
Credit Card Guide in Marathi :क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
(Article by Dr.Nitin Pawar,Editor,14 May 2025)
Credit Card Guide in Marathi :आजचे युग ‘ डिजिटल युग’ आहे. यात क्रेडिट कार्ड हे एक अत्यंत उपयोगी आर्थिक साधन मानले जाते. बाजारात खरेदी करताना, ऑनलाइन खरेदी करताना किंवा आपत्कालीन गरज पडली तर तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे आहेत. पण जर त्याचा चुकीचा वापर झाला तर तुम्हाला ते आर्थिक अडचणीही निर्माण करू शकते . त्यामुळे “क्रेडिट कार्ड म्हणजे काय?” हे नीट समजून घेणे, त्याचे फायदे, तोटे व ते वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेणे आज गरजेचे आहे.
क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे पेमेंट कार्ड आहे.हे बँक किंवा फायनान्स कंपनी तुमच्यासाठी तयार करते. या कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला ठराविक मर्यादेपर्यंत (credit limit) पैसे खर्च करता येवु शकतात. नंतर त्या रकमेची परतफेड तुम्हाला करावी लागते. म्हणजे हे एक प्रकारचे अल्पकालीन कर्जच असते.
क्रेडिट कार्डचे प्रमुख फायदे—
1. तत्काळ आर्थिक मदत तुम्ही खरेदी करताना तुमच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसतात तेव्हा क्रेडिट कार्डमुळे तातडीने खरेदी शक्य होते.
2. कॅशबॅक व रिवॉर्ड्स—
अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या तुमच्या खरेदीवर कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स, डिस्काउंट्स सारख्या ऑफर्स देत असतात.
3. EMI वर खरेदी–
मोठ्या खरेदीसाठी तुम्हाला EMI (हप्त्यांमध्ये परतफेड) सुविधा उपलब्ध करुन दिलेली असते.
4. क्रेडिट स्कोअर वाढवतो—-
वेल टाइम पेमेंटमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो. जो भविष्यकाळात तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
5. आपत्कालीन वापर—-
हॉस्पिटल, प्रवास, व इतर आकस्मिक खर्चासाठी क्रेडिट कार्ड उपयोगी आहे.
क्रेडिट कार्डचे तोटे –

1. व्याजाचा बोजा
जर तुम्ही बिल वेळेत भरले नाही, तर तुम्हाला उच्च व्याजदर लागू होतो.
2. गोंधळलेली खरेदी—
अनेकदा मर्यादा असूनही काही लोक जास्त खरेदी करतात. नंतर परतफेड करण्यात त्यांना अडचणी येतात.
3. फसवणूक आणि फ्रॉड्स—

ऑनलाइन फ्रॉड्समुळे कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते .
4. क्रेडिट स्कोअर खराब होणे—
बिल भरताना वेळ न पाळल्यास क्रेडिट स्कोअर खाली जातो. त्यामुळे भविष्यातील कर्ज घेण्यात अडचण येऊ शकते.
क्रेडिट कार्ड वापरण्याची योग्य पद्धत—
1. आपल्या क्षमतेप्रमाणेच खर्च करा-
कार्डावर किती मर्यादा आहे याकडे दुर्लक्ष करु नये.तुम्हाला परतफेड शक्य असेल तेवढाच खर्च करा.
2. बिल वेळेवर भरा—-
बिलाची तारीख नेहमी लक्षात ठेवा व वेळेत पेमेंट करा. शक्य झाल्यास ‘Auto Pay’ ऑप्शन अॅक्टिवेट करा.
3. फक्त आवश्यक तीच खरेदी करा-
ऑफर्स किंवा डीस्काउंटसाठी खरेदी न करता, आवश्यक गोष्टींसाठीच कार्ड वापरा.
4. वार्षिक फी तपासा-
कार्ड घ्यायच्या आधी त्यावर किती फी लागते, त्याच्या ऑफर्स काय काय आहेत? याचा सखोल अभ्यास करा.
5. EMI निवडताना व्याज तपासा-
EMI वर खरेदी करताना व्याज किती लागते? हे पाहुन त्या वस्तूंची खरेदी EMI विना फायदेशीर ठरु शकेल का ते पाहा.
भारतात उपलब्ध प्रमुख क्रेडिट कार्ड कंपन्या-
✅ HDFC Bank Credit Card
✅ SBI Credit Card
✅ Axis Bank Credit Card
✅ ICICI Credit Card
✅ Kotak Mahindra Credit Card
सुरक्षेसाठी महत्त्वाचे टिप्स-
✅ तुमच्या कार्डची माहिती कुणाशीही शेअर करू नका.
✅ OTP किंवा CVV नंबर कोणालाही सांगू नका.
✅ नियमितपणे कार्ड स्टेटमेंट तपासा.
✅ अनधिकृत व्यवहार दिसल्यास लगेच बँकेला कळवा.
निष्कर्ष–
क्रेडिट कार्ड हे योग्य वापरल्यास तुमचं आर्थिक नियोजन अधिक मजबूत होऊ शकते. मात्र त्याचा अविचारी वापर आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे शहाणपणाने, नियोजनबद्धपणे व जबाबदारीने वापरल्यास क्रेडिट कार्ड तुमचे सर्वात उपयुक्त असे एक आर्थिक साधन ठरू शकते .
“तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये लिहा – तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? तुमचा अनुभव कसा होता?
जर तुम्हाला हा लेख उपयोगी वाटला असेल, तर तो शेअर करा व अधिक मराठी आर्थिक मार्गदर्शनासाठी आमच्या साइटला नियमित भेट द्या.
1 thought on “Credit Card Guide in Marathi :क्रेडिट कार्ड म्हणजे काय?”