
Contents
- 1 Dananjay Munde Rajinama Case धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा !
- 1.1 Dananjay Munde Rajinama Case आम आदमी पक्षाचे आक्रोश आंदोलन !
- 1.1.1 हे ही वाचा. …
- 1.1.2 Dananjay Munde Rajinama Case: डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आक्रोश आंदोलन —
- 1.1.3 खास भेट :
- 1.1.4 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.5
- 1.1.6 Dananjay Munde Rajinama Case: बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या—-
- 1.1.7 Dananjay Munde Rajinama Case:भाजपच्याच आमदारांनी ,’आर्थिक आकडे’ सांगितले —-
- 1.1.8 Dananjay Munde Rajinama Case: सत्तेसाठीच एकत्र —-
- 1.1.9 Dananjay Munde Rajinama Case: मोठ्या संख्येने आप कार्यकर्ते सहभागी —-
- 1.1.10 About The Author
- 1.1 Dananjay Munde Rajinama Case आम आदमी पक्षाचे आक्रोश आंदोलन !
Dananjay Munde Rajinama Case धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा !
Dananjay Munde Rajinama Case आम आदमी पक्षाचे आक्रोश आंदोलन !
Pune Shirur News 5 March 2025 :
( Satyashodhak News Report )
Dananjay Munde Rajinama Case मधे धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. त्यासाठी पुणे येथे ‘आक्रोश आंदोलन ‘ करण्यात आले आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या वाल्मीक कराड ने केलेली आहे. तो वाल्मिक कराड, मंत्री (आता नाही) धनंजय मुंडे यांचा सहायक,व्यावसायिक भागीदार व इतर अनेक बाबतीत भागीदार असल्याने धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावी अशी मागणी करताना हे आंदोलन करण्यात आले आहे.
हे ही वाचा. …
Dananjay Munde Rajinama Case: डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आक्रोश आंदोलन —

धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, आर्थिक गुन्हे नोंदवा या मागणी साठी आम आदमी पार्टीचे आक्रोश आंदोलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ पुणे येथे करण्यात आले.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
काल धंनजय मुंडे यांनी आजाराच्या कारणास्तव मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आज बुधवार रोजी पुण्यात डॉ आंबेडकर पुतळा , जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ आम आदमी पार्टी तर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले.
Dananjay Munde Rajinama Case: बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या—-
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चाललेली असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सत्तेच्या नादात सामान्य माणसाला या शासनाकडून काय अपेक्षित आहे हेच शासन विसरले आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या वाल्मीक कराड ने केलेली आहे. तो वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा सहाय्यक , व्यवसायिक भागीदार असून आर्थिक खंडणी च्या कारणास्तव ही हत्या झालेली आहे.
Dananjay Munde Rajinama Case:भाजपच्याच आमदारांनी ,’आर्थिक आकडे’ सांगितले —-

यातील आर्थिक व्यवहारचे आकडे भाजपच्याच आमदारांनी मांडलेले आहेत. म्हणूनच धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणात वाल्मिक कराड सोबत सह आरोपी करावे व त्या अनुषंगानेच इडी ने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत गुन्हे नोंदवावेत. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Dananjay Munde Rajinama Case: सत्तेसाठीच एकत्र —-
केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या नितीभ्रष्ट लोकांचे हे सरकार असून धनंजय मुंडे सह संजय राठोड, तानाजी सावंत, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, अजित पवार, राणे, जयकुमार गोरे अश्या सर्व कलंकित, भ्रष्ट प्रवृत्तीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत. राज्यात मागील काही काळामध्ये महिला अत्याचारच्या अनेक घटना घडलेल्या असून या सर्व केसेस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवल्या जाव्यात. अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
Dananjay Munde Rajinama Case: मोठ्या संख्येने आप कार्यकर्ते सहभागी —-

यावेळी आंदोलनात आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, निखिल खंदारे, शिवाजी डोलारे, सुभाष करांडे, गजानन भोसले, संदेश दिवेकर, शीतल कांडेलकर, सचिन गरुड, कुमार धोंगडे, मनोज शेट्टी, मनोज एरंडकर, गुणाजी मोरे, अमित म्हस्के, उमेश बागडे, किरण कांबळे, नौशाद अन्सारी, प्रशांत कांबळे, सुरेखा भोसले, संजय कटारनवरे, इम्रान खान, मंगेश आंबेकर, विकास चव्हाण, सोमनाथ भगत, शंकर थोरात, सतीश यादव, चंद्रकांत गायकवाड, अभिजीत बागडे, निलेश वांजळे, अली सय्यद व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.