
Contents
- 1 Breaking News: रांजणगाव MIDC तिहेरी खुन प्रकरणाचा पर्दाफाश! खुनाची गूढ उकलले ! वाचा सविस्तर —
Breaking News: रांजणगाव MIDC तिहेरी खुन प्रकरणाचा पर्दाफाश! खुनाची गूढ उकलले ! वाचा सविस्तर —
Breaking News Ranjangaon MIDC Triple Murder Case Exposed
दिनांक 7 जुन 2025 | सत्यशोधक न्युज |
” Breaking News:”पुणे ग्रामीण पोलिसांनी उकलले तीन महिलांच्या हत्येचे रहस्य. आरोपी गौरव बोढारेला अटक. पोलिस अधीक्षक संदीप गिल व त्यांच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी.”

📍 स्थान : रांजणगाव एम.आय.डी.सी., जिल्हा पुणे
📅 घटना दिनांक : 25/05/2025
📢 अधिकृत माहिती : पुणे ग्रामीण पोलिस विभाग, एस.पी. कार्यालय, चवधरवाडी, पाषाण रोड, पुणे
घटनेचा आढावा—-
रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे-नगर महामार्गालगत एका कंपनीच्या पाठीमागील गटारात 25 मे 2025 रोजी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान अजून दोन महिलांचे मृतदेहही सापडले. या तीन खुनांचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या 13 दिवसांत उकलून एक गंभीर गुन्हा उघडकीस आणला.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची तत्परता—-
पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली आणि तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. अपर पोलिस अधीक्षक श्री. रमेश चोघुले, श्री. गणेश बिरादार (बारामती विभाग), श्री. प्रशांत होळकर (शिरूर विभाग), श्री. बापूसाहेब हेडा (विशेष शाखा) आणि श्रीमती अनामिका झाडेवाले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक कार्यरत झाले.
महिलांच्या ओळखीचा तपशील—-
मृतदेह आढळून आलेल्या महिलांपैकी एका महिलेच्या हातावर Jay Bhim, Rajratan, mom dad, R S” असे टॅटू आढळले होते. या आधारावर पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली. मृत महिलेचे नाव स्वाती केशंव सोनवणे (वय 25 वर्षे, रा. वाशिंगा, ता. माजलगाव, जि. बीड) असे निष्पन्न झाले.मुलगे स्वराज ,2 वर्षे, विराज 1 वर्षे यांचाही खुन आरोपीने केला.
स्वाती केशवच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार गौरख पोपट बोखारे (वय 36 वर्षे, रा. सरदवाडी ता. शिरूर जि. पुणे) या तिच्या बहिणीच्या चुलतभावाबरोबर तिचे प्रेमसंबंध जुळले होते. ती त्याच्याशी लग्न करण्याची मागणी करत होती.हा तिचे व तिचा पती केशव यांच्यातील भांडणे सोडवण्याचा प्रयत्न हा गोरख करत असे. पण या दोघांमधेच प्रेमसंबंध जुळले.पण ही मागणी आरोपीला मान्य नव्हती. म्हणुन तिला दुचाकीवरून आळंदी येथून सरदवाडी येथे घेऊन येण्याच्या बहाण्याने रस्त्यात रांजणगाव एम आय डी सी आवारात तिचा दोन मुलांसह आरोपीने गळा आवळुन खुन केला.
आरोपी गोरख बोखारे याचा गुन्ह्यात सहभाग—-

स्वाती ही पती केशवकडून वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून माहेरी गेली होती.आळंदी येथे बहिणीकडे राहु लागली. तिला 25 मे रोजी शिरूर येथील सरदवाडी येथे गोरख हा घेऊन येत होता. तिथे निर्जन जागी तिचा खून करण्यात आला होता. मृतदेह निर्जन जागी जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याच वेळी तिच्या दोन मुलांचाही खून करण्यात आला होता.
आरोपीला अटक —
प्रकरण गंभीर बनत गेल्यावर, गोरख पोपट बोखारे याला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी 06/06/2025 रोजी अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयात हजर करताच त्याची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
तपास कार्यात सहभागी अधिकारी व कर्मचारी—
पोलिस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, अपर अधीक्षक श्री. रमेश चोघुले, श्री. गणेश बिरादार, श्री. प्रशांत होळकर, श्री. बापूसाहेब हेडा, श्रीमती अनामिका झाडेवाले (AHTU युनिट), श्री. दिलीप वाघमारे, श्री. प्रदीप डावरे, श्री. हर्षवर्धन झारगडे, श्री. प्रदीप वाघमारे, श्री. राजेंद्र मोहीते, श्री. राहुल घोलप, श्री. सागर साळुंखे, श्री. राजू कदम, श्री. कैलास खंडागळे, श्री. यशवंत खराडे, श्री. प्रकाश पाटील, श्री. हेमंत भिसे, श्री. विठ्ठल भोसले, श्री. शरद पवार, श्री. सचिन माळी, श्री. गणेश भोसले, श्री. शंकर नाळे, श्री. प्रकाश कदम, श्री. निलेश भालेकर, श्री. अभिजित बडे, श्री. विकास पोळ, श्री. प्रसाद जगताप, श्री. अजय सुतार, श्री. उमेश कांबळे, श्री. गोरख माळी, श्री. अमोल ढोकणे, श्री. पांडुरंग खंडागळे, श्री. योगेश वायकर, श्री. नितीन वानकर, श्री. गणेश बाथे, श्री. विनोद बडे – या सर्वांचे सहकार्य लक्षणीय ठरले.
निष्कर्ष—
पुणे ग्रामीण पोलिसांनी ही गंभीर हत्या प्रकरणे केवळ 13 दिवसांत उकलून आरोपीला न्यायाच्या कक्षेत आणले आहे. या तपासामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—
3. https://satyashodhak.blog/crime-news
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंक वर क्लिक करुन —
Breaking News Ranjangaon Lady Murder: रांजणगावमध्ये महिला आणि दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या!