
Contents
- 1 कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड: समाजासाठी फायदे, पात्रता, नियम व मराठी तरुणांना संधी .
- 1.1 कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड:
- 1.1.1 सीएसआर फंड म्हणजे नेमक काय?—
- 1.1.2 सीएसआर फंडाद्वारे कोण कोणत्या सामाजिक विषयात योगदान देता येते?—
- 1.1.3 कोणत्या कंपन्या CSR फंड देऊ शकतात ?—
- 1.1.4 सीएसआर फंड कोणाला मिळू शकतो ?—
- 1.1.5 सीएसआर फंड कसा मिळवावा प्रस्ताव व अर्ज प्रक्रिया—-
- 1.1.6 तरुणांनी CSR मध्ये का व कसे सहभागी व्हावे तसेच यातील भविष्यातील संधी ?—
- 1.1.7 सीएसआर फंड हे समाज परिवर्तनाचे एक शक्तिशाली साधन—
- 1.1.8 सारांश—–
- 1.1.9 About The Author
- 1.1 कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड:
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड: समाजासाठी फायदे, पात्रता, नियम व मराठी तरुणांना संधी .
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड:
अतिथी लेखी |ॲड.अवधुत झोडगे, शिरूर, पुणे |
“CSR फंड म्हणजे काय? कोण पात्र आहेत? आणि तरुणांनी यात संधी कशा मिळवाव्यात? शिरूरचे ॲड. अवधुत झोडगे यांनी लिहिलेल्या या अतिथी लेखात CSR म्हणजे केवळ कंपन्यांचा सामाजिक दायित्व नव्हे, तर एक करिअर आणि समाज परिवर्तनाचे साधन कसे बनते, हे सविस्तर समजावले आहे. या लेखात CSR फंड मिळवण्याची प्रक्रिया, पात्रता, नियम, आणि मराठी तरुणांसाठी उपलब्ध संधी यांचा संपूर्ण मागोवा घेण्यात आलेला आहे.”

भारतातील कंपन्यांना फक्त नफा कमावणे हेच एकमेव ध्येय नसते, तर त्यांना समाजाच्या विकासासाठीही जबाबदारी वाहावी लागते. हीच संकल्पना म्हणजे कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी (CSR). 2013 च्या कंपनी कायद्यानुसार विशिष्ट आकाराच्या कंपन्यांना त्यांच्या नफ्याचा एक भाग समाजहितासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात CSR फंडचा वापर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण विकासासाठी होत आहे.CSR फंड हे समाज परिवर्तनाचे एक शक्तिशाली साधन आहे. महाराष्ट्रातील युवा, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कंपन्यांशी सहकार्य करून हे निधी योग्य दिशेने वापरले पाहिजेत, CSR चा योग्य वापर करून आपण एक समतोल आणि प्रगत समाज निर्माण करू शकतो.पण CSR म्हणजे नेमके काय? कोणाला CSR फंड मिळू शकतो? तरुणांनी यात रुची का घ्यावी? याबाबत या लेखात आपण CSR च्या सर्व पैलूंवर माहिती घेऊ.
सीएसआर फंड म्हणजे नेमक काय?—
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड म्हणजे कंपन्यांनी त्यांच्या नफ्याच्या एका भागातून समाजकार्यासाठी केलेला खर्च. भारत सरकारने 2013 च्या कंपनी कायद्यात ही तरतूद सक्तीची केली आहे. या कायद्यानुसार कंपनीने ठराविक आर्थिक वर्षात मिळवलेल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान 2% रक्कम सामाजिक उपक्रमांवर खर्च करणे बंधनकारक आहे. कंपनी कायदा 2013 आणि CSR नियम 2014 ( 2021 मध्ये सुधारित ) यानुसार हे फंड काम करते. हे फंड सामाजिक जबाबदारीचे भान म्हणून दिले जातात, म्हणूनच याला कॉर्पोरेट सोशल रिस्पोंसिबीलिटी असे नाव आहे. या फंड द्वारे समाजातील विविध क्षेत्रामध्ये बदल घडत आहेत.
सीएसआर फंडाद्वारे कोण कोणत्या सामाजिक विषयात योगदान देता येते?—
👉- शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास यातून गरजू विद्यार्थ्यांना व समुदायांना मदत करता येते
👉- पर्यावरण संरक्षण- वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन व नवीन ऊर्जा प्रकल्प राबवता येतात
👉- ग्रामीण भागात रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी यासाठी मदत करता येते.
👉- महिला सक्षमीकरण करण्यासाठी स्वयंसहाय्य गटांना मदत तसेच रोजगार प्रशिक्षण मेळावे आयोजित करता येतात.
👉- आपत्ती व्यवस्थापन म्हणजे पुर, दुष्काळ, महामारी यावर मदत करता येते
अश्या बऱ्याचश्या सामाजिक विषयांमध्ये याद्वारे काम केले जाऊ शकते.
कोणत्या कंपन्या CSR फंड देऊ शकतात ?—
यासाठी आपल्याला योग्य कंपन्या शोधणे गरजेचे आहे,अश्या कंपन्या की ज्या कंपन्यांवर CSR नियम लागू होतात ज्यांचे ₹५०० कोटीपेक्षा जास्त वार्षिक आर्थिक उलाढाल व मालमत्ता ₹१००० कोटी च्या पुढे असेल व निव्वळ नफा ₹१० कोटी पेक्षा जास्त असेल, अश्या कंपन्या हे सीएसआर फंड देतात.
सीएसआर फंड कोणाला मिळू शकतो ?—
१. नोंदणीकृत एनजीओ (सेक्शन 8 कंपनी, ट्रस्ट, सोसायटी)
२. शासकीय मान्यताप्राप्त संस्था (शाळा, रुग्णालये, संशोधन संस्था)
३. स्थानिक स्वयंसेवी संघटना(ग्रामीण विकास प्रकल्पांसाठी)
४. कंपनी कायद्याच्या स्केड्यूल VII मधील उद्दिष्टांशी जुळणारे प्रकल्प
वरील सर्वांना हा CSR फंड मिळू शकेल.
सीएसआर फंड कसा मिळवावा प्रस्ताव व अर्ज प्रक्रिया—-
कंपन्यांच्या CSR विभागाशी संपर्क साधून प्रस्ताव सादर करताना त्यात पूर्ण प्रकल्पाचे तपशील, उद्देश , उद्दिष्टे व प्रकल्पाचा अंदाजित खर्च तसेच या प्रकल्पाद्वारे समाजात काय परिणाम होतील हे सांगणारे प्रपोझल सादर करावे लागेल. या सोबत तुम्हाला CSR फॉर्म-१ जोडावा लागेल. यानंतर वेळोवेळी तुम्हाला या संदर्भात पाठवपुरवा करावा लागेल. आपला अहवाल कंपनीने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय सीएसआर समिती द्वारे निरिक्षण करून कंपनीच्या बोर्ड कडे पाठवला जातो व तेथून मंजूर झाल्यावर आपल्याला हा फंड मिळू शकतो. महत्वाचे म्हणजे हा फंड फक्त स्केड्यूल VII मधील क्षेत्रांवरच खर्च करता येतो,राजकीय पक्षांना देणे बेकायदेशीर आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करता येत नाही.या CSR प्रकल्प खर्चाची सर्व माहिती MCA पोर्टल वर देणे अनिवार्य असते.
तरुणांनी CSR मध्ये का व कसे सहभागी व्हावे तसेच यातील भविष्यातील संधी ?—
तरुणांसाठी ही केवळ सेवेची संधी नसून, करिअरची नवी दिशा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने किमान एका CSR प्रकल्पाशी जोडले गेले पाहिजे ,याद्वारे तरुणांना कौशल्य विकास,प्रकल्प व्यवस्थापन , टीम लीडरशिप, बजेटिंग यासारखी व्यावहारिक कौशल्ये मिळतात व त्यांचा रेझुम पण जास्त प्रभावी होतो.या क्षेत्रात काम करतात कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तीसोबत ओळखी निर्माण होतात व समाजात एक चांगली प्रतिमा तयार होते, पुढे जाऊन ते याचा राजकीय क्षेत्रात सुद्धा फायदा घेऊ शकतात.
तरुणांना या क्षेत्रात सहभागी होण्यासाठी ते CSR इंटर्नशिप/फेलोशिप करू शकतात , विविध कंपन्यांच्या कॅरियर पेजवर नियमित अपडेट्स ट्रॅक करून ही संधी मिळू शकते. तसेच स्वतःचे सामाजिक उपक्रम सुरू करून लोकल कॉर्पोरेट्सकडून CSR फंडिंग मिळवू शकतात, डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून क्राउडफंडिंग+CSR हायब्रिड मॉडेल राबवू शकतात , CSR कंसल्टंट म्हणून पण काम करू शकतात, या फंडातून नवीन स्टार्टअप सुद्धा सुरू करू शकतात.
सिएसआर फंड चे प्रमाण दिवसेंदिवस अधिकधिक वाढत आहे , या वर्षी २०२५ मधे ₹२५,००० कोटी पेक्षा जास्त फंड दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणून तरुणांनी याकडे करिअर ची संधी म्हणून पाहायला हवे व नवीन पिढीला उपयोगी होतील असे प्रकल्प राबवले पाहिजेत.
सीएसआर फंड हे समाज परिवर्तनाचे एक शक्तिशाली साधन—
सीएसआर फंड हे समाज परिवर्तनाचे एक शक्तिशाली साधन आहे. महाराष्ट्रातील युवा, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कंपन्यांशी सहकार्य करून हे निधी योग्य दिशेने वापरावेत. CSR चा योग्य वापर करून आपण एक समतोल आणि प्रगत समाज निर्माण करू शकतो. CSR हा आता केवळ “दानधर्म” न राहता एक सामाजिक बदलाचा व्यावसायिक मॉडेल बनत आहे. तरुणांसाठी ही केवळ सेवेची संधी नसून, करिअरची नवी दिशा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने किमान एका CSR प्रकल्पाशी जोडले गेले पाहिजे – हाच खरा ‘आमच्या प्रगत महाराष्ट्र’ चा मार्ग!
– लेखक,ॲड.अवधुत झोडगे,पुणे
सारांश—–
CSR म्हणजे केवळ कंपन्यांचा सामाजिक जबाबदारी नव्हे, तर तरुणांसाठी करिअरची नवी दिशा! CSR फंड कसा मिळतो, पात्रता काय आहे, आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी संधी कोणत्या? वाचा सविस्तर माहिती ॲड. अवधुत झोडगे यांच्या लेखात!
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••
1. MCA (Ministry of Corporate Affairs – CSR Information):
👉 https://www.mca.gov.in/content/mca/global/en/about-us/CSR.html
2. Schedule VII – Company Act (CSR Activities):
👉 https://www.mca.gov.in/Ministry/pdf/CompaniesAct2013.pdf (पृष्ठ 470 नंतरचा भाग पहा)
3. CSR फॉर्म – CSR-1:
👉 https://www.mca.gov.in/content/mca/global/en/e-filing/Company-Forms.html
4. India CSR Database (Projects & Reports):
👉 https://csrbox.org/
5. Tata CSR Hub (CSR Fellowship & Internships):
👉 https://www.tatatrusts.org/our-work/CSR
6. NITI Aayog NGO Darpan (NGO रजिस्ट्रेशन साठी):
👉 https://ngodarpan.gov.in/index.php
7. United Nations India CSR Impact Reports:
👉 https://india.un.org/en/sdgs
“CSR म्हणजे केवळ कंपन्यांचा सामाजिक जबाबदारी नव्हे, तर तरुणांसाठी करिअरची नवी दिशा! CSR फंड कसा मिळतो, पात्रता काय आहे, आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी संधी कोणत्या? वाचा सविस्तर माहिती ॲड. अवधुत झोडगे यांच्या लेखात!”
https://shorturl.fm/ktaGe
Nice job ,I like this your thought ,work very good adbhut sir
https://shorturl.fm/2eUM8
https://shorturl.fm/6hNwL
https://shorturl.fm/lBYPm
https://shorturl.fm/n0rlP