
Contents
चुलत भावास मारहाण: शिरूर पोलिस ठाण्यात चुलत भावाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल
दि. २२ एप्रिल २०२५ | शिरूर, पुणे:(कल्पना पुंडे यांच्याकडुन)
चुलत भावास मारहाण:मौजे कुरूळी देशमुख वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे येथे झालेल्या कौटुंबिक वादातून एका शेतकऱ्याने आपल्या चुलत भावावर हात उचलल्याची घटना घडली आहे. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६५/२०२५ अन्वये संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घटना कशी घडली?
फिर्यादी मच्छीद्र विनायक बोरकर (वय ५६), रा. कुरूळी देशमुख वस्ती, यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता त्यांना शेतमजूर राजश्री शेलार यांनी फोन करून माहिती दिली की, आरोपी केरभाऊ विष्णू बोरकर दारूच्या नशेत असून शेतातील कांद्याचे काम करत नाही. त्यानंतर फिर्यादी शेतात पोहोचले असता आरोपी तेथे उपस्थित होता.
शेतीच्या वादावरून आरोप–
फिर्यादीने जेव्हा त्याला कारण विचारले, तेव्हा आरोपीने त्यांच्यावर शेतीच्या वादावरून आरोप करत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने हातातील बांबूची काठी फिर्यादीच्या डाव्या मनगटावर मारून त्यांना खाली पाडले. एवढ्यावरच न थांबता, उजव्या गालावर चावा घेऊन जीवे मारण्याची धमकीही दिली.
पोलीस कारवाई—-
याप्रकरणी गु.र.नं. २६५/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस हवालदार गवळी (ब.क्र. २२७१) यांनी तक्रार नोंदवली आहे. तपास देखील त्यांच्या मार्फत सुरू आहे.
प्रभारी अधिकारी मा. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकार्य सुरू आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …