
Contents
- 1 Breaking News Ranjangaon Lady Murder: रांजणगावमध्ये महिला आणि दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या
- 1.0.1 एक स्त्री वय अंदाजे 25 ते 30 वर्ष,मुलगा वय 3 ते 4 वर्षे, दुसरा मुलगा वय 1 ते 2 वर्ष—
- 1.0.2 ‘Mom Dad’ आणि बदाम चिन्ह, पाठीमागील बाजूस ‘R, S, Rajratan’ आणि ‘जय भीम’—-
- 1.0.3 आरोपीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला—
- 1.0.4 आरोपी सध्या अज्ञात—-
- 1.0.5 पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांची घटनास्थळी भेट —
- 1.0.6 आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना—
- 1.0.7 या घटनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हेही वाचा:
- 1.0.8 निष्कर्ष काय निघतो? —
- 1.0.9 About The Author
Breaking News Ranjangaon Lady Murder: रांजणगावमध्ये महिला आणि दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या
Breaking News Ranjangaon Lady Murder 25 May 2025 (Satyashodhak News Report )
Breaking News Ranjangaon Lady Murder ही अत्यंत धक्कादायक घटना आज पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे समोर आली आहे. ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या लक्ष्मी मंदिराजवळील निर्जन गट क्रमांक 214 मध्ये एक महिला व दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
25 मे 2025 रोजी सकाळी 11:35 पूर्वीच्यावेळी ही घटना घडलेली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
फिर्यादी सहाय्यक फौजदार गुलाब भिवराज येळे (वय 55 वर्ष, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत
एक स्त्री वय अंदाजे 25 ते 30 वर्ष,मुलगा वय 3 ते 4 वर्षे, दुसरा मुलगा वय 1 ते 2 वर्ष—

एक स्त्री वय अंदाजे 25 ते 30 वर्ष, एक मुलगा वय 3 ते 4 वर्षे आणि दुसरा मुलगा वय 1 ते 2 वर्ष असे मृत अवस्थेत आढळले.
‘Mom Dad’ आणि बदाम चिन्ह, पाठीमागील बाजूस ‘R, S, Rajratan’ आणि ‘जय भीम’—-
महिलेच्या ओळखीकरिता काही विशेष गोंदण चिन्हे निदर्शनास आली. उजव्या हाताच्या मनगटावर ‘Mom Dad’ आणि बदाम चिन्ह, पाठीमागील बाजूस ‘R, S, Rajratan’ आणि ‘जय भीम’ असा मजकूर गोंदलेला होता. डाव्या हातावर फुलांची डिझाईन होती.
आरोपीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला—
हा Breaking News Ranjangaon Lady Murder प्रकार केवळ हत्या नव्हे, तर आरोपीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असल्याने अत्यंत नृशंस स्वरूपाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आरोपी सध्या अज्ञात—-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सध्या अज्ञात आहे. गुन्हा भारतीय दंड विधान कलम 302 आणि 201 अन्वये रेकॉर्ड करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास PSI थोरात, PI महादेव वाघमोडे, तसेच प्रभारी अधिकारी म्हणून श्री. वाघमोडे हे करत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांची घटनास्थळी भेट —

घटनेची गंभीरता लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, SDPO बापूराव दडस, स्थानीय गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि रांजणगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
याशिवाय फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, आणि फिंगरप्रिंट एक्स्पर्ट्स यांनी सुद्धा घटनास्थळाचा सखोल तपास केला आहे.
आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना—
सध्या मयत महिला व मुलांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु असून, विविध तपास पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणी या महिलेची किंवा मुलांची ओळख पटवू शकत असेल, तर कृपया रांजणगाव पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा.
या घटनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हेही वाचा:
https://www.eSakal.com/crime-news
https://maharashtratimes.com/crime
निष्कर्ष काय निघतो? —
Breaking News Ranjangaon Lady Murder या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. पोलिसांची तपासाची गती, फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत आणि लोकसहभागातून या गुन्ह्याचे गूढ लवकर उकलले जावे, अशी अपेक्षा आहे.
आपणास काही माहिती असल्यास, ती पोलिसांपर्यंत पोहोचवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.
जर तुम्हाला अशा आणखी ताज्या आणि विश्लेषणात्मक बातम्या वाचायच्या असतील, तर भेट द्या:
satyashodhak.blog
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
Shirur Crime News Nimone | निमोणे येथे शेताच्या वादातून ऊस चोरीचा प्रकार