवळपास चाळीस वर्षांनी जक्कल सुतार ची कहानी मला वाटते कु कु एफ एम वर मी अलिकडे पुन्हा एकदा ऐकली !असो.
न्यायालयात सिद्ध होईल !—-
भारत,भारतीय लोक,त्याची जीवनपद्धती आदर्श आहे असे मी म्हणणार नाही.पण गाव पातळीवर कुमार वयातील मुले ‘प्रगत’ देशांमधे उघड चालतात.ते प्रकार करत असतील आणि त्यातुन अशा पद्धतीने क्रुर खुन करण्यापर्यंत या प्रकाराचा प्रवास होईल, असे फारसे वाटत नव्हते.इथे मी वरील सर्व खरे आहे, असे काही पक्के ग्रहित धरत नाही.कारण एक त्याच गावातील अल्पवयीन मुलगा आणि सागर गव्हाणे याचे इतर साथीदार पकडायचे आहेत.त्यांची कबुली होईल. मग न्यायालयात सिद्ध होईल. तेव्हा ते किमान लोकशाहीत मान्य करावे लागते.त्याप्रमाणे मान्य करता येईल. न्यायालय काय तो निर्णय देईल.बाकी आपण तो मान्य करायचा असतो.
थिअरी’ असा एक शब्द का वापरला?
लकी बिश्त हे अलिकडे त्यांच्या पाडकाक्टवरील कार्यक्रमातुन जे सांगतात.ते ज्यांनी कुणी पाहिले असेल त्यांना आम्ही वर ,’थिअरी’ असा एक शब्द का वापरला ते समजायला हरकत नाही. लकी बिश्त हे भारताच्या गुप्तचर खात्याच (नाव लिहीत नाही) कारण त्यांचे लकी बिश्त हे नाव देखील खरे असेलच असे नाही. असे ते स्वतः सांगतात.ते देशातील सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेत,झेड प्लस सुरक्षेत ,ब्लैक कैट कमांडो म्हणुन आणि स्नायपर म्हणुन काम केलेले व्यक्ती आहेत.असे ते सांगतात.पाकिस्तान सह विविध जगभरातील देशांतील भारताच्या 137 शत्रुंना त्यांनी यमसदनी पोहोचवले आहे म्हणे.
गुप्तचर जगतामधील ,’अद्भुत’ अशी माहिती—-
तर प्रामुख्याने गुप्तचर जगतामधील ,’अद्भुत’ अशी माहिती ते सांगतात.अनेक गौप्यस्फोट त्यांनी केले आहेत. सरकार त्यांना काही करत नाही. कारण ते देशामधील सर्वात जास्त देशभक्त नंबर 1 असतात.असो.
-
पण ते जे सांगतात ते ऐकुण वरच्या लेवलला जगातील सत्ता आणि वर्चस्व हे खरे कुणाचे असते. याची आपल्याला आयडिया येते.आणि आपण सामान्य माणसे खरच ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे मान्य करुन आपल्यावर कोण शासन करत असते.त्याचा विचार न करता आपल्या घरात आपले आहे ते जीवन जगणे हेच आपल्या हातात आहे. हे समजुन जगत राहणे.हेच बरे ! असे ठरवणे चांगले आहे असे कबुल करणे हेच योग्य ! या निष्कर्षापर्यंत आलेले बरे !
माऊली गव्हाणे आणि सागर गव्हाणे यांच्यात घडलेल्या या क्रुर घटनेशी काय संबंध?—-
तर याचा माऊली गव्हाणे आणि सागर गव्हाणे यांच्यात घडलेल्या या क्रुर घटनेशी काय संबंध? तर पोलिस म्हणजे सरकार अधिकृतपणे जे सांगेल तेच खरे मानने.या नियमाने या खुनाच्या तपासाअंती खरे काय समोर येते,त्याची वाट पाहत बसणे हे योग्य आहे. माऊली गव्हाणे आपल्यात नाही.हे सत्य कसेही करुन त्याच्या आईवडिलांनी व सहानुभुतिदारांना पचवणे क्रमप्राप्त ठरते.