चोरी च्या घटनेमधे चोरटयांनी बोऱ्हाडे मळा , शिरूर येथील अंगणवाडीतुन किराणा वस्तु चोरल्या तर कवठ्याजवळ 1,48,000 रुपयांचा ऐवज चोरला !
चोरी च्या घटनेमधे चोरटयांनी बोऱ्हाडे मळा , शिरूर येथील अंगणवाडीतुन किराणा वस्तु चोरल्या आहेत तर कवठ्याजवळ 1,48,000 रुपयांचा ऐवज चोरला गेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास शिरुर पोलिस करत आहेत.
चोरी च्या घटनेमधे चोरटयांनी बोऱ्हाडे मळा , शिरूर येथील अंगणवाडीतुन किराणा वस्तु चोरल्या तर कवठ्याजवळ 1,48,000 रुपयांचा ऐवज चोरला !
चोरी च्या दोन घटनांत शिरुर तालुक्यात 1 लाख 60 हजार रुपयांचा माल चोरीला !
शिरुर,दि.20 जुन : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
चोरी च्या घटनेमधे चोरटयांनी बोऱ्हाडे मळा , शिरूर येथील अंगणवाडीतुन किराणा वस्तु चोरल्या आहेत तर कवठ्याजवळ 1,48,000 रुपयांचा ऐवज चोरला गेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास शिरुर पोलिस करत आहेत.चोरी च्या या दोन घटनांत शिरुर तालुक्यात 1 लाख 60 हजार रुपयांचा माल चोरीला !
चोरी कवठे येमाई हददीत. ….
दिनांक १८/०६/२०२४ रोजी सायंकाळी ०६/३० वा ते दिनांक १९/०६/२०२४ रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली आहे. कवठे येमाई ,ता. शिरूर, जि पुणे गावच्या हद्दीत ही चोरी झालेली आहे.निखील अर्जुन मिडगुले, वय २७ वर्षे, धंदा – व्यवसाय, रा. मिडगुलवाडी, ता.शिरूर, जि पुणे यांचे श्री गणेशा बिल्डीग मटेरीयल नावाचे दुकान आहे.चारही बाजुला पत्रे उभे केलेले आहेत. त्यावरती कोणत्याही प्रकारचे छत नाही.
Dr.Nitin Pawar,Shirur.
‘संपादकिय टच”
” अंगणवाडी हा एक स्तुत्य उपक्रम शासनाने सुरु करुन बरीच वर्षं झाली असतील ! मुलांना काही खेळ,गाणी,अक्षरं,अंक हे शिकवणे हा एक भाग आहेच.पण शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन या शाळांमधुन जेवणाची सोय देखील करुन देते.त्याने तरी गरीब पालक शिक्षणाकडे वळतील असा यामागे आशावाद असावा ! चांगली गोष्ट आहे.
त्यामुळे बरेचशे किराणा सामान अंगणवाडीत ठेवलेले असते.चोरांचे आणि चोरीचे तसे अनेक प्रकारात विभाजन करता येईल.एक प्रकार खायला सुद्धा महाग झालेले चोर असा करावा लागेल अशी शक्यता आहे. चोरांना इथे काय आहे? कोणासाठी आहे?किती किंमतीचे आहे? त्याचा आपल्याला काय उपयोग होईल?याचा अभ्यास असणारच.चोर ह प्रतिभावान असु शकतो.ज्याअर्थी त्याने चोरीसाठी हे ठिकाण व या वस्तु निवडल्या आहेत.आणि नंतर चोरी करण्याचे टायमिंग,खबरदारी कशी घ्यायची?पकडला गेला तर आख्खा गाव हात धुऊन घेईल ! त्याची तयारी करणे म्हणजे मोठे धाडसाची बाब.धाडस हा एक चांगला गुण मानला जातो.पण कुणाचे धाडस ? कशासाठी धाडस? किती धाडस?हा विचार करायला बुद्धी लागतेच की !
त्याला हे माहीत असणारच आहे.पण नुकसान झाले तर दुसरे धान्य व वस्तु सरकार मुलांसाठी देईल.ही माहिती त्याला कोठुन मिळते कोण जाणे?कदाचित त्याचे कुटुंब खायला महाग झालेले असेल.कोणताच पर्याय उपलब्ध राहीला नसेल.म्हणुन मग ही साधी चोरी करावी असे त्याला वाटले असावे का?हे ही शक्य आहे. असेही शक्य आहे की अशी चोरी करणे हा गुन्हा नाहीच तर राबीनहुड स्टाईल मानवतेचे लक्षण आहे.मानव सवा आहे.मानवसेवा तर महान तत्व आहे.संतांनी सांगितले आहे.
बरे समाजात चोर आणखीन कोण कोण आहेत?कशी,कशाची,केव्हा?कशासठी? चोरी करणारे आहेत?कुणाला माहिती असेल तर मला सांगा ! कुतुहल फार मला ! माझं मनच फाजिल मेलं ! त्याला नसती उठाठेव करायची घाण सवयचं !”
दुकानाच्या समोरील बाजुस असलेल्या लोखंडी गेटचे कुलुप आहे. कोणीतरी अज्ञात चोरटयाने ते तोडुन आत प्रवेश करून खालील वर्णनाचा १,४१,०००/- रू. किमतीचा माल चोरून नेला आहे.त्या कारणाने त्यांनी अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चोरी गेलेल्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे :
1) 45,000/- रू किंमतीचे इसार कंपनीचे 12 फुटी लांबीचे कोटींगचे 30 पत्रे चोरले गेले आहेत.
2) 15,000/- रू. किंमतीचे इसार कंपनीचे 12 फुट लांबीचे कोटींगचे 10 बेंन्डपत्रे चोरले गेले आहेत.
3) 40,000/- रू किंमतीचे जाळीचे 10 बंडल यात समाविष्ट आहेत.
4) रु. 28,000/- 7 जाळीचे बंडल जे कापण्यासाठी देखील यात आहेत.
5) 10,000/ रु. किमतीचे इनव्हटर मशिन , 1बँटरी व सी सी टी व्ही फुटेज चे डीव्ही आर मशीन यात आहे.
6) ग्रीडर मशीन रु. 3000/- किंमतीचे आहे.
असा एकुण रु.1,41,000/- किंमतीचा माल चोरण्यात आला आहे.
अज्ञात इसमाविरूध भा. द. वि. कलम. 380,461 प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपासी पोलीस अंमलदार पोलिस नाईक निलेश शिदे हे करत आहेत.
चोरीची दुसरी घटना बोर्हाडे मळा येथे…
तर दुसरी एक चोरीची एका घटना घडली आहे. ती बोऱ्हाडे मळा, शिरुर येथे घडली आहे. दि. १८/०६/२०२४ रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या ते दि. १९/०६/२०२४ रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला आहे. हा अंगणवाडी, बो-हाडेमळा, ता. शिरूर, जि. पुणे येथे घडला आहे.कुणीतरी अज्ञात चोरटयाने अंगणवाडीचे कुलुप कोंडा तोडले. आत प्रवेश केला. एल सी डी टिव्ही, गॅस सिलेंडर, गोडे तेल, शेगडी कुकर इतर किराणा वस्तुंची चोरी केली आहे. हा असा एकुन १४,३००/- रूपये किंमतीचा मुददेमाल चोरूला.तो घेवुन किराणा वस्तुची नासधूस करून नुकसानही या अज्ञात चोरटयाने केले आहे.
अज्ञात इसमावर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा. …..
म्हणुन अज्ञात इसम विरुध्द शिरूर पोलीस स्टेशनला रोहिणी अशोक बोऱ्हाडे रा. बोऱ्हाडे मळा, शिरूर यांनी आय पी सी कलम 380, 457 प्रमाणे फिटर्याद देऊन गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अशोक शिंदे हे करत आहेत.ह्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनखाली केला जात आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com
1 thought on “चोरी च्या घटनेमधे चोरटयांनी बोऱ्हाडे मळा , शिरूर येथील अंगणवाडीतुन किराणा वस्तु चोरल्या तर कवठ्याजवळ 1,48,000 रुपयांचा ऐवज चोरला !”