
Contents
- 1 Blogging in Marathi: मराठीत ब्लॉगिंग करुन घरबसल्या कमाई करा!
- 1.1 Blogging in Marathi: मराठीत ब्लॉगिंग करुन करणे हा शिक्षित बेरोजगारांसाठी सर्वोत्तम मार्ग!
- 1.1.1 मराठीत ब्लॉगिंग म्हणजे काय व कसे सुरू करावे?—-
- 1.1.2 हे लक्षात ठेवा—
- 1.1.3 ब्लॉगिंगसाठी योग्य प्लॅटफॉर्म कसा निवडावा?—-
- 1.1.4 ब्लॉगसाठी नाव व थीम निवडताना काय लक्षात घ्यावे?—-
- 1.1.5 मराठी ब्लॉगवरून घरबसल्या पैसे कमावण्याचे प्रभावी मार्ग कोनता?—-
- 1.1.6 Google AdSense व जाहिरातींमधून उत्पन्न मिळवा—–
- 1.1.7 अॅफिलिएट मार्केटिंगचीही संधी आणि प्रारंभ—-
- 1.1.8 निष्कर्ष काय निघतो? —
- 1.1.9 About The Author
- 1.1 Blogging in Marathi: मराठीत ब्लॉगिंग करुन करणे हा शिक्षित बेरोजगारांसाठी सर्वोत्तम मार्ग!
Blogging in Marathi: मराठीत ब्लॉगिंग करुन घरबसल्या कमाई करा!
Blogging in Marathi: मराठीत ब्लॉगिंग करुन करणे हा शिक्षित बेरोजगारांसाठी सर्वोत्तम मार्ग!
(Article By Dr.Nitin Pawar:11 May 2025)
Blogging in Marathi:आजच्या काळात प्रत्येकाजवळ स्मार्ट मोबाईल फोन असतो. तसेच इंटरनेट आहे.शिक्षित पण बेरोजगार तरुण तरुणींसाठी व सर्वच मराठी लोकांसाठीही ब्लॉगिंगचं मोठे दालन खुले झाले आहे.आपल्या घरात बसून आपण आपल्या अनुभवांची व माहितीची देवाण-घेवाण करता करुन कमाईही आपल्याला करता येऊ शकते. यासाठी लागते मात्र सर्जनशीलता, सातत्य व थोडा धीर एवढेच. म्हणुन मराठीत ब्लॉगिंग सुरु करून अगदी निवांत वातावरणात व ठिकाणी लोकांशी हितगुज आणि स्वत:साठी आर्थिक कमाई या दोन्ही गोष्टी तुम्ही साध्य करू शकता.
मराठीत ब्लॉगिंग म्हणजे काय व कसे सुरू करावे?—-
ब्लॉग म्हणजे असते तुमची स्वतःची एक ऑनलाईन डायरी. यातून तुम्ही तुमच्या आवडत्या विषयावर लेख, माहिती, कथा,बातम्या, कविता किंवा अनुभव लिहू शकता. तसे मराठीत ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी फार विशेष असे काही तांत्रिक कौशल्य लागत नाही. सुरुवात करताना काही बेसिक गोष्टी मात्र लक्षात घ्याव्यात.मी स्वत:च्या अनुभवाने हे लिहीत आहे.
हे लक्षात ठेवा—
✅ स्वतःचा एक चांगला नाव असलेला ब्लॉग तयार करा.म्हणजे डोमेन नाव ठरवा.जसे माझे सत्यशोधक न्युज हे आहे तसे !
✅कोणत्या विषयावर लिहायचे हे आधी ठरवा (उदा.बातम्या,कृत्रिम बुद्धीमत्ता, प्रवास, पाककला, करिअर, तंत्रज्ञान, कौटुंबिक सल्ले इ.).
✅योग्य प्लॅटफॉर्म निवडा.उदाहरणार्थ गुगल,वर्डप्रेस इ.वर्डप्रेस उत्तम आहे.
✅ लेखनासाठी सहज व आकर्षक थीम वापरा.
✅ तुमचा ब्लॉग सुसंगत दिसण्याची काळजी घ्या.
एकदा या गोष्टी नीट जमल्या की, लेखनाचा तुमचा लेखन प्रवास सुरू होतो.
ब्लॉगिंगसाठी योग्य प्लॅटफॉर्म कसा निवडावा?—-
ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची निवड फार महत्त्वाची असते. काही लोकप्रिय पर्याय असे आहेत.
• WordPress: सर्वात प्रसिद्ध व बहुतेकप्रमाणात हाच वापरला जाणारा प्लॅटफॉर्म आहे.यामधे तुम्हाला नियंत्रण व सुलभता मिळवता येते.
• Blogger:हे गूगलचे फ्री टूल. सुरुवात करत असाल तर सहज आणि सोपे.
• Medium: लिखाणावर (Content Quality) भर व लक्ष केंद्रित करणारे हे आधुनिक प्लॅटफॉर्म आहे.
या सर्वांमधील तूलनात्मक माहिती मराठीत तुम्हाला वाचायची असेल, तर onlinetushar.com वरील ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सची यादी किंवा Bloggervinita.com चा हा मार्गदर्शक आपल्याला पाहता येईल.
ब्लॉगसाठी नाव व थीम निवडताना काय लक्षात घ्यावे?—-
✅ तुमच्या ब्लॉगचं नाव हे तुमच्या ओळखीचे पहिलं पाऊल असतं.ब्रँड तयार करण्याचे पहिले पाउल असते.
✅आपले नाव म्हणजे डोमेन नेम
विषयाशी संबंधित असावं.जसं मी सत्यशोधक न्युज असे नाव निवडले.माझा न्युज ब्लॉग आहे.तरी आपण त्यात अनेक केटेगरी व भाषांत लिहु शकता.मात्र त्यात सुसुत्रता सुसुत्रता आवश्यक आहे.
✅ ते तुमच्या व वाचकांच्या लक्षात राहाण्यास सोपे असावे.
✅ते लघुनाम पाहिजे.म्हणजे थोडे लहानच असु द्या.उदाहरणार्थ न्युज 1,news1.com,तरुणाई,tarunai.com,quora.com इ.
✅थीम निवडताना तुम्ही लक्षात ठेवा की, वाचकाला वाचायला सर्च करायला सोपं असणे आवश्यक आहे. अतीरंगीत किंवा अडचणीत टाकणारी किचकट रचना टाळा.
✅पहिला ब्लॉग पोस्ट लिहिताना काटेकोर नियोजन करा.
✅पहिल्या पोस्टसाठी योजना तयार करा.
✅आपल्या त्या ब्लॉग विषयाशी संबंधित चांगला कीवर्ड शोधा.
✅नेहमी शीर्षक आकर्षक ठेवा.
• संक्षिप्त परिचय आणि मुद्देसुद लेखन style यांचे कौशल्य वकसित करा.ते सरावाने होईल.काळजी करु नका.संयम ठेवा.गुगल,गुगल एडसन्स आपल्या विरोधात नसतो.ती सिस्टीम स्वयंचलित असते.पक्षपाताला तिथे स्थान नाही.
• तुम्ही मराठी वाचकांना समजेल अशी साधी, स्पष्ट भाषा वापरा.
• ब्लॉग नियमित करणे व आधिचे अपडेट करत राहणे आणि वाचकांची कमेंट्सना प्रतिसाद देणे हे खूप महत्त्वाचे आहे.
मराठी ब्लॉगवरून घरबसल्या पैसे कमावण्याचे प्रभावी मार्ग कोनता?—-

ब्लॉगिंगमध्ये कमाईसाठी बरेच पर्याय आहेत. मुख्य पर्याय पुढील प्रमाणे आहेत—-
✅ AdSense द्वारे व इतर जाहिरातींद्वारे कमाई होत असते.
✅अॅफिलिएट मार्केटिंग द्वारे देखील यात कमाई होते.
✅स्पॉन्सर्ड पोस्ट्स द्वारे कमाई करता येते.
✅डिजिटल प्रॉडक्ट्स (ई-बुक्स, कोर्सेस) वगैरे विकुन पैसा मिळु शकतो.
Google AdSense व जाहिरातींमधून उत्पन्न मिळवा—–
AdSense हे गूगलचं एक उत्पन्नाचं प्रभावी साधन आहे. आपल्या ब्लॉगवर Adscence च्या जाहिराती दाखवून तुम्ही पैसे कमवू शकता. Adscence अर्ज करताना काही खास काळजी घेणे आवश्यक आहे.
• ब्लॉगवर उपयुक्त, दर्जेदार व ओरिजिनल कंटेंट किंवा लिखाण असावे.
• तुमच्या ब्लाॅग च्या वाचकांची संख्या चांगली योजना तयार करुन वाढवावी.
• गुगल व Adsence च्या नियमांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे.ते कोनते हे आधी समजुन घ्या.
• एकदा Adsence चा अकाऊंट कोड मिळाल्यावर,तुमच्या वेबसाइटवर जाहिरात कोड लावून उत्पन्न सुरु करता येतं.
अॅफिलिएट मार्केटिंगचीही संधी आणि प्रारंभ—-

अॅफिलिएट मार्केटिंग म्हणजे इतरांच्या प्रॉडक्ट्सची तुम्ही शिफारस करणे व त्याच्या विक्रीतून कमिशन मिळवणे. उदा. Amazon, Flipkart हे भारतीय अॅफिलिएट देतात. याविषयावर सविस्तर माहिती thebusinessideasmarathi.com वर किंवा mahitikatta.com वर मिळतील.
👉आपल्या ब्लॉगशी संबंधित प्रॉडक्ट्स आधी निवडा.
👉त्याची अॅफिलिएट लिंक आपल्या ब्लॉग पोस्टवर योग्य ठिकाणी, नैसर्गिकपणे लावा.
👉वाचकांना तुमच्या प्रॉडक्ट्सच्या फायद्यांची माहिती द्या.
👉स्पॉन्सर्ड पोस्ट व डिजिटल प्रॉडक्ट विक्री करता येते.उदाहरणार्थ आपण एखाद्या विषयावर रिसर्च करून एक ब्लॉग पोस्ट थोडक्यात लेख,बातमी करणार असाल तर तो ब्लॉग एखादा व्यक्ती,संस्था किंवा तुमचा चाहता आपल्याला त्यासाठी पैसे देवु शकतो.
👉👇
✅स्पॉन्सर्ड पोस्ट म्हणजे ब्रँड किंवा कंपनी तुम्हाला त्यांच्या प्रॉडक्टबद्दल माहिती/रिव्ह्यू लिहिण्यासाठी पैसे देते. सुरुवातीला लहान ब्रँड्स किंवा लोकल व्यवसायांशी संपर्क करा.
✅डिजिटल प्रॉडक्ट्ससुद्धा एक चांगला पर्याय आहे – उदाहरणार्थ:आपले ई-बुक पब्लिश करा.
,मराठीत ऑनलाइन कोर्स तयार करा.
,खास मेल लिस्टसाठी पेड कंटेंट द्या.
निष्कर्ष काय निघतो? —
मराठी ब्लॉगिंग ही तुमच्या कल्पकतेला,आतल्या आवाजाला व्यासपीठही देते.तसाच आर्थिक कमाईचाही मार्ग खुला करते. सातत्याने दर्जेदार लिखाण करा. संवादप्रेमी रहा व वाचकांना माहितीपूर्ण अनुभव द्या. तुमचा ब्लॉग म्हणजे तुमची ओळख ,ब्रन्ड असतो – तो विश्वासार्ह ठेवा.
तर आजपासूनच सुरवात करा. तुमच्या शब्दांना मूल्य द्या. मराठीतून नव्या जगात confidently पाऊल ठेवा. घरी बसूनही आणि आपण झोपेत असता तेव्हाही आपला ,’मीटर’ चालु राहतो ! म्हणुन आनंदानं कमाई करा!