
Contents
- 1 ब्रेकिंग न्युज : शिरुर मधील पाचर्णे मळा येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या ; अन्य घटनांमधे हाणामारी व चोर्या !
- 1.1 ब्रेकिंग न्युज : 17 वर्षीय मुलाने केली आत्महत्या?
- 1.1.1 शिरुर,दिनांक 13 आगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून)
- 1.1.2 शिरुर मधील पाचर्णे मळा येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या?
- 1.1.3 शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास. ….
- 1.1.4 ———— शिरुर तालुक्यातील करडे येथे मारहाण व धमकी !
- 1.1.5 तुम्ही इथे आलाच कसे?
- 1.1.6 शिरुर पोलिस करत आहेत तपास. ….
- 1.1.7 ———- 30 हजार रुपये किंमतीची कार कोळगाव डोळस मधुन चोरीला. …
- 1.1.8 गेलेला माल पुढील प्रमाणे —
- 1.1.9 शिरसगाव काटा येथुन १,७८,०००/- रुपये किंमतीचे सोने चोरीला. …..
- 1.1.10 सोने ठेवले देवघरात ! पण…..
- 1.1.11 तपास सुरू. …
- 1.1.12 About The Author
- 1.1 ब्रेकिंग न्युज : 17 वर्षीय मुलाने केली आत्महत्या?
ब्रेकिंग न्युज : शिरुर मधील पाचर्णे मळा येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या ; अन्य घटनांमधे हाणामारी व चोर्या !
ब्रेकिंग न्युज : 17 वर्षीय मुलाने केली आत्महत्या?
शिरुर,दिनांक 13 आगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून)

ब्रेकिंग न्युज आज शिरूर मधुन मिळत आहे.शिरुर मधील पाचर्णे मळा येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या घडली (?) आहे. अन्य घटनांमधे हाणामारी व चोर्या घडल्या आहेत.मोठ्या किंमतीचा माल चोरीला गेला आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
शिरुर मधील पाचर्णे मळा येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या?
शिरुर पोलिस ठाण्यात फिर्यादीत नोंद केल्याप्रमाणे
दिनांक १२/०८/२०२४ रोजी ९:०० वाजण्याच्या सुमाराला माहीती देणारे श्री. गणेश बुधे ढोली, वय- 30 वर्ष ,व्यवसाय- मजुरी, राहणार – पाचर्णे मळा, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे हे घरी पाचर्णे मळा येथे असताना त्यांना त्यांचा छोटा भाउ लक्ष्मण याने फोन केला.त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘ रतन बुधे ढोली ,वय- १७ वर्षे याने आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या शेडमधे फाशी घेतली आहे. तु लवकर ये.’ असे कळवले. गणेश बुधे ढोली हे
लागलीच पाचर्णे मळा येथुन बाबुरावनगर येथे आले.त्यावेळी त्यांचा भाउ राहत असलेल्या पत्र्याच्या शेड समोर त्यांना त्यांचे नातेवाईक जमा झालेले दिसले. भाउ रतन बुधे ढोली हा खाली झोपलेला दिसला.
तेव्हा त्यांना समजले की, त्यांचा भाउ रतन बुधे ढोली वय १७ वर्षे याने राहत्या घराच्या पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहायाने फाशी घेतली आहे. तेव्हा अंबुलन्स बोलावुन त्याला ग्रामीण रुग्णालय, शिरूर या ठीकाणी दिनांक १३/०८/२०२४ रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घेवुन गेले . तेथे डॉक्टरांनी त्याला तपासुन ००:३० वाजण्याच्या पुर्वी ते पुर्वीच मयत झाल्याचे सांगितले .त्यानंतर माहिती देणार यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली. रतन बुधे ढोली, वय -17 वर्ष ,राहणार बाबुराव नगर, गंगा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, शिरुर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे याचा
मृत्यु झाला असल्याची नोंद करण्यात आली .
शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास. ….
शिरूर पोलिस स्टेशनमधे याची अकस्मात मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली आहे.रजिस्टर नंबर- 105/2024, हा आहे.भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे ही नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस नाईक श्री. टेंगले हे करत आहेत. दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री. मोरे हे आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री.जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
————
शिरुर तालुक्यातील करडे येथे मारहाण व धमकी !
शिरुर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्यानुसार
हकिगत अशी की दिनांक 11/08/2024 रोजी दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास करडे ,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत फिर्यादी हनुमंत नागनाथ देमगुंडे, वय- 56 वर्षे, धंदा- मजुरी व शेती, राहणार- मुळगाव लखमापुर, पोस्ट -मकरमाबाद, तालुका – मुखेड, जिल्हा- नांदेड, सध्या राहणार -बाळु भिंतोडे यांच्या खोलीवर भाड्याने, होलेवस्ती, उंड्री, तालुका – हवेली, जिल्हा- पुणे यांचे व्याही सायसराव कवडे हे राहत असलेल्या घराचे मालक कैलास पाचर्णे यांच्या घरासमोरील गेटजवळ कैलास फक्कड पाचर्णे, राहणार- करडे, तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे यांने फिर्यादी व त्यांची पत्नी राहुबाई, मुलगा गोविंद, सुन वंदना हिला व बाळाला भेटायला आले होते.
तुम्ही इथे आलाच कसे?

तेव्हा ‘ तुम्ही इथे आलाच कसे? गेटचे आत मोटार सायकल आणली कशाला?’ असे बोलुन शिवीगाळ केली. तेथील लाकुड उचलुन फिर्यादीचा मुलगा गोविंद याच्या कमरेला मारले. नंतर तेच लाकुड फिर्यादीच्या डावे हाताच्या मनगटाच्यावर मारून फॅक्चर केले. पायालाही मुका मार लागला आहे.तसेच बायको राहुबाई ही त्यांना समजावत असताना तिलाही लाथांनी मारहाण केली.’ इथुन निघा, थांबु नका, नाहीतर खल्लास करेन ‘ अशी धमकी दिली. शिवीगाळ केली.हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली . म्हणुन फिर्यादी हनुमंत नागनाथ देमगुंडे, वय 56 -वर्षे, धंदा- मजुरी व शेती, राहणार – मुळगाव लखमापुर, पोस्ट -मकरमाबाद, तालुका – मुखेड, जिल्हा- नांदेड, सध्या राहणार – बाळु भिंतोडे यांच्या खोलीत भाड्याने, होलेवस्ती, उंड्री, तालुका – हवेली, जिल्हा- पुणे यांनी आरोपी आरोपी कैलास फक्कड पाचर्णे,राहणार -करडे, तालुका- शिरूर, जिल्हा-पुणे यांच्या
विरोधात शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर पोलिस करत आहेत तपास. ….
शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नं 691/2024 तर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 117 (2), 115(2), 352, 351(2) (3) प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस हवालदार श्री. थेउरकर हे करीत आहेत.दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री.मोरे हे आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
———-
30 हजार रुपये किंमतीची कार कोळगाव डोळस मधुन चोरीला. …
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानुसार हकिगत अशी की फिर्यादी बाजीराव तुकाराम कुल, वय- 38 वर्षे, धंदा- शेती, राहणार – कोळगाव डोळस, तालुका – शिरूर ,जिल्हा- पुणे यांची खालील वर्णनाची मोटार सायकल दिनांक 03/08/2024 रोजी 19: 30 वाजण्याच्या ते 04/08/2024 रोजी सकाळी 06:30 वाजण्याच्या दरम्यान कोळगाव डोळस, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे येथील घरासमोर अंगणात पार्क केलेली असताना ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे .
गेलेला माल पुढील प्रमाणे —
रुपये 30,000/- किंमतीची हिरो कंपनीची एच. एफ. डीलक्स मोटार सायकल नं. एम एच-12, एस एच 6022 ; तिचा चासी नं. MBLHAC027K5L83623 व इंजिन नं. HA11EMK5L10141 जु. आ.असा आहे.
एकुण किंमत अंदाजे
30,000/- इतकी आहे.
म्हणुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर – 688/2024 तर कायदा कलम भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस नाईक श्री.खबाले हे करत आहेत.
तर दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री.मोरे हे आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
———–

शिरसगाव काटा येथुन १,७८,०००/- रुपये किंमतीचे सोने चोरीला. …..
शिरुर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आल्यानुसार हकिकत अशी की
१) ९५०००/-रुपये किंमतीचे १९ ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण असा असलेला जु. वा. किं. अं.असा. २) १५०००/-रुपये एक ३ ग्रॅम गळयातील डोर्ले असा असलेला जु.वा.कि.अं.
2) २५०००/- रुपये एक ५ग्रॅम वजणाची पिळयाची अंगठी असा असलेलाजु.वा.कि.अं.
3) १५०००/- रुपये एक ३ ग्रॅम वजणाची लेडीज अंगठी असा असलेला जु.वा.कि.अं.
4) १५०००/- रुपये ३ ग्रॅम गळयातील मणी असा असलेला जु.वा.कि.अं.
5) ७५००/- रुपये १.५ ग्रॅम गळयातील डोर्ले असा असलेला जु.वा.कि.अं.
6) २५००/- रुपये अर्धा ग्रॅम नाकातील चमकी असा असलेला जु.वा.कि.अं.
7) ३०००/- रुपये एक चांदीचा पायातील जोडवी जोड असा असलेला जु.वा.कि.अं.किंमतीच्या
१,७८,०००/- रुपये
या वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने दिनांक ०८/०८/२०२४ रोजी रात्री १२.०० ते दिनांक ०९/०८/२०२४ रोजी पहाटे ०५.०० वाजण्याच्या दरम्यान शिरसगाव काटा, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे येथे फिर्यादी फिर्यादी सुभाष भिकोबा कदम ,वय -७० वर्षे, धंदा- शेती, राहणार- मानेवाडी, शिरसगावकाटा, शिरूर, जिल्हा- पुणे यांनी अज्ञात चोरटयाविरूद्ध शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
सोने ठेवले देवघरात ! पण…..
घराचा अर्धवट उघडा असलेल्या दरवाज्यामधून कोणीतरी अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून घरामध्ये देवा-याच्या खाली असलेल्या लाकडी कप्यात ठेवलेला एकूण १,७८,००० /- रूपये किंमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयानेफिर्यादी चे संमतीशिवाय चोरून नेला आहे. म्हणून त्या अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सुरू. …
शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 684/3024 असा नोंद करण्यात आला आहे. तर अज्ञात चोरटयाविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल पोलिस नाईक श्री. कोथळकर हे आहेत. तर पुढील तपास पोलिस नाईक शिंदे हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. जोतीराम गुंजवटे, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
———-